नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ओवी
पहिली माझी ओवी, माज्या ओवीचा काय नेम
माज्या गं अंगणात, तुळशी शेजारी हाय राम
दुसरी माझी ओवी, माज्या ओवीचा आकार
विठ्ठल देवाजीच हाय, सोन्याच शिखार
तिसरी माझी ओवी, ओवी माझी तिन्ही देवा
माझिया लाडक्या, विष्णू मारुती सदाशिवा
चौथी माजी ओवी, हाय पाण्यात तिचा पाया
सयानु काय सांगू, ओवी गाईतो वीठ्ठुराया
पाचवी माजी ओंवी, ओवी पाची पांडवाला
द्रोपदी काय म्हणी, माज्या कृष्ण बांधवाला
सहावी माजी ओवी, माझी पंढरी पाठवा
सोन्याच्या मंडपात, विठ्ठू झोपला उठवा
सातवी माजी ओवी, माझी पंढरी गेली नीट
सोन्याच्या मंडपात, विठ्ठू वाचीतो हरिपाठ
आठवी माजी ओवी, माझ्या ओवीच आठ दिस
विठ्ठल देवाजीला, कोण म्हणीना खाली बस
नववी माजी ओवी, माझ्या विठ्ठल सजणाला
ज्ञानोबा -तुकाराम, उभा राहील भजनाला
दहावी माजी ओवी, गरुड खांबाला घाली तिडा
विठ्ठल काय म्हणी, जना आलीया वाट सोडा
अकरावी माझी ओवी, नामदेवाच्या पायरीला
सयानु किती सांगू, दान चुड्याच भाग्य मला
बारावी माझी ओवी, गरुड खांबाला तटली
विठ्ठल रुक्मीण, मला साक्ष्यात भेटली .
-----------------------------------------------
प्रतिक्रिया
पारंपारिक साज ल्यालेल्या ओव्या.
व्वा. सुंदर. पारंपारिक साज ल्यालेल्या ओव्या.
शेतकरी तितुका एक एक!
अतिशय उत्तम
अतिशय उत्तम
धन्यवाद.
धन्यवाद.
पाने