नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०१९ : वर्ष ६ वे*
पद्यलेखन स्पर्धा-२०१९ : विभाग* : अ) पद्यकविता
|| विळखा कर्जाचा ||
आजकाल ह्या पावसाचं काही खरं नाही
त्याच्यावर विसंबून काही राहता येत नाही ||
कधी असते अवकाळी तर कधी कधी दुष्काळी
किती पेरावं कधी पेरावं प्रश्नच पडतात मायंदळी ||
पेरलं तर उगवलं ह्याची खात्री नसते काही
उगवलं तर भीती सतत किड्याकीटकांची राही ||
एखादं बारीला येतं की पिकं हो मुबलक येरवाळी
बाजारभावानं बळीराजाची तोंड मात्र पडतात काळी ||
विळखा कर्जाचा जातो आवळला बळीराजाच्या मानेला
लुटतात सरकार व सावकार दोन्ही हातांनी बळीराजाला ||
जगतो बिचारा आशेवर मिळेल योग्य दाम त्याच्या पिकाला
फिकीर कुठे असते हो त्याच्या ह्या व्यथांची मुर्दाड सरकारला ||
असतात की हो त्याची पण संसाराची स्वप्न हलकी फुलकी
दोनाचे चार हात करून धाडावे लाडक्या लेकीला सुखासुखी ||
नसतो अधिकार बळीराजाला ही असली सुखी स्वप्न पाहण्याचा
रोष असतो त्याच्यावर ज्यांच्यासाठी तो खपतो त्याच शहरी माणसांचा ||
बेजार होतो लाचार होतो परिस्थती पुढे तो माघारही घेतो
कंटाळून शेवटी पत्करून शरणागती गळ्याला फास आवळतो ||
तो जातो उघड्यावर टाकुनी लेकरंबाळ, करुनी विधवा बायकोला
अजुन एक मेला, लटकून, नोंद होते त्याची सरकारी दप्तराला ||
नाही संपत ही शोकांतिका अशी ह्या कर्जाच्या विळख्याची
आज त्याची पाळी होती, तर उद्या असेन अजून कुणाची ||
आपला स्नेहांकित,
रविंद्र कामठे
प्लॉट न. ६, स्वाती सोसायटी, "गुरु-सदन", धनकवडी, पुणे - ४११०४३
इमेल - ravindrakamthe@gmail.com. भ्रमणध्वनी - ९८२२४ ०४३३०.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने