नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
फाळ तापतो
फाळ तापतो चालतो नांगर
दबल्या निब्बर मातीवरती
जगण्याचा पण सुरा विषारी
चिरून काढतो निधडी छाती ....१
पावसावाचून जळणे कधी
कधी सडवतो पाऊस भोळा
पिकताच कधी पसा-पायली
बाजारभाव हा होतो आंधळा.....२
पायपीट कधी ती कर्जासाठी
वाटलं आभाळ येईल हाती
वर्षानंतर लागते काणगी
टेबलाखालचे राहिले बाकी....३
डोळ्यांपुढे हा दाटला अंधार
तोंडे त्या बिळांची झाकून राही
मुके चांदणे भरल्या ओटीस
आभाळ कधीच गावले नाही ....४
अशा मग चांदण आभाळात
एक उगवला तेजाळ तारा
आंदोलनाचा येठला नांगर
शरद जोशींचा घुमला वारा.......५
बांधल्या पेंढ्या नवविचारांच्या
रचल्या सुड्या मायबायांसाठी
मोट ही बांधली मतामतांची
शेतमालाच्या हमीभावासाठी .....६
उत्पादनाचा जुळवीत खर्च
पिकता विकता उरते काय?
मंथन मात्र आजही चालते
मतपेट्यांच्या या पोटात पाय...... ७
रावसाहेब जाधव (चांदवड)
(९४२२३२१५९६)
(rkjadhav96@gmail.com)
७०, महालक्ष्मी नगर,
एस.टी.स्टँड मागे. चांदवड
जि.नाशिक ४२३१०१
प्रतिक्रिया
शरद जोशी यांच्याशी संबंधीत कविता
धन्यवाद्!
रावसाहेब जाधव (चांदवड)
अभिनंदन!
धन्यवाद!
रावसाहेब जाधव (चांदवड)