बळीराजा : "तेव्हा आणि आता सुद्धा".....
कपोलकल्पित कालखंडात विष्णूच्या महामायेने
उद्धार झाला असं म्हणतात प्रल्हादाचा..
आणि तू तर त्यांचाच अंत्यज ..
शूर, पराक्रमी, महादानी..
तुझ्या कर्तृत्वाने हलवलं होतं इंद्रासन सुद्धा ...
म्हणूनच तर 'वामन' अवताराचे औचित्य..
तुला 'संजीवनी' देऊन पुनर्जीवित करणारे गुरु
अन् तुझ्या औदार्या पायी स्वतःचाच डोळा फोडून घेणारे
गुरु शुक्राचार्य आता नाहीत रे....
वेळोवेळी स्वर्गलोकीचं इंद्रासन अबाधित राखता यावं
म्हणून सदोदित बळीराजा जातोय बळी ..
तेव्हाही आणि आता सुद्धा ...
साऱ्या जगाला पोसणाऱ्याचा बळी जातोय
या षंढ व्यवस्थेच्या मस्तवाल महामायेपायी..
बळीराजा तुला वारंवार गाडलं जातं धरतीत..
अन् तू पण स्वतःचं सर्वस्व गमावून बसला पाताळात
बहुदा बळीराजा तुझ्या नावातील साधर्म्य
हे तर खुणावत नसेल ना तुला ...
बळीराजा.. आजतागायत 'बळी' जाण्याची
परंपरा कायम राखण्यासाठी....
"कल्की"अवतार प्रतीक्षेत......!
तुझ्या स्वतःच्या उद्धारासाठी..
पण कधी... पण कधी रे...
पृथ्वीच रसातळाला गेल्यावर...!...!...?...?
अन् कमाल की तू अजुनही दानी आहेस् महादानी...
धन्य आहेस तू... धन्य आहेस तू... "बळीराजा"
धन्य आहेस तू.....
***
धन्यवाद....
नरेंद्र भा. गंधारे. "एकांत"
हिंगणघाट. जिल्हा- वर्धा.
पिन कोड :442301
भ्रमणध्वनी : 9284151756
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे.
लेखन छान आहे.
अप्रतिम.. व्वा
अतिशय उत्तम...
सुनिल बावणे