अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : वर्ष ३ रे
कोटी कोटी शेतकर्यांचे पंचप्राण,
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक
युगात्मा शरद जोशी ८१ व्या जयंतीनिमित्त (३ सप्टेंबर २०१६)
सादर करीत आहोत.....
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६
विषय : शेती आणि शेतकरी
(लेखन युगात्मा शरद जोशी यांच्या विचारधारेशी साधर्म्य राखणारे असावे)
या स्पर्धेचे चार प्रकार असतील : गद्यलेखन स्पर्धा-२०१६, पद्यलेखन स्पर्धा-२०१६, अनुभवकथन स्पर्धा-२०१६ आणि शेतीसाहित्य समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०१६
१] गद्यलेखन स्पर्धा-२०१६
विभाग : अ) ललितलेख ब) कथा क) वैचारिक लेख ड) मागोवा
२] पद्यलेखन स्पर्धा-२०१६
विभाग : अ) पद्यकविता ब) छंदमुक्त कविता क) गझल ड) गेय रचना/गीत (पोवाडा इत्यादी)
३] अनुभवकथन स्पर्धा-२०१६
विभाग : अ) शेतकरी आंदोलनातील अनुभव ब) शेतकरी चळवळीच्या वाटचालीतील अनुभव क) शेतीत राबताना आलेले चांगले/वाईट अनुभव ड) शेतीच्या संदर्भात राजकीय पुढार्यांच्या विरोधाभासी भुमिकेचे आलेले अनुभव
४] शेतीसाहित्य समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०१६
(परिक्षणासाठी शेतीसाहित्याच्या पुस्तकाची व रसग्रहणासाठी कवितेची निवड स्पर्धकाने स्वत:च करायची आहे. पुस्तक/कविता युगात्मा शरद जोशी यांच्या विचारधारेशी साधर्म्य राखणारी असणे अनिवार्य आहे.)
विभाग : अ) ललित/गद्य/कथासंग्रहाचे समीक्षण ब) काव्यसंग्रहाचे समीक्षण क) कवितेचे रसग्रहण
प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल
स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:
१) स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.
२) पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात.
३) एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त कितीही प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. महत्तम गूण प्राप्त करणार्या रचनेची निवड केली जाईल.
पारितोषिकाचे स्वरूप :
प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. पारितोषिकाचे स्वरूप मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके या स्वरूपाचे असेल.
निकाल :
युगात्मा शरद जोशी यांच्या महापरिनिर्वान दिनी १२ डिसेंबर २०१६ रोजी अंतिम निकाल जाहीर केला जाईल, तो अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या
www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.
पारितोषिक वितरण :
सन २०१७ मध्ये होणार्या तिसर्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. तेव्हा स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल.
प्रवेशिका सादर करण्याची पद्धत :
१) स्पर्धा ०३ सप्टेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीसाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी खुली राहील.
२) लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात आपले लेखन प्रकाशित करावे लागेल.
३) लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते.
४) स्पर्धकाची इच्छा असल्यास लेखन टोपण नावाने प्रकाशित करता येईल मात्र टोपण नाव धारक स्पर्धकाचे खरे नाव संपूर्ण परिचयासह
abmsss2015@gmail.com या मेलवर कळवणे बंधनकारक आहे.
५) स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत संपूर्ण माहिती
abmsss2015@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- ललितलेख ब) चरित्रलेख क) वृत्तांतलेख ड) अनुभवकथन/छंदमुक्त कविता/गझल असा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पोस्टाचा पत्ता देणे बंधनकारक आहे. अन्यथा स्पर्धक बाद ठरेल, याची नोंद घ्यावी.
६) सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
७) स्पर्धेसाठी आंतरजाल हेच कार्यक्षेत्र असेल त्यामुळे जगभरातील कोणताही मराठी भाषिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो.
८) संयोजक मंडळ व परिक्षक मंडळ वगळता अन्य सर्वच (शेतकरी साहित्य चळवळीचे पदाधिकारी सुद्धा) या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
९) स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
१०) गद्यलेखनासाठी कमाल शब्दमर्यादा - २००० शब्द एवढी असेल.
११) गझलेतील एकूण शेरांच्या १/५ शेर विषयाशी निगडीत असेल तरी ती गझल पात्र समजली जाईल. गझल मुसलसल असणे अनिवार्य नाही.
नियम व शर्ती :
१) स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. मात्र अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या मुद्रित अथवा आंतरजालीय विशेषांकात सदर लेखन प्रकाशित करायचे झाल्यास तसा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
२) स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन आणि अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
३) स्पर्धकाला वयाचे बंधन असणार नाही.
४) एखाद्या विभागात कमी प्रवेशिका आल्या तरी त्यातूनच विजेता निवडला जाईल. उदा. एखाद्या विभागात केवळ ३ प्रवेशिका प्राप्त झाल्या तरी त्यांनाच पारितोषिक घोषित केले जाईल. प्रवेशिका कमी आल्याची किंवा सादर झालेल्या प्रवेशिका दर्जेदार नव्हत्या अशी किंवा या प्रकारची तत्सम सबब सांगितली जाणार नाही.
५) परीक्षक मंडळ १० सदस्यांचे असेल. सर्व परीक्षकांकडून आलेल्या गुणांच्या सरासरीनुसार अग्रक्रमाने विजेते निवडले जातील. स्पर्धेचा निकाल घोषित होईपर्यंत परिक्षकांची नावे गोपनिय ठेवण्यात येतील.
६) सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मध्ये होणार्या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या
www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
७) एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
८) अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीकडे सध्या असलेले मनुष्यबळ लक्षात घेता अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
९) निकालाबाबत अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीने नियुक्त केलेले संयोजक मंडळ व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ बांधील नाही याची कृपया नोंद घ्यावी.
१०) शेतीविषयाला केंद्रस्थानी ठेवून नवसाहित्याची जोमाने निर्मिती होण्यास नवचालना मिळावी, असा उद्देश या स्पर्धा आयोजनामागे असल्याने ही संपूर्ण स्पर्धा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती
आपला स्नेहांकित
गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
--------------------------------------------------------------------------------------
किंवा
येथे भेट द्या,
प्रतिक्रिया
युगात्मा शरद जोशींच्या पुस्तकांचा संच
नमस्कार,
नुकतीच आपण विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ जाहीर केलेली आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष. विजेत्यांना पारितोषिक म्हणून आपण समानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके देत असतो.
यावर्षी सर्व विजेत्यांना युगात्मा शरद जोशींच्या पुस्तकांचा संच द्यावा, असे काही सहकार्यांनी सुचवले आहे. पण तसे करायचे म्हटले तर खर्चाचा आकडा १ ते १.५ लाख रुपयावर जातो.
पारितोषिकांना प्रायोजक मिळाले तर हे काम अशक्य नाही. आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावे किंवा स्मृती म्हणून पारितोषिके देण्याचा प्रघात आहेच.
निदान १० प्रायोजक मिळाल्यास हा बेत सफ़ल होणे शक्य आहे.
या अनुषंगाने कुणी उत्सूक असल्यास मला वैयक्तिक संपर्क करावा.
- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
शेतकरी तितुका एक एक!
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा 2016
सर्वांना मनापासून शुभेच्छा
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा २०१६
नमस्कार मुटे सर,
सर्वात प्रथम आपले अभिनंदन.
हा संकल्प केल्यापासून त्यामध्ये सातत्याने दरवर्षी वेगवगळ्या संकल्पना आणून आपण अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे काम दरवर्षी करता आहात हे खूप कौतुकास्पद आहे.
नेहमीप्रमाणे मी ह्या वेळेस पद्यलेखन विभागात - माझी "शेतकरी चळवळीचे बीजं" ही कविता ह्या निमित्ताने लेखनस्पर्धे मध्ये पाठवू इच्छितो.
तसेच - गद्य लेखनात -ड) मागोवा ह्या विभागात मी तुम्हांस पाठवलेले पत्र पाठविण्याच्या विचारात आहे.
तरी आपण मला मार्गदर्शन करावे.
आपल्या उत्तराची वाट पाहतो आहे.
आपला स्नेहांकित
रविंद्र कामठे.
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com
दि. १ सप्टेंबर रोजी अचानक
दि. १ सप्टेंबर रोजी अचानक डाटाबेस खचल्याने संकेतस्थळावर काही प्रमाणात समस्या निर्माण व्हायला लागल्या होत्या. व नंतर तर संकेतस्थळाची संरचनाच कोलमडून पडली होती.
डागडुजी करण्याच्या कामात व्यस्त असल्याने आपल्या पोस्टकडे लक्ष गेले नव्हते. त्यामुळे उत्तर द्यायचेही राहून गेले.
महत्वाची सुचना
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा २०१६ मध्ये सहभाग नोंदवणारांचे मनपूर्वक स्वागत आणि आभार.
स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत संपूर्ण माहिती abmsss2015@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- ललितलेख ब) चरित्रलेख क) वृत्तांतलेख ड) अनुभवकथन/छंदमुक्त कविता/गझल असा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पोस्टाचा पत्ता देणे बंधनकारक आहे. अन्यथा स्पर्धक बाद ठरेल, याची नोंद घ्यावी.
असा स्पष्ट उल्लेख नियम आणि अटीत असून सुद्धा अनेक सहभागी स्पर्धकांनी abmsss2015@gmail.com या ईमेल आयडीवर इमेल केलेला नाही. ज्यांनी केला आहे त्यांना इमेलद्वारे रिप्लाय देण्यात आलेला आहे.
महत्वाची सुचना :
धन्यवाद!
शेतकरी तितुका एक एक!
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल
*r* विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ चे निकाल दिनांक २३/१२/२०१६ रोजी जाहिर करण्यात येईल.
*r* विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : नियम आणि अटीमध्ये "स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत संपूर्ण माहिती abmsss2015@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे." अशी स्पष्ट अट असतानाही अनेक स्पर्धकांनी इमेल केलेला नाही. त्यांनी दिनांक १५/१२/२०१६ पर्यंत इमेल करावा. न केल्यास त्यांची प्रवेशिका स्पर्धेतून बाद समजली जाईल.कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी.
शेतकरी तितुका एक एक!
नमस्कार सर,
नमस्कार सर,
मी बरेच आधी मेल पाठवली आहे. कृपया मिळाली का ते सांगणे.
- विनिता
मेल केला आहे....
मेल केला आहे....
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप