पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
काव्यधारा
शेतकरी काव्य
नंदनवन फ़ुलले ...!!
वृद्धतरूच्या पारावरती, झोके घेत झुलले तरूघरी नंदनवन फ़ुलले
रम्यकोवळी रविकिरणे ती कुणी अप्सरा खिदळत होती मेघही हसती उडता उडता गरजणे भुलले
भूक कोवळी घेऊन पाठी स्वप्न उद्याचे कुणी शोधिती भिरभीर भिरभीर उडती पतंगे पंखही खुलले
पक्षी बोलती खोप्यामधुनी मधमाश्यांशी हितगुज करूनी वल्ली नाचल्या धुंद होऊनी देठ थरथरले
गाय,खार अन् मनीम्याऊ ती खेळ खेळती लपती छपती चित्रकार तो तद्रूप झाला रंगही स्फ़ुरले
चैतन्याचे अभय तरंग वृद्ध तरूही झाला दंग खोडव्याला फ़ुटली पालवी फ़ुले ही फ़ुलले
गंगाधर मुटे
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.