नाच रे मोरा थुई थुई नाच
श्रावणाचा गार वारा,
ढग घाली येरझारा;
आभाळाचे शब्दशिल्प वाच,
अन्
नाच रे मोरा, थुई थुई नाच!
सूर्य जरी माथ्यावरी,
झाकोळली लाली;
अंधारले जणू नभ,
सांजवेळ झाली.
ये रे जरा भुईवरी,
पिसाऱ्याला रंग भरी;
आभाळाचे शब्दपुष्प वाच,
अन्
नाच रे मोरा, थुई थुई नाच!
टपटप पावसाचे
थेंब मोत्यावाणी;