![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गरीब, असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र्यरेषेखालील जनता यांचे वृद्धापकाळातील आयुष्य सुखकर व्हावे यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली. यामुळे सर्वच नागरिकांना वृद्धापकाळात पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने सर्वांना सामाजिक सुरक्षा विमा आणि पेन्शन जाहीर केली आहे. अटल पेन्शन योजनेविषयी माहिती देणारा हा लेख..
अटल पेन्शन योजना ही मुदतीनंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. राष्ट्रीय पेन्शन पद्धतीद्वारे संचालित ही योजना आहे. शिवाय पेन्शन निधी विनिमय आणि विकास प्राधिकरणाद्वारे नियमित केले जाते. ही योजना 1 जून 2015 पासून कार्यान्वित झाली आहे. या योजनेत पेन्शनधारकाला वयाच्या 60 व्या वर्षांपासून पेन्शन मिळणार आहे. योजनेसाठी सरकारला खोटी माहिती दिल्याचे आढळून आल्यास सरकारने दिलेली वर्गणी व त्यावरील व्याज हे परत घेण्यात येईल. वर्गणीदाराला महिन्याच्या कोणत्याही तारखेला पैसे भरता येणार. मात्र हप्ता चुकल्यास बँकेच्या नियमानुसार दंड भरावा लागेल. योजनेचे निकष लाभाचे स्वरुप वारसाला लाभ - विष्णू काकडे |