पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
@दूर ढगांना पाहून@
किती दिवसांनी आज ऐकू आला गाजावाजा दूर ढगांना पाहून सुखावला बळीराजा
माना टाकलेली पिके , मेथी,पालकाची भाजी दूर ढगांना पाहून झाडे झाली ताजी ताजी
उल्हासली गुरेढोरे , कुरणातली कोकरे दूर ढगांना पाहून आली भरात पाखरे
आता वाजविल पावा वारा होऊनिया कान्हा सरीँवर सरी येता नद्या सोडतील पान्हा
सांज मंजुळेल आता गार होईल दुपार आणि कष्टाचाच घाम सुख देईल अपार !
- राजीव मासरूळकर मासरूळ ,ता जि बुलडाणा
खूप सुंदर.
हेमंत साळुंके
रचना उत्तम आहे. स्पर्धेतल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन. http://maymrathi.blogspot.com/
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
दूर ढगांना पाहून
खूप सुंदर.
हेमंत साळुंके
अभिनंदन.
रचना उत्तम आहे. स्पर्धेतल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन. http://maymrathi.blogspot.com/