Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह

Main page content

Profile picture for user admin
By admin | 6:55 PM IST, शनी October 07, 2017

केवळ विनोदासाठी

        अनेक वाचकांच्या आग्रहाखातर हा परंपरागत विनोदी कथा/चुटकुले अर्थात विनोदी लेखनाचा धागा सुरु करण्यात आला आहे. इथे विनोदी रचनांचे संकलन होणार असल्याने रचना/विनोद/चुटकुले स्वरचित असणे अनिवार्य नाही. रचना स्वतःची असल्यास रचनेखाली नाव लिहावे. संकलित असल्यास कंसामध्ये संकलित असे लिहावे. रचना निर्मात्याचे नाव माहित असल्यास रचनाकार/लेखक/कवी म्हणून नाव लिहावे. 
खालील प्रतिसादामध्ये आपल्या रचना सादर कराव्यात.
******
प्रताधिकारासंबंधी : विनोदाचा निर्भेळ आनंद घेण्याच्या स्वच्छ उद्देशाने हा धागा असून संबंधित रचनाकाराचे नाव माहित झाल्यास रचनेखाली नाव लिहिण्यात येईल किंवा संबंधितांच्या इच्छेनुसार रचना काढून टाकली जाऊ शकेल. 

विडंबन
केवळ विनोदासाठी
विनोदी मिर्चीमसाला
व्हाटसपवरील विनोद
विनोद
विनोदी लेखन
व्हाटसप
Whats app
फेसबुक
Facebook
Tweeter
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 73701 views
वडिलांनी मुलाला वीज बिल जमा

Arvind

सोमवार, February 12, 2024 - 21:12
Permalink
New

वडिलांनी मुलाला वीज बिल जमा करण्यासाठी पैसे दिले...मुलाला काय वाटलं काय माहीत त्याने त्या पैश्याचे लॉटरीचं तिकीट घेतले.बापाने विचारले.. " वीज बिल भरलं का ?कारण उद्या बिल जमा करण्याचा शेवटचा दिवस होता. लेकराने घाबरून सांगितले...नाही त्या पैशाने घेतली लॉटरीची तिकिटे, कारण "आपण जिंकू शकतो लॉटरीमध्ये नवीन चमकदार बोलेरो कार" बापाने लय मारला ! दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी घराचे दरवाजे उघडले तेव्हा समोर नवीन चमकत बोलेरो गाडी उभी होती! संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू आले. सर्वजण एकमेकांकडे आश्चर्य आणि उत्सुकतेने पाहत होते. मुलाच्या डोळ्यात सर्वात जास्त अश्रू आले आणि तो खूपच अस्वस्थ दिसत होता..... कारण ती बोलेरो गाडी वीज खात्याची होती.... आणि ते विजेची लाईन कापायला आले होते. बापाने पुन्हा लय मारला! म्हणून गरजेच्या कामांसाठी बिनकामाच्या पोरांच्या भरोशावर राहू नका आणि वेळेवर वीज बिल जमा करा. ;)) ;)

  • Log in or register to post comments
रात्री दोन वाजता तावडे हॉटेल

Arvind

सोमवार, February 12, 2024 - 21:16
Permalink
New

रात्री दोन वाजता तावडे हॉटेल चौकात लक्झरी बसमधून तो उतरला. त्याला कोल्हापूरला जायचं होत. पण रस्त्यावर काळाकुट्ट अंधार होता. सुनसान रस्त्यावर चिटपाखरू दिसत नव्हतं. रिक्षा मिळणार कशी.. तो चालत राहिला. दुर्दैव असं की त्याच वेळी पाऊस सुरु झाला रस्त्यावरचे लाईट गेले पण सुदैवाने एक रिक्षा गांधीनगर कडून हळूहळू कोल्हापूर कडे येताना दिसली. तिला हात केला रिक्षा थांबायच्या आत तो पटकन रिक्षात बसला. पाऊस जोरात पडायला लागला रिक्षा हळू हळू चालत होती. रिक्षा प्रवासात तो नशिबावर खुश झाला. कोल्हापूर जवळ आल्याचं त्याच्या काळोखातही लक्षात आलं. आपण मनुष्य वस्तीत आलो या विचाराने त्याला सुरक्षित वाटू लागल. त्याच वेळी समोरून, हायवेच्या दिशेने एक वेगात कार आली. कारच्या प्रखर प्रकाशात त्याला जे दिसलं ते पाहून त्याला थंडीतही घाम फुटला रिक्षा तर चालत होती पण ड्रायव्हर सिटवर कोणी नव्हतं. त्याने उसने अवसान आणून रिक्षातून उडी मारली आणि मार्केट यार्ड च्या कमानी जवळ जाऊन बसला. पाऊस संपला. पहाटेचे पाच वाजले तरी तो कमानी जवळच बसून राहीला. तर समोर एक रिक्षा त्याला दिसली त्यात तो बसला पत्ता सांगितला. मग बोलता बोलता रात्रीचा प्रसंग त्याने रिक्षा वाल्याला वर्णन करून संगीतला तर रिक्षा वाल्याने कचकन ब्रेक दाबला त्याला बाहेर ओढला नी ब ब बडवायला सुरुवात केली . अस्सल कोल्हापूरी शिव्यांचा पाऊस पण सुरु होताच.. याला कळेना आपल्याला हा का मारतोय.. त्याने कसं तरी विचारलं ... मी काय केलं..? तर रिक्षावाला म्हणाला माझी रिक्षा काल रात्री भर पावसात बंद पडली म्हणून मी ढकलत आणत होतो. तू रांडच्या त्यात बसला होतास व्हय.. तरीच म्हटलं रिक्षा ढकलताना इतकी ताकद का लावावी लागली... :D : DD
.

.

:D :DD
.

.

हसलात ना हसायलाच पाहिजे.

भावानो जीवन सुंदर आहे . :D

  • Log in or register to post comments
गुरुजी : बंड्या आज डब्याला

Arvind

बुधवार, February 21, 2024 - 16:17
Permalink
New

गुरुजी : बंड्या आज डब्याला काय आणलं आहेस… बंड्या : गुरुजी पुरणपोळी आणली आहे…
गुरुजी : मला देशील का तुझा डबा.. मी आज डब्बा आणला नाही
बंड्या : हो देईल…
गुरुजी : पण तुझ्या आहे न विचारल्यावर काय सांगशील?
बंड्या : सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून

  • Log in or register to post comments
मी बोट दाखवत Bus Bay (बस बे)

गंगाधर मुटे

गुरुवार, February 22, 2024 - 11:13
Permalink
New

मी बोट दाखवत Bus Bay (बस बे) म्हणालो तर तो म्हणाला... का बसू?

मी कुणाच्या बापाच्या जागेवर उभा आहे का?

म्हणून मराठीत "बस स्टॅन्ड" असेच म्हणत चला रे ब्वॉ. नसत्या आफती नकोत. Lol 

 

#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे

Facebook Link


  • Log in or register to post comments
एक पोरगी वावरामधी दिसली होती,

गंगाधर मुटे

गुरुवार, February 22, 2024 - 11:16
Permalink
New

एक पोरगी वावरामधी दिसली होती, पाह्यली होती

चिखलामधी पडली होती..... शेणामध्ये भरली होती

ए...... लाव रे थो व्हिडीओ SSSS

  • Log in or register to post comments
एक बेवडा गच्चीतून खाली पडला.

गंगाधर मुटे

रवीवार, February 25, 2024 - 05:43
Permalink
New

एक बेवडा गच्चीतून खाली पडला.
आजुबाजुचे धावत आले आणि
विचारले...
“काय रे काय झाले”?
बेवडा : काही माहीत नाय बुवा,
मी पण आत्ताच खाली आलोय… :D :D

  • Log in or register to post comments
पुणेरी नवरा :- अगं, ऐकलस का?

Arvind

रवीवार, February 25, 2024 - 06:08
Permalink
New

पुणेरी नवरा :- अगं, ऐकलस का? घरी पाहुणे आलेत ना, त्यांना जेवणाचे विचार जरा…
पुणेरी बायको :- भावजी, तुम्ही घरून जेवून आलात की घरी गेल्यावर जेवणार??
कोल्हापुरी पाहुणा : न्हाई मी हितचं जेवणार
पुणेरी बायको : डबा घेऊनच आलाय काय?
कोल्हापुरी पाहुणा : व्हय… भरून पण न्हेणार हाय….

प्रत्येक वेळी पुणेच जिंकते, असे नाही. कधी कधी कोल्हापूर सुद्धा जिंकत्येय. :D :DD

  • Log in or register to post comments
चोर चोरी करायला येतो तेव्हा

Arvind

मंगळवार, March 12, 2024 - 14:46
Permalink
New

चोर चोरी करायला येतो तेव्हा तिजोरीवर लिहिलेलं असतं - “फोडण्याचा प्रयत्न करू नका... फक्त बटण दाबा आपोआप उघडेल”
ते वाचून चोर खुशीने बटण दाबतो,
त्यानंतर लगेचच पोलिस त्याला पकडायला येतात.
तेव्हा चोर म्हणतो,
"आज माझा माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे."

  • Log in or register to post comments
एक दिवस मास्तर पैसे काढायला

Arvind

बुधवार, April 3, 2024 - 17:51
Permalink
New

एक दिवस मास्तर पैसे काढायला एटीएम केंद्रात गेले… तर एटीएम मशीन खराब होते. चेकबुक मास्तरांजवळच होते म्हणून ते बँकेत गेले आणी एक हजाराचा चेक भरून कॅशियरकडे दिला.
कॅशियर म्हणाला, सर पाच हजारांहून कमी रकमेला चार्ज लागेल. मास्तरांनी दुसरा चेक सहा हजाराचा लिहीला अन् कॅशियरला दिला. त्याने सहा हजार मास्तरांना दिले.
मास्तरांनी त्यातले एक हजार खिशात ठेवले आणी पाच हजार रूपये भरण्याचा अर्ज भरून कॅशियरकडे दिला. आता कॅशियर मास्तरांकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होता.
मास्तर म्हणाले, हा नियम बनवणारा तूमचा साहेब आहे ना तो माझ्या वर्गात शिकत होता, सांगा त्यांना गुरुजी आले होते..!!

  • Log in or register to post comments
मला माझ्या चुकांमधून खूप काही

गंगाधर मुटे

बुधवार, October 23, 2024 - 15:21
Permalink
New

मला माझ्या चुकांमधून खूप काही शिकायला मिळालं...

म्हणुन मी ठरवलंय...
खूप चुका करायच्या आणि खूप शिकायचं!

:D :D

  • Log in or register to post comments
नर्स - सर,आपण इतके चिंतेत का

Andi2702

शनीवार, October 26, 2024 - 19:58
Permalink
New

नर्स - सर,आपण इतके चिंतेत का ?
डॉक्टर - काय सांगू ? दुपारी ज्या रुग्णाची शस्त्रक्रिया केली होती,त्याचा मृत्यू झालाय.कारण कळत नाही...
नर्स - अहो सर, ते तर पोष्टमार्टेम होतं.
डॉक्टर - खरंच !
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मग मी सकाळी पोष्टमार्टेम कुणाचं केलं ? :D :D

  • Log in or register to post comments
बायको म्हणजे पेपरवेट सारखी

Arvind

शुक्रवार, November 8, 2024 - 15:42
Permalink
New

बायको म्हणजे पेपरवेट सारखी असते. ती नवऱ्याला फडफडू तर देते पण उडू देत नाही.

:) :D :D

  • Log in or register to post comments
एकदा एस टी त बसलेल्या

Andi2702

रवीवार, November 10, 2024 - 12:41
Permalink
New

एकदा एस टी त बसलेल्या कॉलेजच्या मुलाला कंडक्टर म्हणाले,
"हा मोबाईल तुला तुझ्या आयुष्यात फार पुढे नेईल"

आनंदाने कॉलेजकुमार म्हणाला,
" अरे वा! कसे?

कंडक्टर म्हणाले,
"तुझा स्टॅाप मागे जाऊन दोन तास झालेत... तू फारच पुढे आला आहेस"

  • Log in or register to post comments
जर तुम्ही 5 रुपयाच्या पारले

गंगाधर मुटे

शुक्रवार, December 6, 2024 - 21:10
Permalink
New

जर तुम्ही 5 रुपयाच्या पारले ला पार्लेजी म्हणता तर चारशे रुपये किलोच्या लसूनला लसुनजी का नाही म्हणत? कुठे गेले तुमचे संस्कार? :D :D

  • Log in or register to post comments
वर्गशिक्षक :(गणपतरावांना) अहो

Andi2702

सोमवार, December 9, 2024 - 15:09
Permalink
New

वर्गशिक्षक :(गणपतरावांना) अहो, तुमचं मुलाकडे काही लक्ष आहे की नाही? तुमचा मुलगा नापास झालाय.
हे बघा त्याचं प्रगतीपुस्तक.

इंग्लिश - २०,
मॅथ्स - १७,
हिंदी - १४,
सायन्स - २१,
इतिहास-भूगोल - २३.
टोटल - ९५

गणपतराव :- अरे वा !!
टोटलमध्ये तर कमालच केलीय की ! कोण शिकवतं हा विषय?

  • Log in or register to post comments
*बायको* : - *३ किलो वटाणा घेऊ

Andi2702

शुक्रवार, December 13, 2024 - 18:57
Permalink
New

*बायको* : - *३ किलो वटाणा घेऊ का ?*

*नवरा*:- *हो* *घेऊन टाक...*
*त्यात मला काय विचारायाच??*

*बायको: -*
*मी तुम्हाला सल्ला नाही विचारला*

*सोलणार ना इतका वटाणा ?*

*का कमी घेऊ ?*

  • Log in or register to post comments
आधी आपण थंड हवेच्या ठिकाणी

Andi2702

बुधवार, December 18, 2024 - 20:59
Permalink
New

आधी आपण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचो..

 

 

 

 

आता थंड हवा च आपल्याकडे फिरायला येते 

 

 

 

 

 

अजून किती विकास पाहिजे 

  • Log in or register to post comments
यंदा माथेरानला जायचं होतं.

गंगाधर मुटे

बुधवार, December 18, 2024 - 21:26
Permalink
New

यंदा माथेरानला जायचं होतं. कामाच्या व्यापामुळे नाही गेलो. शेवटी माथेरानच माझ्याकडे मुक्कामी आलं.

 

#अपुन_मानुसच_लैभारी #गंगाधर_मुटे

  • Log in or register to post comments
एक डॉक्टर के पड़ोसी को नशे की

Andi2702

बुधवार, July 9, 2025 - 13:40
Permalink
New

एक डॉक्टर के पड़ोसी को नशे की बुरी आदत थी और जम के शराब पीता था।

डॉक्टर ने एक दिन उसको समझते हुए कहा शराब का नशा आहिस्ता आहिस्ता इंसान को मार देता है।

नशेड़ी ने मुस्कुराते हुए जवाब दिया तो डॉक्टर साहब मुझे कौन सी करने की जल्दी है?

  • Log in or register to post comments
तुम्हाला विनोदबुद्धी कुठून

Andi2702

बुधवार, July 16, 2025 - 21:19
Permalink
New

तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली?

ह्या प्रश्नाचे उत्तर मला सुचवणाऱ्याला मी इष्टेट लिहून देईन. मला वाडवडिलार्जित फक्त आजपर्यंत संधिवात मिळाला आहे. आजीला दमा होता, त्या वाटणीची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहात आहे. विनोदबुद्धी कोण देणार?

ज्याने मला डोळे दिले (चष्मा वगळून- तो मी विकत घेतला.) त्याखेरीज ते दातृत्व मी आणखी कुणाच्या वाट्यावर जमा करू?

गणितातला कच्चेपणा, मी माझ्या एका मामाकडून मिळवला. चित्रककलेतील अधोगतीला एक दूरचा चुलता जिम्मेदार आहे. सिग्रेटी फुंकायचे व्यसन माझ्या एका आतेभावाने लावले.
इतिहासाचा तिटकारा इतिहासाच्याच गुरूजींनी निर्माण केला! त्यामुळे शिवाजीचा गुढगी रोग मी औरंगजेबापर्यंत नेऊन पोचवला आहे, आणि इंग्लंडच्या गादीवरच्या चार्लसबरोबर अनेक हेन्री मंडळींची मुंडकी तिमाही - सहामाहीत ह्या हाताने उडवली आहेत.

संगीताची आवड ही शेजारच्या घरात वेळी अवेळी पेटी बडवणा-या एका इसमावर सूड म्हणून उत्पन्न करून घेऊन त्याची पेटी बंद पाडली.

नाटकात पहिली भूमीका मिळाली, ती 'नरवीर तानाजी मालुसरे' ह्या नाटकाच्या सोनावणे मास्तरांनी 'डायरेक्शन' केलेल्या प्रयोगात! तानाजी मेल्यावर जे मावळे पळतात त्यांतला आघाडीवरचा मावळा म्हणून मराठी रंगभूमीला माझा चिमुकला पदस्पर्श झाला.
-"मूर्खांनो! तो दोर मी केव्हाच कापला आहे,"
हे सूर्याजीचे भाषण ज्या मूर्खांना उद्देशून होते त्यातला मी आघाडीचा मूर्ख! तिथे देखील उजव्या विंगेत कड्याच्या दिशेला न पळता उदेभानाच्या महालाच्या दिशेला पळाल्यामुळे डाव्या विंगेत उभ्या असलेल्या सोनावणे मास्तरांनी उजव्या हाताने माझ्या डाव्या गालफडावर एक सणसणीत 'डायरेक्शण'केलेले स्मरते.

सुटलेला कल्ला आणि जीव बालमुठीत धरून मी पुन्हा एकदा तलवार आणि मावळी पागोटे सांभाळीत उजव्या विंगेत पळताना वाटेत आडव्या पडलेल्या तानाजीच्या छातीवर पाय देऊन पळालो होतो. त्या आघाताने तो मेलेला तानाजी कोकलत जिवंत झाला.

असो; हे विषयांतर झाले.

विनोदबुद्धीचा उगम माझ्या मानेवरील चामखिळीप्रमाणे केव्हा झाला हे अजिबात स्मरत नाही.

  • Log in or register to post comments
एक सर्वे के अनुसार

Andi2702

रवीवार, August 3, 2025 - 19:38
Permalink
New

एक सर्वे के अनुसार

देश की 90 % लड़कियां

बिना अपने बाप से पूछे ही

बोल देती हैं कि

मेरे पापा नही मानेंगे

  • Log in or register to post comments
प्रत्येक मानसायाले सिरीयसली

Andi2702

रवीवार, August 3, 2025 - 19:44
Permalink
New

प्रत्येक मानसायाले सिरीयसली घेत जाऊ नोका, काही लोकायच्या इकडे रक्तगटा शिवाय काहीच पॉझिटिव्ह नसते!
मंग म्हणसाल सांगतलं नाही.....!!

श्याम ठक
बार्शिटाकळी (अकोला)

  • Log in or register to post comments
डास चावतात म्हणून सरसकट गुड

गंगाधर मुटे

रवीवार, August 3, 2025 - 19:48
Permalink
New

डास चावतात म्हणून सरसकट गुड नाईट लावण्यापेक्षा कुठले डास चावतात ते शोधून त्यांना मारायला पाहिजे

  • Log in or register to post comments
कंस, व्यास आणि कर्ण

Arvind

सोमवार, August 11, 2025 - 12:25
Permalink
New

कंस, व्यास आणि कर्ण
हे तिघेजण महाभारतातून
भूमितीत गेले
की,
भूमितीतून महाभारतात आले.

....हे माहित नाही, पण
एक मात्र खरं की
भूमितीतले मार्क कळले
की घरी महाभारत घडायचं.

  • Log in or register to post comments
माझी बायको

Arvind

सोमवार, August 11, 2025 - 12:26
Permalink
New

माझी बायको
हॉस्पिटलमध्ये आहे
असे सांगून एकजण
गेले ३ महिने माझ्याकडून
पैसे घेतोय.

काय आजार आहे म्हणुन,
काल हॉस्पिटलला गेलो
तर समजले,

त्याची बायको "नर्स" आहे

  • Log in or register to post comments
रोज "अडानी"च्या

Arvind

सोमवार, August 11, 2025 - 12:26
Permalink
New

रोज "अडानी"च्या
वाढत्या मालमत्तेच्या बातम्या बघून बघुन आई मला म्हणाली...

बघ जरा नालायका
अडाणी असून पैसे कमवतोय,

तुझा तर एवढे शिकुन पन
काही उपयोग नाही...मुडद्या...!

  • Log in or register to post comments
मित्र - अरे! किती वेळ फोन

Arvind

सोमवार, August 11, 2025 - 12:27
Permalink
New

मित्र - अरे! किती वेळ फोन करतोय
फोन का उचलत नाहीस?

मी : ( हलक्या आवाजात) लेक्चरमध्ये आहे

मित्र - कुठे आहे लेक्चर?
विषय काय आहे?

मी - लेक्चर घरीच आहे
मीच विषय आहे

  • Log in or register to post comments
एक गर्विष्ठ शास्त्रज्ञ -

Arvind

सोमवार, August 11, 2025 - 12:28
Permalink
New

एक गर्विष्ठ शास्त्रज्ञ - तुम्ही मला देव दाखवा

पुणेकर - तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा

शास्त्रज्ञ - थोडा वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल

पुणेकर - तुम्ही थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल.

  • Log in or register to post comments
कॉलेज मध्ये एक सुंदर मुलगी

Arvind

सोमवार, August 11, 2025 - 12:29
Permalink
New

कॉलेज मध्ये एक सुंदर मुलगी
एका तरुणाकडे आली
आणि म्हणाली

"Hi I'm Anushka ,
1st Year Arts, & you!!"

युवक ( गर्वाने) "मी माझ्या मुलाची फीस भरायला आलोय"

Moral....

नेहमी फक्त आईच संतूर मॉम नसते बाप पण उरलेला साबण वापरतो।

  • Log in or register to post comments
पितळीच्या वाटीला

Arvind

सोमवार, August 11, 2025 - 12:30
Permalink
New

पितळीच्या वाटीला
कितीही घासा
ती सोन्याची होत नाही.

हे वाक्य कुणीतरी

ब्युटी पार्लरच्या बोर्डाखाली लिहून

पळून गेलं राव!

  • Log in or register to post comments
गणिताचे शिक्षक स्टाफरूममधे

Arvind

सोमवार, August 11, 2025 - 12:31
Permalink
New

गणिताचे शिक्षक स्टाफरूममधे रिकाम्या डब्यात चपाती बुडवून खात होते...

मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात
तर काहीच नाही...

गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स' मानल आहे..!

  • Log in or register to post comments
सासू (सुनेला) : अगं उठ, तो बघ

Arvind

सोमवार, August 11, 2025 - 12:31
Permalink
New

सासू (सुनेला) : अगं उठ, तो बघ सूर्य पण उठला.

सून : तेवढंच दिसतं तुम्हाला ! तो माझ्या आधी झोपतो ते नाही दिसत..

  • Log in or register to post comments
बायको - अहो ऐकता का ???....

Arvind

सोमवार, August 11, 2025 - 12:32
Permalink
New

बायको - अहो ऐकता का ???.... पाटलांच्या मुलीला गणितात १०० पैकी ९९ मार्क्स मिळाले

नवरा - वाह... मग एक मार्क कुठे गेला???

बायको - आपला कार्टा घेऊन आलाय!

  • Log in or register to post comments
एका मैत्रिणीची बायपास झाली

Arvind

सोमवार, August 11, 2025 - 12:33
Permalink
New

एका मैत्रिणीची बायपास झाली तिला दुसऱ्या मैत्रिणीने मेसेज केला,...

Ata tula udya marayala harakat nahi.

बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं.

कारण तिनं वाचलं..
आता तुला उद्या मरायला हरकत नाही.

परंतु मूळ मेसेज होता..
आता तुला " उड्या मारायला " हरकत नाही

म्हणून मराठी नेहमी मराठीतूनच लिहावे
अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो.

  • Log in or register to post comments
यजमान : आम्ही दार्जीलिंगचा

Arvind

सोमवार, August 11, 2025 - 12:33
Permalink
New

यजमान : आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो

पुणेकर : वा , तरीच छान थंड होता. . .

किमान शब्दात कमाल अपमान

  • Log in or register to post comments
ओशो यांची कथा आहे. एकदा

Arvind

सोमवार, August 11, 2025 - 20:39
Permalink
New

ओशो यांची कथा आहे. एकदा मुल्ला नसरुद्दीन एक किलो मटण घेऊन येतो. आणि बायकोला तयार करायला सांगून बाहेर जातो.

बायको सांगितल्याप्रमाणे तयार करते खूपच खमंग छान होते. मुल्लाच्या बायकोच्या तोंडाला पाणी सुटते थोडे थोडे करत ती सगळे खाऊन टाकते.

मुल्ला घरी येतो आणि बायकोला सांगतो की आता वाढ जेवायला. पाहतो तर जेवणात मटन नाही. मुल्ला विचारतो मटण कुठे गेले?

तेवढ्यात तिकडून एक मांजर म्याऊ म्याऊ करत येते. मुल्लाची बायको शोहर बदडून काढणार म्हणून घाबरलेली असते. ती म्हणते मांजराने खाल्ले. मुल्ला लगेच उठतो आणि मांजराला पकडून त्याचे वजन करतो, ते बरोबर एक किलो भरते.

मुल्ला विचारतो हे मांजर असेल तर मटण कुठाय आणि हे मटण असेल तर मांजर कुठाय?

  • Log in or register to post comments
गुरुजी : काय रे मुन्ना, शाळा

Andi2702

मंगळवार, August 12, 2025 - 19:03
Permalink
New

गुरुजी : काय रे मुन्ना, शाळा ७ वाजता सुरू होते आणि तू ८ वाजता उशिरा का येतोस?

मुन्ना : काही फरक पडत नाही गुरुजी. तुम्ही माझी वाट पहात नका बसत जाऊ. सुरू करून देत जा.

  • Log in or register to post comments
पालक - झेंडावंदनसाठी किती

गंगाधर मुटे

शुक्रवार, August 15, 2025 - 10:03
Permalink
New

पालक - झेंडावंदनसाठी किती वाजता यायचंय ?
शिक्षक - सात वाजता
पालक - सकाळी ?

  • Log in or register to post comments
बॉस : - मेरे लिए एक शीशा लेकर

गंगाधर मुटे

गुरुवार, October 23, 2025 - 11:36
Permalink
New

बॉस : - मेरे लिए एक शीशा लेकर आओ जिसमे मैं अपना मुह देख सकूं.
संता : - नहीं मिला सर सब में मेरा ही मुंह दिख रहा है.

(संकलित)

  • Log in or register to post comments
व्हेनेझुएलातून आतापर्यंत ७

अतिथी सदस्य (-)

शुक्रवार, January 30, 2026 - 23:43
Permalink
New

व्हेनेझुएलातून आतापर्यंत ७ मिस युनिव्हर्स झाल्या आहेत.

देश ताब्यात घेण्यामागचं खरं कारण हेच आहे.

बाकी सगळी अंधश्रद्धा आहे 

  • Log in or register to post comments
सकाळी *तांब्या* घेऊन

Andi2702

मंगळवार, November 24, 2026 - 09:01
Permalink
New

प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यामुळे म्युन्सिपाल्टीवाले पकडतील म्हणून घाबरून एकजण *दूध* घेण्यासाठी सकाळी *तांब्या* घेऊन गेला...

तर त्याला *स्वच्छ भारत* अभियानवाले पकडून घेऊन गेले...🫣

किती हा त्रास, सामान्य माणसाने *जगायच* तरी कसं ? 😂

😃😃😷

  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 888 *
Who's new नवीन सदस्य
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant

Recent comments ताजे प्रतिसाद

  • आपण चुकीच्या ठिकाणी लेखन…
    6 hours 44 minutes ago
  • धन्यवाद
    6 hours 45 minutes ago
  • खूप खूप धन्यवाद
    7 hours 2 minutes ago
  • धन्यवाद
    7 hours 9 minutes ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    8 hours 37 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
अशीही उत्तरे-भाग- १ 11
फुलू दे शिवारी 10
मातृत्वाचा शृंगाररस 10
शरद जोशी 10
पोळ्याच्या झडत्या 9
असा आहे आमचा शेतकरी 9
प्रतिनिधी उपस्थिती आणि सहभाग नोंदणी - १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन 9
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 9
रे नववर्षा 9
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 9
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 9
शेतकर्‍यांची प्रति विधानसभा 9
पुस्तक समीक्षण : बळीवंश 9
नाचू द्या गं मला : लावणी ॥२६॥ 9
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 9
IT कार्यशाळा - खिसेकापूपासून सावधान : सोशल मीडियाचा वापर जपून करा. - भाग-१३ 9
सत्कार समारंभ : वर्धा 8
४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई - ३१ जानेवारी २०१८ 8
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 8
मृगजळ 8
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,289
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,166
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,756
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,547
वादळाची जात अण्णा 31,528
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,447
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,265
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,182
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,926
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,970
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,903
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,512
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,968
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,932
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,010
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,618
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,482
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,990
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,814
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,288
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini