Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह

केवळ विनोदासाठी

        अनेक वाचकांच्या आग्रहाखातर हा परंपरागत विनोदी कथा/चुटकुले अर्थात विनोदी लेखनाचा धागा सुरु करण्यात आला आहे. इथे विनोदी रचनांचे संकलन होणार असल्याने रचना/विनोद/चुटकुले स्वरचित असणे अनिवार्य नाही. रचना स्वतःची असल्यास रचनेखाली नाव लिहावे. संकलित असल्यास कंसामध्ये संकलित असे लिहावे. रचना निर्मात्याचे नाव माहित असल्यास रचनाकार/लेखक/कवी म्हणून नाव लिहावे. 
खालील प्रतिसादामध्ये आपल्या रचना सादर कराव्यात.
******
प्रताधिकारासंबंधी : विनोदाचा निर्भेळ आनंद घेण्याच्या स्वच्छ उद्देशाने हा धागा असून संबंधित रचनाकाराचे नाव माहित झाल्यास रचनेखाली नाव लिहिण्यात येईल किंवा संबंधितांच्या इच्छेनुसार रचना काढून टाकली जाऊ शकेल. 

Share

प्रतिक्रिया

 • Arvind's picture
  Arvind
  सोम, 12/02/2024 - 21:12. वाजता प्रकाशित केले.

  वडिलांनी मुलाला वीज बिल जमा करण्यासाठी पैसे दिले...मुलाला काय वाटलं काय माहीत त्याने त्या पैश्याचे लॉटरीचं तिकीट घेतले.बापाने विचारले.. " वीज बिल भरलं का ?कारण उद्या बिल जमा करण्याचा शेवटचा दिवस होता. लेकराने घाबरून सांगितले...नाही त्या पैशाने घेतली लॉटरीची तिकिटे, कारण "आपण जिंकू शकतो लॉटरीमध्ये नवीन चमकदार बोलेरो कार" बापाने लय मारला ! दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी घराचे दरवाजे उघडले तेव्हा समोर नवीन चमकत बोलेरो गाडी उभी होती! संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू आले. सर्वजण एकमेकांकडे आश्चर्य आणि उत्सुकतेने पाहत होते. मुलाच्या डोळ्यात सर्वात जास्त अश्रू आले आणि तो खूपच अस्वस्थ दिसत होता..... कारण ती बोलेरो गाडी वीज खात्याची होती.... आणि ते विजेची लाईन कापायला आले होते. बापाने पुन्हा लय मारला! म्हणून गरजेच्या कामांसाठी बिनकामाच्या पोरांच्या भरोशावर राहू नका आणि वेळेवर वीज बिल जमा करा. Wink

 • Arvind's picture
  Arvind
  सोम, 12/02/2024 - 21:16. वाजता प्रकाशित केले.

  रात्री दोन वाजता तावडे हॉटेल चौकात लक्झरी बसमधून तो उतरला. त्याला कोल्हापूरला जायचं होत. पण रस्त्यावर काळाकुट्ट अंधार होता. सुनसान रस्त्यावर चिटपाखरू दिसत नव्हतं. रिक्षा मिळणार कशी.. तो चालत राहिला. दुर्दैव असं की त्याच वेळी पाऊस सुरु झाला रस्त्यावरचे लाईट गेले पण सुदैवाने एक रिक्षा गांधीनगर कडून हळूहळू कोल्हापूर कडे येताना दिसली. तिला हात केला रिक्षा थांबायच्या आत तो पटकन रिक्षात बसला. पाऊस जोरात पडायला लागला रिक्षा हळू हळू चालत होती. रिक्षा प्रवासात तो नशिबावर खुश झाला. कोल्हापूर जवळ आल्याचं त्याच्या काळोखातही लक्षात आलं. आपण मनुष्य वस्तीत आलो या विचाराने त्याला सुरक्षित वाटू लागल. त्याच वेळी समोरून, हायवेच्या दिशेने एक वेगात कार आली. कारच्या प्रखर प्रकाशात त्याला जे दिसलं ते पाहून त्याला थंडीतही घाम फुटला रिक्षा तर चालत होती पण ड्रायव्हर सिटवर कोणी नव्हतं. त्याने उसने अवसान आणून रिक्षातून उडी मारली आणि मार्केट यार्ड च्या कमानी जवळ जाऊन बसला. पाऊस संपला. पहाटेचे पाच वाजले तरी तो कमानी जवळच बसून राहीला. तर समोर एक रिक्षा त्याला दिसली त्यात तो बसला पत्ता सांगितला. मग बोलता बोलता रात्रीचा प्रसंग त्याने रिक्षा वाल्याला वर्णन करून संगीतला तर रिक्षा वाल्याने कचकन ब्रेक दाबला त्याला बाहेर ओढला नी ब ब बडवायला सुरुवात केली . अस्सल कोल्हापूरी शिव्यांचा पाऊस पण सुरु होताच.. याला कळेना आपल्याला हा का मारतोय.. त्याने कसं तरी विचारलं ... मी काय केलं..? तर रिक्षावाला म्हणाला माझी रिक्षा काल रात्री भर पावसात बंद पडली म्हणून मी ढकलत आणत होतो. तू रांडच्या त्यात बसला होतास व्हय.. तरीच म्हटलं रिक्षा ढकलताना इतकी ताकद का लावावी लागली... Lol : DD
  .

  .

  Lol
  .

  .

  हसलात ना हसायलाच पाहिजे.

  भावानो जीवन सुंदर आहे . Lol

 • Arvind's picture
  Arvind
  बुध, 21/02/2024 - 16:17. वाजता प्रकाशित केले.

  गुरुजी : बंड्या आज डब्याला काय आणलं आहेस… बंड्या : गुरुजी पुरणपोळी आणली आहे…
  गुरुजी : मला देशील का तुझा डबा.. मी आज डब्बा आणला नाही
  बंड्या : हो देईल…
  गुरुजी : पण तुझ्या आहे न विचारल्यावर काय सांगशील?
  बंड्या : सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 22/02/2024 - 11:13. वाजता प्रकाशित केले.
  मी बोट दाखवत Bus Bay (बस बे) म्हणालो तर तो म्हणाला... का बसू?

  मी कुणाच्या बापाच्या जागेवर उभा आहे का?

  म्हणून मराठीत "बस स्टॅन्ड" असेच म्हणत चला रे ब्वॉ. नसत्या आफती नकोत. Lol 

   

  #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे

  Facebook Link

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 22/02/2024 - 11:16. वाजता प्रकाशित केले.
  एक पोरगी वावरामधी दिसली होती, पाह्यली होती
  चिखलामधी पडली होती..... शेणामध्ये भरली होती
  ए...... लाव रे थो व्हिडीओ SSSS

  शेतकरी तितुका एक एक!

 • पाने