नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कर्जविळखा !!
कष्ट जामीन कर्जाला
घास नाही रे गिळत !
भावनांनाही इथे का,
भाव नाही रे मिळत !!
झोप येईना डोळ्याला,
व्याज बसते उशाशी !
हंबरते बघ कशी ,
गाय गोठ्यात उपाशी !
आई पिकविते मोती ,
मोल येईना मालाला !
अश्रु थिजुनिया जातो,
फास खुणावे मनाला !!
जाता होईन मी शांत,
परी कर्ज ते राहील !
कोवळे ते पोर माझं ,
ओझं कसं ते साहील ?
नको नको तो विचार,
विळखा कर्जाचा तोडेन !
नातं काळ्या आईशी मी,
पुन्हा नव्याने जोडेन !!
© श्री. राहुल दत्तात्रय राजोपाध्ये
1073, नरसोबा गल्ली, तासगाव
ता. तासगाव जि. सांगली
9130215836
rdrajopadhye@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने