नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
छंदोबद्ध कविता -अष्टाक्षरी
माझ्या मरणाच्या कळा
-----------------------------
सांगा जगायच कसं?
शेती म्हणजे जुगार
नेहमीच कशी होते
कास्तकाराचीच हार?
नाही बरकत कधी
कष्ट करतोय फार
डोईवर असे माझ्या
नेहमीच कर्ज भार
किती पहावी पहावी
अशी पावसाची वाट
त्याच्या मनात असेल
तर मिरवेन थाट
फोडावानी जपले की
एक एक तान्हं रोप
नाही जीवाला घेतली
कधी सुखाची रे झोप
पिकविलं रानी सोनं
सारी संकटे झेलून
भाव नाही कापसाला
किती राबलो राबून
किती वाढले मीटर
उभा दारी सावकार
कसा चालवू संसार
त्याचं भरतोया घर
रोज सोसतोया रानी
माझ्या मरणाच्या कळा
असा कसा बळीराजा
तुझा गाडा खिळखिळा
----सिद्धेश्वर इंगोले
परळी वैजनाथ
जि.बीड
9561204691
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने