Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***अस्तुरी जन्मा नको घालू श्रीहरी

*अस्तुरी जन्मा नको घालू श्रीहरी*

आज जागतिक महिला दिन. कोणताही समाज प्रगती करत असताना त्या समाजातील महिलांची त्याच प्रमाणात प्रगत होत असतात असे आपण म्हणतो. ते खरे ही आहे पण प्रगत होणे म्हणजे नेमके काय? या बाबत ही अनेकांच्या कल्पना भिन्न भिन्न असू शकतात. जभरातील महिलांनी या शतकात बरीच प्रगती केली आहे. सर्व क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी मोडत आपला कर्तुत्वाचा ठसा उमठवला आसला तरी सर्वसाधारण महिलांचे जीवन संकुचितच राहिले आहे.
महिला प्रगत होणे म्हणजे महिलांचे शोषण करणार्‍या रुढी परंपरांमधून सुटका करणे, शिक्षणाला प्रोत्साहन देणे, अधिकाधिक स्वतंत्र्य देणे, शारिरीक कष्ट कमी करणे व समाजात महिलांना सन्मान असणे हे साधारण परिमाण आपण गृहित धरतो. लैंगिक शोषणाचा विषय हा न संपणारा विषय आहे असे वाटते. समाज मागास असो की प्रगत लैंगिक शोषण होत असते. देवादिकाच्या काळापासून हे घडत आले आहे. शनी महात्म्याच्या पोथीत असे म्हटले आहे, " शनी आला इंद्र राया, भोगिली गौतमाची जाया. शनी आला चंद्राशी, कलंक लाविला गुरू पत्नीशी". हे कमी अधिक प्रमाणात होतच राहणार आहे. याला कायद्याचा वचक असणे गरजेचे आहे. त्यामानाने, असे दिसते की मागास अदिवासी समाजात बलात्कार किंवा लैंगिक शोषणाचे प्रकार कमी अढळतात.
भारताच्या पुर्वोत्तर राज्यांमध्ये स्त्री प्रधान संस्कृतीचा प्रभाव काही प्रमाणात अढळतो. तेथील स्त्रिया अधीक स्वतंत्र वाटतात व निर्णयप्रक्रियेत त्यांचा महत्व‍चा वाटा असतो. संपत्तीच्या वाटपातही स्त्रीयांना वाटा मिळतोच. आणि हे कोणत्याही कायद्याने नाही तर परंपरेने चालत आलेली व्यवस्था आहे.
शिक्षणच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या मुली व नोकरी करणार्‍या स्त्रीया अधिक स्वातंत्र्य उपभोगताना दिसतात.
हल्लीच उत्तर प्रदेशच्या पुर्व भागातील जिल्ह्यात फिरण्याचा योग आला. त्या मानाने बराच मागासलेला भाग व गरीब जनता. महिला अजुनही डोक्यावरुन पदर घेत पुर्ण चहरा झाकुनच वावरताना दिसल्या. शेतातील कामाशिवाय इतर कामात फारशा महिला नाहीत. दुसरे काही करावे असे पर्याय ही नाहीत. महिलांशी चर्चा करताना असे लक्षात आले की जर या भागाचा औद्योगिक विकास झाला असता तर महिलांना रोजगार मिळाला असता व त्या अधीक स्वातंत्र्यात जगल्या असत्या. पर्याय नसलेल्याच स्त्रीया शेतात कामाला जातात. ज्या कुटुबातील पुरूष मुंबई, दिल्ली, सूरत सारख्या शहरात जाऊन कमाई करत आहेत, ते घरी पेैसे पाठवतात व घरच्या स्त्रीला कोणाच्या शेतात कामाला जाऊ नको असे सांगतात. इथे प्रतिष्ठचा विषय येतो. घरातली महिला रोजंदारीने दुसर्‍याच्या शेतात कामाला जाणे अप्रतिष्ठेचे मानले जाते. इथे पुर्ण घुंगटची पंपरा पाळणार्‍या कुटुंबातील मुली, शिक्षणासाठी पुण्याला आलेल्या मात्र अतिशय छोट्या कपड्यात वावरताना दिसतात. हे स्वातंत्र्य उपभोगण्याचे मिळालेल्या संधीचा त्या पुरेपूर फायदा घेताना दिसतात.
विसाव्य‍ा शतकाच्या सुरुवाती पासून जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. महिलांना मतदानाचा हक्क हवा यातून चळवळ सुरु झाली. रशियातून सुरु झालेला हा उपक्रम आज जगभर साजरा होतो. या मोहोत्सवाचा उद्देश , महिलांना प्रतिष्ठा, सन्मान व प्रेम मिळावे यासाठी जागृती करत लिंगभेद नष्ट करणे असा आहे. भारतात याची फारच गरज आहे. भारतात रोज सरासरी ७७ बलात्कार होतात याच्यावरून अंदाज यावा. भारतातील महिलांना सुरक्षा, सन्मान, प्रतिष्ठा मिळायला आणखी अनेक दशके वाट पहावी लागेल. आजही भारतातील बहुतेक महिला गुलामीचेच जिणे जगताना दिसतात. याचे कारण आर्थिक विकासाशी जोडता येईल. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी नेहमी म्हणत की शेतकरी महिला या गुलामाच्या गुलाम आहेत. भारतातील शेतकरी हा या व्यवस्थेचा गुलाम आहे व शेतकर्‍याची बायको त्याची गुलाम.
शेतकर्‍याच्य‍ा खिशात पैसे फारसे येत नाहीत. आले तर सर्व देणी देऊन उरले तर घरातील महत्वाच्या गरजा भागवायच्या. त्यातून उरले तरच घरातील महिलेसाठी काही खर्च केला जातो. शेतकरी शेतात पिकलेला माल विकून आल्या नंतर कधी आपल्या बायकोला घेऊन मोठ्या शहरात गेला व तिच्या पसंतीची साडी तिच्यासाठी खरेदी केली असे सहसा होत नाही. कुठे लग्नाला गेल्या, बारशाला गेल्या, घरभरणीला गेल्या, तिकडून ज्या साड्या येतात त्यावर पुर्ण आयुष्य काढावे लागते ही शेतकरी महिलांची शोकांतिका आहे.
महिलांची प्रतिष्ठा, सन्मान हे त्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीशी निगडीत आहे. संपत्तीतील वाट्याशी आहे. उत्पन्नातील तिच्या हक्काशी आहे. तशी व्यवस्था अद्याप आपल्याकडे नाही. लग्न होई पर्यंत वडिलांच्या, भावांच्या दाबाखली जगायचं, लग्नानंतर नवर्‍याच्या ताबेदारीत जगायचं‍, पुढील आयुष्य मुला सुनांच्या म्हणण्यानुसार जगायचं हे भरतातील ग्रामीण महिलेचे जीवन आहे. आयुष्याच्या शेवटी तिची पांघरायची गोधडी व पायातील चप्पल हीच "तिची संपत्ती" असते. म्हणुन त्या मनानल्या मनात म्हणत असतात 'अस्तुरी जन्मा नको घालू श्रीहरी, आयुष्यभर परायाची ताबेदारी!!'
स्त्रीची अनेक रुपे आपण पहातो. घरात बागडत, आईला घरकामात मदत करणारी कन्या, लग्नानंतर आपले घर त्यागून पुर्ण नवीन विश्वात संसार थाटणारी गृहिणी, जवाबदार आई अशा अनेक भुमिका पार पाडणारी स्त्री ही प्रतिष्ठा व सन्मानाची हक्कदार आहे. आज जागतिक महिलादिनाच्या नमित्ताने महिलांना त्यांचा हक्क देण्यासाठी काही प्रयत्न सुरू करू या. किमान आपल्या कुटुंबात तरी!!
०८/०३/२०२२
अनिल घनवट
राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष.
९९२३७०७६४६

Share