![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
लेखनाचा विषय : रानातला पाऊस
शीर्षक: आठवणीतला पाऊस
अनुभवकथन स्पर्धा-२०२१ : विभाग : अ) पावसाचे आनंददायी अनुभव
आज पहिल्या पावसाची सुरुवात झाली मी छत्री, चप्पल याची नेहमी सोय करून ठेवतो व स्वतःची काळजी घेतो. पण, आज का ? कुणास ठाऊक ? अचानक मला माझे लहानपण आठवले. पहिला पाऊस पडताच भाताची लावणी लावण्याची माझ्या आई-बाबांची गडबड आठवली. खरंच माझ्या आठवणीतला पाऊस फारच वेगळा आहे आणि तो म्हणजे "रानातला पाऊस".
माझी आई सकाळी लवकर उठून न्याहारी करायच्या गडबडीत असायची. बाबांची तर खूपच धांदल चालू व्हायची. बाहेर जोरात पाऊस पडू लागला की आईचे हात भाकरीवर पटापट पडत असायचे. मी देखील आई-बाबांबरोबर थोरवी घेऊन पाटी-पेन्सिल घेऊन बाहेर पडायचो. एका झाडाखाली बसून सर्व दृश्य मी पाहत असायचो. लावणीला भरपूर ओळखीची लोक येत होती पाऊस मात्र कधी मुसळधार कधी रिमझिम असा भिन्नरूपी पडत असायचा. शेतामध्ये चिखल गुडघाभरून असायचा. मी देखील लावणीला जाण्यापूर्वी माझा अभ्यास पूर्ण करून जायचो. पण, बांधावर उभे राहून कड़ेची रोपे लावायचो. रिमझिम पाऊस पडत असायचा व आम्ही सर्व भाताची रोपे शेतात लावत असायचो. त्यावेळी आमच्याकडे पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्री, रेनकोट वगैरे काहीही नसायचे तर त्याऐवजी आमच्याजवळ इरले आणि घोंगडी सोबतच चांबराकडून बनवून घेतलेली टायरची चप्पल असायची.
रानात खूप वेळ राबल्यावर थकायला व्हायचे. मध्येच थोडीशी विश्रांती म्हणून आम्ही सर्वजण चहा घ्यायचो. खरं तर तो चहा पावसाच्या पाण्यात मिसळलेला असायचा, कारण वरून पाऊस पडत होता व त्या पावसातच सर्वजण चहा पीत असायचे. थोडा पाऊस थांबताच विश्रांती म्हणून सर्व लोकं बसत होती. नंतर पाऊस आला की उठून परत जोमाने कामाला लागत होती आणि हो सोबत काही रेडिओ वगैरे नसताना देखील सर्व बायका व माझी आई देखील करमणूक म्हणून मोठमोठ्याने ओवी म्हणत असे आणि या ओव्यांवर सर्व पुरुष मंडळी देखील दाद देत असत. वेळ मिळाला तर शेतातच हातावर भाकरी घेऊन आम्ही खात होतो. कोणत्या भाकरीला चव नेहमी सारख्या भाकरी पेक्ष्या जास्त असायची.
असाच नित्यक्रम चालू असायचा सूर्यास्त होईपर्यंत पावसामध्ये मनोसोक्त लावणी करून थकून भागून घरी परतायचो अजून ते दिवस व त्या पावसाळ्यातले काही क्षण मनातच जपून ठेवले आहेत. पावसाचे दिवस आले की मला आवर्जून माझ्या गावची भात लावणी आठवते. कधी-कधी पाऊस खूपच पडून जात होता कधी-कधी आम्हाला वाट बघायला लावायचा. असा हा माझ्या आठवणीतील रानातला पाऊस. हल्ली मात्र हा पाऊस मी पर्यटक म्हणून पहात असतो. धबधब्याखाली भिजताना मला रानातला पाऊस नक्कीच आठवतो कारण त्या भिजण्याची जी मजा होती ती या भिजण्यात नव्हती. अजुनही त्या लावणीतल्या ओळी मला स्पष्ट आठवत आहेत.
"असे नाळ जुळलेली बाई संगे या भाताची
बिया माहेरी रुजती रोपे सासरी नांदती
म्हणून बाईच्या कुशीत आहे ओटी तांदळाची"
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी,
भास होती आता आम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी.!
नाव: भूषण सहदेव तांबे
पत्ता: बिल्डिंग नंबर २२ / रूम नंबर २२, बी.पी.टी. जुनी कॉलनी, नाडकर्णी पार्क, वडाळा, पूर्व, मुंबई. पिन कोड- ४०० ०३७
ई-मेल: bhushantambe88@gmail.com
व्हाट्सअप क्र.: ९०२९२५८०३८.
प्रतिक्रिया
अप्रतिम साहित्य लेखन भूषण सर.
अप्रतिम साहित्य लेखन भूषण सर.
खूप सुरेख लेखन.
अप्रतिम लेखन...
अप्रतिम लेखन...
मस्तच... वाह...!!!
अप्रतिम लेखन छान आठवणीतला
अप्रतिम लेखन छान आठवणीतला पाऊस
अप्रतिम लेखन भूषण.
खूप खूप छान लेखन लिहिले आहे.
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
http://www.baliraja.com/node/118
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - ११
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप