एक मुकी कविता : शेतकरी गीत ।।१९।।
मेघांचं पाणी डोंगरात आलं
डोंगराचं पाणी धरणात आलं
धरणाचं पाणी नदीत आलं
नदीचं पाणी शेतात आलं
शेताला डुबवत चौखूर झालं
पुराच्या जटा, हवेच्या बटा, डोळ्यात मावंना
माझं शेत दिसंना रं, माझं पीक दिसंना
धस्स माका धस्स माका धस्स माका धा
धस्स माका धस्स माका धस्स माका धा
धस्स माका धस्स माका धस्स माका धा
धस्स माका धस्स माका धस्स माका धा
माझी गाय दिसंना रं, माझं बैल दिसंना
धस्स माका धस्स माका धस्स माका धा
धस्स माका धस्स माका धस्स माका धा
धस्स माका धस्स माका धस्स माका धा
माझं घर दिसंना रं, माझं कौल दिसंना
धस्स माका धस्स माका धस्स माका धा
धस्स माका धस्स माका धस्स माका धा
धस्स माका धस्स माका धस्स माका धा
माssझं बाळ दिसंना ssरं,
माsssझं धनीबी दिसंsssना
- गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
तीस/सात/दोन हजार बावीस
=÷=÷=÷=÷=