नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
*स्मृतिगंध....एक मागोवा*
भद्रावती... चंद्रपूर जिल्ह्यातील साहित्यिकांच्या नेहमी स्मरणात राहणारं साहित्यिक व्यासपीठ, आपुलकीचं हवहवसं वाटणारं एक दिवशीही साहित्य संमेलनाचं...
एक दिवसीय.. आनंदी साहित्य मेळा...
सदोदित संपन्न होवो, असा भव्य सोहळा..
होय अगदी खरयं...
स्वर्गीय विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान भद्रावती, जिल्हा चंद्रपूर नोंदणीकृत साहित्य प्रतिष्ठान व याचे स्वयम् संयोजक - आयोजक श्रीमान प्रवीणजी आडेकर, आम्हा साहित्यिकांसाठी एक प्रतिष्ठेचे नाव.
फक्त मनुष्य पाठबळ घेता दरवर्षी एक भव्यदिव्य, एक- दिवसीय साहित्य संमेलनात असतात ते...
४ मार्च २०१८ पासून २० मार्च २०२२ सतत पाच वर्ष, एक दिवसीय साहित्य संमेलनांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यासह जवळपासच्या नागपूर,अमरावती, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यातील नव तथा नामवंत प्रतिष्ठित साहित्यिक आपली हजेरी लावतातचं लावतात... स्मृतिगंध साहित्य संमेलनाची वर्षभर वाट बघत असतात.
अतिशय उत्तम असा शिस्तबद्ध भरगच्च साहित्यिक व प्रेक्षक यांनी भरलेला एक स्मृती चा उजाडाचं असतो हा...
सकाळी १०:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत विविध साहित्यिक सत्रांचे नियोजन...
पाहुण्यांच्या आगमनातचं मनोमिलनीय स्वागताने सुरुवातीपासूनचं साहित्यिक सुखावून जातात...
स्वागत गीता पासून सुरुवात ते शेवटी पसायदाना पर्यंत साहित्य मंडप उत्साहात असतो, या भव्य आयोजनाची सांगता पसायदानाने होते यातच दिव्यता कळावी...
.. उत्साहात साहित्यिकांच्या हस्ते उद्घाटन व उच्चस्त स्वागत...
.. प्रस्तावना ...
.. साहित्यिकांचे उपयुक्त व मार्गदर्शक मनोगत...
.. पुस्तक प्रकाशन, साहित्यिक मानसन्मान...
.. उच्चपदस्थ साहित्यिकांची चर्चा व त्यांचे नव साहित्यिकांना मार्गदर्शनात्मक भाषण...
.. निमंत्रित कवीं चे कवी संमेलन / गझल मुशायरा...
हे तर, कवी व उपस्थित प्रेक्षकांसाठी एक आनंददायी पर्वणीच असते. चंद्रपूर जिल्हा व आसपास ची कविता / गझल या कार्यक्रमाला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवते यात मात्र मुळीच शंका नाही... पुन्हा थोडं जास्त चालावं असे हे आयोजन असते.
खुल्या कविसंमेलनाला उपस्थित कवी व त्याच ताकतीचे प्रेक्षक... हे सत्र तर संपूर्ण आयोजनाला एक वेगळे स्वरूप आणतं असते. प्रत्येक उपस्थित उपस्थितांना संधी देऊन त्यांचा योग्य तो सन्मान केला जातो. कविता सादरीकरणाची जशी उत्सुकता वाढली असते त्याहूनही ऐकणाऱ्यांची सुद्धा उत्सुकता पाहण्यासारखी असते तासनतास हा साहित्य मंडप भरलेला असतो...
स्वागत समारंभ ते शेवटचे खुले कविसंमेलन या प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट मनमोहक देखणीय स्मृतिचिन्ह देऊन प्रत्येक उपस्थित साहित्यिकांचा सन्मान केला जातो. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्प ,प्रमाणपत्र आ..हाहा... काय तो सन्मान असतो... सर्वांचं सोबत प्रेमाचे बोल, प्रत्येक साहित्य प्रेमाच्या बुलाव्याने सुखावला जातो व मनात या प्रतिष्ठानशी पक्क नातं जुळवून जातो...
सकाळी साहित्य मंडपी पाय ठेवताचं पिण्याच्या थंड पाणी, शीतपेय, चहा-नाश्ता यांची व्यवस्था तर बसलेल्या जागेवर एक वेगळीच व्यवस्था असते. लगेचचं उपस्थित सर्वांसाठी स्वादिष्ट भोजन व्यवस्था तर विचारूच नका...! जेवण करताना साहित्यकांची चर्चा, हसी - मजाक, परिचय, पुस्तकांची भेट जवळपास एक तास तर अगदीच आनंदीआनंद असतो, एक वेगळाच अनुभव, शिस्तबद्धता यावेळी अनुभवाला येते. म्हणूनचं तर साहित्यिक सुखावतात व या प्रतिष्ठानची प्रतिष्ठा आपल्या मनात ठेवतात.
कधीही न विसरणारा हा सन्मान सोहळा उत्तम रित्या संपन्न होत असतो.
मार्च २०१८ पासून हा अश्याच पद्धतीने दर वर्षी स्मृतीगंध सोहळा आयोजित केला जातो. साहित्यक्षेत्रासाठी स्वर्गीय विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठानने चालविलेली ही खूप मोठी साहित्यिक सेवा आहे... त्यासाठी सलाम श्रीमान प्रविणजी आडेकर भाऊसाहेब.. आपल्यास सलाम...
तसेच त्यांचे सहकारी म्हणजे भद्रावती येथील अतिशय कष्टाळू व प्रामाणिक साहित्यिक मंडळी श्री. अनिलजी पिठ्टलवार श्री. रमेशजी भोयर, श्री. शालिकजी दानव , श्री. डॉक्टर सुधीर मोते सर , सु. वि. साठे सर, तसेच त्यांची संपूर्ण दर शुक्रवारीय टीम...
भद्रावतीतील प्रतिष्ठित नागरिक व संपूर्ण आडेकर परिवार या स्मृतीगंध साठी अथक परिश्रम घेतात व हा साहित्य सोहळा अतिशय उत्साहाने चांगल्या पद्धतीने पार पाडतात.
दरवर्षी होणारा हा साहित्यिक मेळा पुढच्या वर्षी सुद्धा लवकरात लवकर यावा व साहित्यिकांनी एकत्र जमावं व हे संपूर्ण साहित्य संमेलन वर्षभरासाठी तरी आपल्या हृदयात साठवून घेऊन जावं, यासाठी ईथे येणारा प्रत्येक साहित्यिक या एक दिवसीय साहित्य संमेलनाची वर्षभर पाठ वाट पाहत असतो, हे मी ठामपणे सांगतो ...
हृदयी प्रविणच्या अजुनही फुलतो
विणा स्वरुपी मळा...
स्व. विणाच्या आठवणींचा हा साहित्य रुपी उजाळा...
सलाम स्मृतिगंध...
सलाम साहित्यसेवा...
सलाम आडेकर परिवार...
सलाम मित्रमंडळी...
✍️
सुनील बावणे - निल
बल्लारपूर, चंद्रपूर