नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
घात
काजळाचा देह माझा राबणारे हात
कधीची मी निथळत उभी रे उन्हात
तुझ्या तुळशीची बाग सुके अंगणात
लक्ष्मी तरणीताठी रे रुसते रानात
नाही राहिला ओलावा नदीच्या पाण्यात
तो येउनी गेला परी ना राहिला ध्यानात
दूरची वाट माझ्या पोरीच्या डोळ्यात
कसं हसावं स्वप्न देव्हाऱ्यातल्या कळ्यात
रक्ताचं पाणी कुण्या आटलं देहात
राघवा अवेळी कसा केलास रे घात
- गजानन मुळे
mulegajanan57@gmail.com
प्रतिक्रिया
छान कविता. आवडली.
छान कविता. आवडली.
शेतकरी तितुका एक एक!
पाने