ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तत्सम क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक सबळता नाही त्याची कुणीही दखल घेत नाही, कदाचित असाच याचा अर्थ आहे.
पण; आता शेतकर्यांच्या मदतीला नवीन संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञान धावून आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अल्पशा खर्चात शेतीविषयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होण्याची आणि भारतीय शेतीला वैश्विक साहित्यक्षेत्रात दृगोचर करण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून आम्ही आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले आहे. त्याचीच प्रारंभिक पायरी म्हणून अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यांच्यावतिने मागील ११ वर्षापासून विश्वस्तरीय लेखनस्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जात आहे. विश्वस्तरीय लेखनस्पर्धेचे यंदाचे हे अकरावे वर्ष.
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून
०३ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत बळीराजा डॉट कॉम (
https://baliraja.com/ ) या संकेतस्थळावर विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२४ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. सर्व प्रवेशिका
https://baliraja.com/spardha-2024 येथे उपलब्ध आहेत. या स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना अत्यंत आनंद होत आहे.
शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्यांची संख्याच उणीपुरी असल्याने आणि लेखनाचा विषय "शेतमालाचे भाव" असा जटिल असल्याने या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु यंदा उदंड प्रतिसाद मिळाला आणि देशविदेशातून मराठी भाषिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.
लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : मा. रिता ग्यानसिंग जाधव (मुंबई), मा. डॉ. संजय भाऊसाहेब दवंगे (अहमदनगर), मा. बालाजी मुंढे बिंधास्त किनगांवकर (लातूर), मा. रेखा जुगनाके (वर्धा), मा. शंकरराव घोरसे (नागपूर), मा. लक्ष्मीकांत कोटकर (नाशिक), मा. संजय कावरे (अकोला), मा. इरफान शेख (चंद्रपूर), मा. सतीश वखरे (वर्धा), मा. डॉ. मनीषा रिठे (वर्धा)
प्रतिक्रिया
अभिनंदन
साहित्य लेखन स्पर्धेत सहभागी आणि विजेत्या साहित्यिकांचे मनःपूर्वक अभिनंदन... माझ्या कथेला प्रथम क्रमांक दिल्या बद्दल आयोजक आणि परीक्षक महोदय यांचे मनःपूर्वक आभार.
पाने