पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
माझा बाप शेतकरी...
माझा बाप शेतकरी पंढरीचा वारकरी सदा कष्टाचेच खातो जरी न मिळे भाकरी
माझा बाप शेतकरी विठू त्याचा पालन हारी सदा नाम त्याचे घेतो जरी दु:ख त्याच भारी
माझा बाप शेतकरी नांगर फाळ त्याच्या भाळी तो छोकरा जीवाचा त्याच्या वेदनेची गोळी
माझा बाप शेतकरी बैल गाडी मध्ये स्वारी जरी झोपला घरात जीव त्याचा गोठया मधी
माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा कैवारी धन-धान्या भाव नाही भाग्य गेल रे कपारी
-अशोक बाबाराव देशमाने
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.