नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गंगाधररावांनी इतरत्र वाचलेली होती ही गझलतंत्रातील कविता, पण इतर काही वाचकांनी कदाचित वाचली नसेल म्हणून येथे देत आहे. गोड मानून घ्यावी!
=====================================================
पालखीत पादुका, जिवंत लोक चालतात, हाल हाल पाहुनी कमाल वाटते
पांडुरंग, माउली, तुका मिळून एकजात नाद लावतात यात चाल वाटते
आमचा गुलाल लाल हिंदवी रुपातला, तुझा गुलाल वेगळाच पाकधार्जिणा
फक्त दंगलीत मात्र आमच्याकडील वा तुझ्याकडील रक्त लाल लाल वाटते
आजवर पुण्यात शांतताच नांदली, जगात आमचे शहर कुणास माहिती नसे
स्फोट जाहला, अनेक लोक संपले, अता पुण्यात राहणे कसे विशाल वाटते
राजकारण्या पहा विशाल जाहिरात ही तुझाच वाढदिवस साजरा करायला
गोष्ट वेगळी म्हणा, तुझ्यामुळेच वाहतूक तुंबते, शहर अती बकाल वाटते
कोंडदेव की जिजाउ, रामदास की तुका, अशावरून आज रक्त सांडतो अम्ही
बायका धुणी धुतात, पोरटी जुगार खेळतात, हे अम्हास बेमिसाल वाटते
एक बुद्ध जाहला नि एक भीम जाहला, पुन्हा न आमच्यात जाहले कुणी तसे
वारसे म्हणून मागुनी मते जगाकडे निवडणुकीत लागला निकाल वाटते
मुंज लागताच तो बटू जरा सुधारतो, धरून जानवे हळूच पेग लावतो
बाप सांगतो मुलास 'चोख तंगडी', मधेच बायको म्हणे 'अहो हलाल वाटते'
'बेफिकीर'ला सभागृहात बोलवायचे असेल तर विचार कर, विचार कर जरा
एक एक शेर मुखवट्यास फाडतो, ज्वलंत ओळ ओळ पेटती मशाल वाटते
-'बेफिकीर'!
प्रतिक्रिया
कोणता शेर कोट करू ? सर्वच
कोणता शेर कोट करू ?
सर्वच अप्रतिम झालेत.
मशाल,हलाल, निकाल हे तर बेमिसाल झालेत.
शेतकरी तितुका एक एक!
पाने