पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
नागपुरी तडका
आंब्याच्या झाडाले वांगे
माणसावाणी नीती सोडून वृक्ष वागत नाही म्हणून आंब्याच्या झाडाले वांगे लागत नाही ....!
अवर्षण येवो किंवा सोसाट्याचे वादळ बहर आणि मोहर कधी त्याचे थांबत नाही ....!
पाने देतो, फ़ळे देतो आणि देतो छाया बदल्यामधी घूटभर पाणी मागत नाही ....!
कोकीळ येवो, माकड येवो किंवा येवो घुबड फ़ांदीवरती बसू देतो, भेद मानत नाही ....!
मकानाले लाकूड देतो, सयपाकाले सरपण कुर्हाडीले दांडा देतो, वैरी जाणत नाही ....!
सद्गुणाचे सामर्थ्य अभय त्याले कळे जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही ....!
गंगाधर मुटे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.