नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पाऊसदान
आभाळातून येऊन
धरतीला जीवदान देणं
हे तुझं ठरलेलं कर्तव्य...
कधी प्रतीक्षा करायला लावणं
कधी गरज नसतानाही
कोसळणं धुवांधार...
मातीवर जगणाऱ्यांना
तुझीच असते अकांक्षा
तुझ्यामुळेच फुटतो धुमारा
जमिनीत तटस्थ उभ्या असलेल्या
पर्णहीन झाडांना...
नको तेवढे कोसळत राहिल्यावर
उद्ध्वस्त होते अनेकांचे जीवन
उल्हासित होता येते हर्षानेही
हवे तेवढे नि शांतपणे कोसळल्यावर...
- मुक्तविहारी
क्वार्टर क्र. जुने डी-८, थर्मल कॉलनी,
परळी वैजनाथ - ४३१५२०
जि. बीड
मो.९८६०९८५९११
प्रतिक्रिया
बढीया!!!!
खूप खूप छान छंद मुक्त कविता!!!
सुंदर रचना
सुंदर रचना
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने