नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
पोळ्याच्या झडत्या या काव्यप्रकाराविषयी थोडेसे :
पोळ्याच्या झडत्या बाबत मी माझी काही कच्ची निरीक्षणे नोंदवत आहे.
भोंडला, हादगा, भुलाबाई हा जसा महिलांचा गीतांच्या माध्यमातून सुखदुःखाची अभिव्यक्ती साकार करण्याचा सन
तसेच पुरुष देखील आपल्या सुखदुःखाचे गाऱ्हाणी आणि अभिव्यक्त होण्यासाठी पोळ्यांच्या झडत्यांचा वापर करतात.
जेव्हा बैलपोळा भरतो तेव्हा तिथेच काही लोक खड्या आणि पहाडी आवाजात विशिष्ट ढब आणि चालीवर छोटेसे गीत सादर करतात त्याला पोळ्याच्या झडत्या असे म्हणतात.
झडत्या हा शब्द इतका तंतोतंत आहे की खरंच काही झडत्या ऐकताना माणसांच्या अंगावर शहारे म्हणजेच झडत्या येतात. पूर्वापर चालत आलेल्या परंपारिक झडत्या सोबतच काही लोक नवीन वेळेवर जसं जमेल तसे जुळवाजुळ करून झडत्या म्हणतात. या झडत्या मध्ये विडंबन, विनोद, मिश्किल, टीकात्मक, व चिमटे घेणारे रंग असतात.
पोळ्याच्या काही झडत्या अश्लील सुद्धा असू शकतात. मात्र ज्या झडत्या अश्लील असतात त्या अभद्र नसतात. मात्र काही लोक पराकोटीचे अश्लील झडत्या सादर करतात. आजूबाजूला महिला आहेत याची कोणी चिंता करीत नाही आणि त्या झडत्या ऐकताना महिला देखील फारशा चिंता करत नाहीत.
पोळ्याच्या झडत्या लिहिणे तितकेसे सोपे नाही. लयबद्ध असतात पण तंतोतंत मीटरमध्ये नसतात. दर्जाहीन नसतात पण अत्यंत दर्जेदारही असू शकत नाही कारण ते शेतकरी भाषेतले काव्य आहे. भाषा आणि शब्द अर्थपूर्ण असावेत पण गुढ गहन असून चालत नाही. ओघवते आणि प्रवाही असले पाहिजे.
पोळ्याच्या झडत्या - 2024
*पोळ्याच्या झडत्या - १*
बैना ओ बैना, लाडाची बहिणा
लाडाच्या बहिणीला पंधराशे महिना
पंधराशे रुपयाचे खावा गोलगप्पे
लाडाच्या भावाला द्या ठपाठप ठप्पे
मायबाप सरकार म्हणते लाडाची बैना
पाटलाची पाटी उरली जावयाची दैना
लाडाच्या बहिणीच्या नवऱ्याचे हाल
कुत्रंबी हुंगत नाही शेतातला माल
तुर केली आयात, पाडून टाकले भाव
स्वस्तामध्ये सोयाबीन, लुटून नेलं गाव
जावयाच्या छाताडावर कर्जाची रास
पंधराशेत जहर घ्यावं की घ्यावा गळफास
जरांगे म्हणतात ते खरं आहे भाऊ
घामाचं दाम नाही तर
अभय आरक्षणच घेऊ
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
- गंगाधर मुटे "अभय"
एकतीस/आठ/दोन हजार चोवीस
=-=-=-=
*पोळ्याच्या झडत्या - २*
हेला रे हेला, राजकारणी हेला
सरकारच्या धोरणापायी
शेतकरी मेला
शेतकरी मेला तर
लाख रुपये देते
जिवंत जगतो म्हणाल तर
खमसून रक्त पेते
शेतमालाला भाव नाही तर
आरक्षण तरी द्या
तुमच्या हिश्याच्या नोकऱ्या
आमच्या लेकराले द्या
प्रेमानं दिलं नाही तर
हिसकून घ्या आता
नव्या दमानं लिहू अभय
शेतकऱ्याची गाथा
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
- *गंगाधर मुटे "अभय"*
एकतीस/आठ/दोन हजार चोवीस
#गंगाधर_मुटे #पोळ्याच्या_झडत्या
=-=-=-=-=
*पोळ्याच्या झडत्या - ३*
पोयी रे पोयी पुरणाची पोयी
पवारांच्या पालखीला उद्धवचे भोई
शिंदेसेनेच्या घोड्यांना
भाजप घालते चारा
दादाच्या घड्याळात
वाजून गेले बारा
कपाळावर नाही उरली
निष्ठेची टिकली
खुर्चीसाठी साऱ्यांनीच
लाज शरम विकली
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
- *गंगाधर मुटे "अभय"*
एकतीस/आठ/दोन हजार चोवीस
#गंगाधर-मुटे #पोळ्याच्या-झडत्या
=-=-=-=-=
*पोळ्याच्या झडत्या - ४*
वाडा रे वाडा इंद्राचा वाडा
भाजपच्या चड्डीले उद्धवचा नाडा
भाजपने सोडली उद्धवची साथ
तर भाजपचाच झाला सुफडासाफ
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
- गंगाधर मुटे "अभय"
एकतीस/आठ/दोन हजार चोवीस
=-=-=-=
#पोळ्याच्या_झडत्या #गंगाधर_मुटे
*पोळ्याच्या झडत्या - ५*
नवं नवं सरकार नवी नवी थीम
नवी नवी योजना नवी नवी स्कीम
लाडाचा भाऊ लाडाची बहीण
लाडाचा ब्याही लाडाची विहीन
मत द्या आम्हाले
सारं फुकट तुम्हाले
धान्य फुकट, तेलबी फुकट
धोतर फुकट, चोळीबी फुकट
नवऱ्याले एक एक बायको फुकट
बायकोले एक एक नवरा फुकट
फुकट फुकट फुकट
फुकट फुकट फुकट
जोडप्याले दोन दोन लेकरं बी फुकट
मत द्या आम्हाले
सारं फुकट तुम्हाले
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
- *गंगाधर मुटे "अभय"*
#गंगाधर_मुटे #पोळ्याच्या_झडत्या
एकतीस/आठ/दोन हजार चोवीस
=-=-=-=
*पोळ्याच्या झडत्या - ६*
माशी रे माशी,
गांधीलची माशी
शेतकऱ्याच्या नाकात
घुसली गोमाशी
मोदीभाऊ म्हणे
मी काढू कशी
राहुलभाऊ म्हणे
राहू दे तशीच
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
- *गंगाधर मुटे "अभय"*
#गंगाधर_मुटे #पोळ्याच्या_झडत्या
एकतीस/आठ/दोन हजार चोवीस
=-=-=-=-=
*पोळ्याच्या झडत्या - ७*
कॅटली रे कॅटली, दुधाची कॅटली
दुधावरची साय सांगा कोणी चाटली?
शेतमालाले भाव म्हणलं तर
सरकारची चड्डी
मांडीवर फाटते
वेतन आयोगावर सरकार
जम्मुन खिरापत वाटते
उद्योगांचे अरबो खरबो
कर्ज झटक्यात माफ करते
हजाराच्या कर्जासाठी
इकडे शेतकरी मरते
घोरसून सांगा लोकहो
शेतमालाले भाव दे
नायतर
आरक्षण दे जरा
जमत असण तर जमव
नायतर
घ्या म्हणा झोलाझेंडी
अन्
व्हा आपल्या घरा
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
- *गंगाधर मुटे "अभय"*
#गंगाधर_मुटे #पोळ्याच्या_झडत्या
एक/नऊ/दोन हजार चोवीस
=-=-=-=-=
=-=-=-=-=-=-=
२०२३ - पोळ्याच्या झडत्या
=-=-=-=-=-=-=
=-=-=-=-=-=-=
२०२२ - पोळ्याच्या झडत्या
=-=-=-=-=-=-=
*पोळ्याच्या झडत्या… (१)*
आभाळ गडगडे
विजा कडकडे
सरकारात घुसले रेडे
इकडे कास्तकार झाले
कर्जापायी येडे
अन आमदार खासदार खाते
मलाईचे पेढे
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर-मुटे
*पोळ्याच्या झडत्या… (२)*
=-=-=-=-=-=-=
काही संकलित झडत्या
*******
पोळ्याच्या झडत्या… (३)
*******
पोळ्याच्या झडत्या… (१३)
*******
पोळ्याच्या झडत्या… (१४)
*******
पोळ्याच्या झडत्या… (१५)
: संकलन साहाय्य :
श्री ज्ञानेश्वर चौधरी, हिंगणघाट
श्री राजेश रेवतकर
श्री पांडुरंग भालशंकर, वर्धा
श्री संदीप अवघड, अमरावती
श्री पद्माकर शहारे, आर्वी छोटी, हिंगणघाट
श्री नरेश नरड, आर्वी छोटी, हिंगणघाट
श्री अच्युत रसाळ, परभणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
पोळ्यांच्या झडत्या
पोळयाच्या झडत्याच खूप छान संकलन, सर
याच झडत्याच व्हिडिओ संकलन करा
धन्यवाद सर
धन्यवाद सर
नक्कीच प्रयत्न करू.
शेतकरी तितुका एक एक!
पोळ्याच्या-झडत्या
*पोळ्याच्या झडत्या… (१)*
चाकचाडा बैलगाडा
बैल गेले हो गोहाटीला
गोहाटीहून आणले खोके
मग देवेन्द्राने लावले डोके
एका नाथाने मारली कलटी
अन उद्धवभाऊले देल्ली पलटी
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर-मुटे
*पोळ्याच्या झडत्या… (२)*
ओके ओके म्हणता
आमदार झाले गोळा
आमदाराचा भाव म्हणे
सत्तर हजार रुपये तोळा
सोन्यापेक्षाबी हे तर
भलतेच महाग झाले
त्यायचं पाहून अपक्षबी
शेंडा-बूड न्हाले
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर-मुटे
*पोळ्याच्या झडत्या… (३)*
फुटला रे फुटला
उद्धवचा पोळा
पन्नास झाले आमदार
एकनाथपाशी गोळा
शरद म्हणे तुम्ही
खेळू नका रडी
आम्ही खाऊ कितीबी
तरी लावू नका ईडी
संजय माझा चेला
अन मी त्याचा गुरु
ईडीबिडी सापशिडी
नका करू सुरु
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर-मुटे
*पोळ्याच्या झडत्या… (४)*
कांदा रे कांदा,
अकलेचा कांदा
काँग्रेसनेच केला हो
राहुलचा वांदा
मग आल्या प्रियांका,
त्यायनं फुकला बिगुल
मग होती नोती थेयबी
हवा झाली गूल
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर-मुटे
*पोळ्याच्या झडत्या… (५)*
कांदा रे कांदा
नाशिकचा कांदा
घेणाराबी घेईना अन
भाव काही देईना
गळ्यातलं गेलं
नाकातलं गेलं
पायातलं गेलं
डोक्याचं गेलं
तरी बळीराज्याले जाग काही येईना
गेलं जरी कमरेचं.... संघटित काही होईना
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
पोळ्याच्या झडत्या - १
पोळ्याच्या झडत्या - १
वाडा रे वाडा,
शेतकऱ्याचा वाडा
शेतकऱ्याच्या वाड्यात
चांदीचा गाडा
चांदीच्या गाड्यावर
सोन्याचे मोर
मोरावर बसते
शेतकऱ्याचं पोर
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर_मुटे
=-=-=-=-=
शेतकरी तितुका एक एक!
पोळ्याच्या झडत्या - २
पोळ्याच्या झडत्या - २
तापला रे तापला
एकोपा तापला
एकोपा तापल्यावर
सरकारले झ्यापला
एक जण म्हणला धरा रे धरा
धरा रे धरा कचकचून धरा
अगुदर दे म्हणा आमचं आरक्षण
मंग जा तू आपल्या घरा
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर_मुटे
=-=-=-=-=
शेतकरी तितुका एक एक!
*पोळ्याच्या झडत्या - ३*
*पोळ्याच्या झडत्या - ३*
आटली रे आटली
तिजोरी आटली
सरकारची चड्डी
मंधामंधी फाटली
फाटलेल्या चड्डीले
ठिगळ काही बसेना
कांदे, टमाटर, सोयाबीनले
काळं कुत्रं पुसेना
इंडिया गेला चंद्रावर
भारताची झाली माती
आगुदर दे आमच्या शेतमालाले भाव
तवा सांग तुही छप्पन इंची छाती
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या_झडत्या #गंगाधर_मुटे
=-=-=-=-=
शेतकरी तितुका एक एक!
*पोळ्याच्या झडत्या - ४*
*पोळ्याच्या झडत्या - ४*
नाही दावली गुहाटी,
नाही पेल्ले खोके
पाठीमागं लावले फक्त
ईडीवाले बोके
घोरसू घोरसू बोक्यायनं
मंग असा कावा केला
एक एक नंदीबैल
खुट्यावरती आला
लोकशाहीची गंगा राज्या
वाहून राह्यली उल्टी
पुतण्याच मारते कल्टी
अन्
काकाले देते पल्टी
एक नमन गौरा पार्वती
हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या_झडत्या #गंगाधर_मुटे
=-=-=-=-=
शेतकरी तितुका एक एक!
पोळ्याच्या झडत्या - ५
पोळ्याच्या झडत्या - ५
शेतकऱ्यांचे उत्पन्न
करतो म्हणे दुप्पट
अन् तुह्या राज्यात तर राज्या
शेतकरी आत्महत्या तिप्पट
प्राण जाये पर बचन न जाय
पुराण वाचून पाह्य
बाचलटावानी बोलणं
काही कामाचं नाय
झेपत असंन भाऊ
तरच राज्य करा
नाहीतर घ्या आपलं धोतीबेलनं
आन व्हा आपल्या घरा
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या_झडत्या #गंगाधर_मुटे
=-=-=-=-=
शेतकरी तितुका एक एक!
*पोळ्याच्या झडत्या - १*
*पोळ्याच्या झडत्या - १*
बैना ओ बैना, लाडाची बहिणा
लाडाच्या बहिणीला पंधराशे महिना
पंधराशे रुपयाचे खावा गोलगप्पे
लाडाच्या भावाला द्या ठपाठप ठप्पे
मायबाप सरकार म्हणते लाडाची बैना
पाटलाची पाटी उरली जावयाची दैना
लाडाच्या बहिणीच्या नवऱ्याचे हाल
कुत्रंबी हुंगत नाही शेतातला माल
तुर केली आयात, पाडून टाकले भाव
स्वस्तामध्ये सोयाबीन, लुटून नेलं गाव
जावयाच्या छाताडावर कर्जाची रास
पंधराशेत जहर घ्यावं की घ्यावा गळफास
जरांगे म्हणतात ते खरं आहे भाऊ
घामाचं दाम नाही तर
अभय आरक्षणच घेऊ
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
- गंगाधर मुटे "अभय"
#गंगाधर_मुटे #पोळ्याच्या_झडत्या
एकतीस/आठ/दोन हजार चोवीस
=-=-=-=-=
https://www.baliraja.com/node/172
=-=-=-=-=
शेतकरी तितुका एक एक!
*पोळ्याच्या झडत्या*
*पोळ्याच्या झडत्या*
पोळा रे पोळा, बैलाचा पोळा
बैलाच्या खांद्याला लोण्याचा गोळा
लोण्याच्या गोळ्यात कृतज्ञ भाव
ओवळून जीवाला मानेला लाव
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
बैना ओ बैना, लाडाची बहिणा
लाडाच्या बहिणीला पंधराशे महिना
पंधराशे रुपयावर साऱ्यांचा डोळा
महागाईच्या दिमतीत फुटला पोळा
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
- *गंगाधर मुटे*
शेतकरी तितुका एक एक!
लोकसत्ता बातमी
https://www.loksatta.com/nagpur/farmers-express-concern-over-materials-c...
शेतकरी तितुका एक एक!
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप