नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जर करोना हा खरा तर वाचतो माणूस का रे?
का मरत नाहीत मग हे औषधाविन लोक सारे!
शिंक माझी ही जुनी पण वादळासम आज झाली.
ओस पडली प्रेम सदने विलग झाले चाहणारे.
धन म्हणा वा बंध आता निघुन गेले जवळचे,
माणसाने पाहिले जे दूरचे आकाश तारे.
दौड सारी थांबली शेतीमधेही आजवरची,
या करोनाने थबकले वाहणारे धुंद वारे.
कोलमडली जर व्यवस्था अर्थ तंत्राची अशी तर,
पुर्ण कोरे होत नाही आज 'धीरज' सातबारे.
धिरजकूमार ताकसांडे, हिंगणघाट, जिल्हा. वर्धा
प्रतिक्रिया
व्वा! क्या बात है!
मस्त गझल धीरज साहेब !
Dr. Ravipal Bharshankar
रसपुर्ण गझल धिरज सर.
रसपुर्ण गझल धिरज सर.
गहजब....
Narendra Gandhare
सुंदर गझल
पुर्ण कोरे होत नाही आज सातबारे व्वा गुरूजी छान गझल
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने