![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गझल :
कर्जात शेत आणिक विळखा गळ्यावरी.
मरण्याशिवाय आहे? पर्याय का तरी.
पैसाच पेरतो पण किडतो फळावरी,
व्यवस्थेतल्या अळ्यांवर उपचार द्या तरी.
नुसतीच कागदावर दिसते समानता,
देशात विषमतेची मिटणार का दरी.
कर्जात पिच्चलेली घायाळ ही दशा,
शाब्दिक सांत्वनेने होणार का बरी.
जातोय हर पिकाचा हंगाम कोरडा,
यांत्रिक पावसाच्या पडतील का सरी.
आहे पुन्हा कृषीचे स्वातंत्र्य घ्यायचे,
होईल बंध मुक्ती 'धीरज' त्या परी.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
आभार
आभारी आहे सर!
अप्रतिम शब्दरचना सर
अप्रतिम शब्दरचना सर
धन्यवाद!
खूप खूप आभार!!! राजेश..
अप्रतिम (विद्युलता)
नविनतम गझले बद्दल खुप खुप शुभेच्छा
पाने