![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
कविता बळीराजा
जीवनाच्या काळोखात
काजव्याच्या दिव्यातून
पाहायच असत
फार उजेड सहन
होणार नाही म्हणून
काळोखातच राहायच असत
विश्वकर्म्याच्या लंकेत
गलेलठ्ठांनीच सावकारापरी
राहायचं असत
ऊस कापसाच्या गुलामीने
गरीबांनी कर्जाच्या चपला
झिजवतच मरायच असत
इंद्रधनुष्याच्या रंगानाही
पावसानंतरच
उगवायच असत
बळीराजाच्या सुखाच्या
सूर्यालाही
क्षणातच मावळायच असत
अजित सपकाळ अकोट
जि अकोला ९७६६२०१५३९