![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अभंग :- पोशिंदा
पोशिंदा जगाचा | भुकेलाच आज
दलालाचा माज | पहावेना
सोयाबीन सांगे | कपाशीला कथा
सारखीच व्यथा | तुझीमाझी
वांझोटे हे ढग | सुसाट पळते
कसे न कळते | देवा तुला
कितीदा मी करू | दुबार पेरणी
आटते धरणी | सालोसाल
सिंचनाचे स्वप्न | दाखवूनी देती
अनुशेष नेती | वाढवीत
साल दर साल | ठेवी नवी आशा
कोणती हि भाषा | वावराची
कोरडवाहूचा | पाईक मी होतो
जन्म तसा जातो | बापावाणी
तुम्हीच सांगा हो | जिथे सारे कमी
द्यावी कशी हमी | जीवनाची
मेल्यावरी देती | धनादेश सारे
सुटतात वारे | सांत्वनाचे
जगण्यास द्यावे | जितेपणी बळ
मग हळहळ | होत नाही
रवींद्र अंबादास दळवी नाशिक
प्रतिक्रिया
पोशिंदा
जगण्यास द्यावे जीतेपणी बळ
मग हळहळ होत नाही. खूप छान!
आपली ही तळमळ व्यवस्थेपर्यत पोहचायलाच हवी
छान अभंग
खुूप छान अभंग अाहे.
मुक्तविहारी
धन्यवाद
धीरजकुमार ताकसांडे सर खूप खूप आभार
मुक्तविहारी जी नमस्कार गढचीरोलीच्या आठवणी ताज्या झाल्यात पुन्हा भेटूयात
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने