Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***गरीबी कशामुळे?

व्यासपीठ उपलब्ध केल्याबद्दल बळीराजाच्या प्रशासकांना धन्यवाद देतो.

मुद्दा असा मांडायचा होता की:

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर:

१. आपल्याला लोकसंख्या नियंत्रीत करन्यात बरेचसे अपयश आले.

२. भौगोलिक प्रदेशामधील नैसर्गीक सुबत्तेची असमान वाटणी गृहीत धरून आहे त्य परिस्थितीत पुरेसे रोजगार उपलब्ध करण्यात अपयश आले.

३. शिक्षणाचा पुरेसा प्रसार किंवा त्याबाबत कायदे करण्यात अपयश आले.

हे घटक मूलभूतरीत्या गरीबीस जबाबदार आहेत असे मला वाटते. सदस्यांचे याबाबत काय मत आहे अशी उत्सुकता आहे.

या शिवाय, खालील किमान अपेक्षा नेत्यांकडून असाव्यात असेही वाटते. त्याहीबाबत सदस्यांच्या मतांबाबत कुतुहल आहेच!

निवडणूकीला उभे राहणार्‍या उमेदवाराने खालील किमान अटी पुर्‍या केलेल्या असाव्यात असे वाटते.

- कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही

- किमान शिक्षण पदवी व मातृभाषेशिवाय इंग्रजीचे (केवळ एक जागतिक दर्जाची आवश्यक भाषा म्हणून) किमान ज्ञान असणे

- निवडणुकीला उभे राहण्याआधी किमान काही ना काही सामाजिक कार्य केल्याचे पुरावे असणे!

काय वाटते आपल्याला?

Share

प्रतिक्रिया

 • admin's picture
  admin
  गुरू, 26/05/2011 - 17:16. वाजता प्रकाशित केले.

  बळीराजा डॉट कॉमवर पहिली पोस्ट लिहिल्याचा मान मिळविल्याबद्दल अभिनंदन. Smile

  मुद्दा गंभीर आहे. चर्चा होईलच.

  एक विनंती - आयडी नाव बदलावे.

 • प्रशांत कवळे's picture
  प्रशांत कवळे
  शुक्र, 27/05/2011 - 11:05. वाजता प्रकाशित केले.

  १. काही अंशी सहमत - वाढलेल्या लोकसंखेचा, पर्यायाने लोकांचा (तरुणांचा) योग्य प्रकारे वापर करुन घेतला गेला नाही. माणुस हा पण एक रिसोर्स आहे. सध्या जास्त तरुण भारतात आहेत. आय टी मध्ये हाच तरुण वर्ग भारताचे नाव जगाच्या नकाशावर आणत आहे.

  २. नैसर्गिक सुबत्तेवर फारच कमी रोजगार उपलब्ध झालेत.

  ३. सहमत!

 • दत्ता राऊत's picture
  दत्ता राऊत
  गुरू, 30/06/2011 - 11:14. वाजता प्रकाशित केले.

  श्रमाला योग्य मोबदला न मिळणे, हेही गरिबीचं एक प्रमुख कारण आहे.

  जय गुरूदेव

 • सौरभ's picture
  सौरभ
  मंगळ, 05/07/2011 - 20:34. वाजता प्रकाशित केले.

  शेतीव्यवसायाकडे दुर्लक्ष होत आहे, हेही एक कारण आहे.

 • कॅप्टन Carf's picture
  कॅप्टन Carf
  शुक्र, 15/07/2011 - 21:40. वाजता प्रकाशित केले.

  <<<<<शिक्षणाचा पुरेसा प्रसार किंवा त्याबाबत कायदे करण्यात अपयश आले. >>>>

  हे कारण पटले नाही कारण शिक्षणाने नोकरी मिळाली तरच गरिबी हटत असते.

 • लक्ष्मण's picture
  लक्ष्मण
  गुरू, 21/07/2011 - 12:35. वाजता प्रकाशित केले.

  मला गरीबीची कारणे पटलेली नाहेत ? कारण गरीबीचे मुख्य कारण हे शिक्षण आहे आसे मला वाटते शहरातील मुलांना मिळणार्या सुविधा अन ग्रामिण मुलांना मिळणार्या सुविधा यात कमालीची तफावत आहे अन ग्रामिण भागातील ७५% कुटबांत तर पहीलीच पिढी शिक्षण घेत आहे आणी काही समाजात १६ वी पिढी शिक्षण घेत आहे , बरे ग्रामिण मुले हुशार जरी आसली तरी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही .

 • गब्बर सिन्ग's picture
  गब्बर सिन्ग
  मंगळ, 26/07/2011 - 00:30. वाजता प्रकाशित केले.

  श्रमाला योग्य मोबदला न मिळणे, हेही गरिबीचं एक प्रमुख कारण आहे.

  हे कसे काय ?
  श्रमाला मिळणारा मोबदला हा श्रमाच्या व कौशल्याच्या मागणी व पुरवठा यावर अवलंबुन असतो. मागणी कमी व पुरवठा जास्त असेल तर श्रमाला मोबदला कमी मिळेल. लोकसंख्या जास्त असल्याने पुरवठा जास्त आहे असे म्हणण्यास वाव आहे.

  दुसरे असे की श्रमाला मिळणारा मोबदला जर कमी असेल तर महागाई पण कमी असेल. याचे कारण हे की श्रमाला मिळणारा मोबदला जर कमी असेल तर कामगारांच्या पगारावर होणारा खर्च कमी असेल. म्हंजे उत्पादन खर्च कमी असेल. उत्पादन खर्च कमी असेल तर विक्री किंमत कमी असेल. व विक्री किंमत कमी असेल तर महागाई कमी असेल. पण सध्या तर महागाई फार आहे असा आरडाओरडा चालु आहे.

  हे पटतय का बघा ?

  ----------------------------------------

  शहरातील मुलांना मिळणार्या सुविधा अन ग्रामिण मुलांना मिळणार्या सुविधा यात कमालीची तफावत आहे अन ग्रामिण भागातील ७५% कुटबांत तर पहीलीच पिढी शिक्षण घेत आहे आणी काही समाजात १६ वी पिढी शिक्षण घेत आहे , बरे ग्रामिण मुले हुशार जरी आसली तरी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही

  ग्रामीण भागातूनच सर्वात जास्त आमदार खासदार निवडून जातात की नाही ? मग ग्रामीण भागातले लोक त्या आमदार खासदारांना सांगुन ग्रामीण भागात शिक्षणाच्या सुविधा का निर्माण करवून घेत नाहीत ?

  आपल्या कमतरते साठी, आळशीपणासाठी, जबाबदारी न घेण्याच्या प्रवृत्तीसाठी शहरी भागाला जबाबदार का ठरवतो आपण ? (मी स्वतः ग्रामीण भागातूनच आलेलो आहे.)

  -----------------------------------------

  शेतीव्यवसायाकडे दुर्लक्ष होत आहे, हेही एक कारण आहे.

  भारतातल्या कोणत्याही विधीमंडलावर नजर टाका. सर्वात जास्त आमदार शेती करणार्‍याच कुटुंबातूनच आलेले आहेत. खासदार पण अनेक शेतकरीच आहेत. मग शेतीकडे दुर्लक्ष हे लोक का करतात ?

  आजही ६०% जनता शेतीवर अवलंबुन आहे. म्हंजे हेच ६०% लोक आमदार/खासदार निवडून देतात. म्हंजे शेतीकडे दुर्लक्ष होण्यास शेतकरीच जास्त जबाबदार नाहीत का ?

  भारतात शेतीची उत्पादकता गेल्या अनेक वर्षांत घटत गेलेली आहे. शेतीला विविध सुविधा (उदा. स्वस्त दरात कर्ज, बियाणे) असूनही व सबसिड्या असूनही. सर्वात महत्वाचे म्हंजे शेतीवर प्राप्तीकर नसूनही.

  भारतात शेती गेली हजारो वर्षे चालत आलेला व्यवसाय आहे. म्हंजे अनुभवाचा फायदा उठवता यायला हवा. उत्पादकता अनुभवावर सर्वात जास्त अवलंबुन असते. म्हंजे शेतीची उत्पादकता सर्वात जास्त हवी. आता याची तुलना औषधनिर्माण किंवा सेलफोन इंडस्ट्री शी करा म्हंजे समजेल की आपण किती दुटप्पी आहोत ते. औषधनिर्माण किंवा सेलफोन इंडस्ट्री मध्ये ज्या वेगाने उत्पादकता वाढली तो दर व (हजारो वर्षातून वर आलेल्या) शेतीची उत्पादकता यात किती तफावत आहे...?

  शेतीच्या समस्यांसाठी शेतकरीच सर्वात जास्त जबाबदार आहेत.

  (माझे आजोबा शेतकरी होते व माझ्या काकांचा शेती हा आजही जोडव्यवसाय आहे.)

  -----------------------------------------

  प्रत्येक वेळी सिस्टिम च्या अपयशास सिस्टिम बाहेरचे लोक जबाबदार आहेत असे म्हणणे कितपत उचित आहे ?
  हे जबाबदारपणाचे लक्षण आहे की कातडीबचाऊ वृत्ती आहे ?

 • ईन्टरफेल's picture
  ईन्टरफेल
  गुरू, 28/07/2011 - 19:53. वाजता प्रकाशित केले.

  <औषधनिर्माण किंवा सेलफोन इंडस्ट्री मध्ये ज्या वेगाने उत्पादकता वाढली तो दर व (हजारो वर्षातून वर आलेल्या) शेतीची उत्पादकता यात किती तफावत आहे...? >
  औषधनिर्मान किंवा शेलफोन कंपनि आनि शेति यात गलफत होते आहे सर इंडस्ट्रियल कंपनि एखाद्या फॉर्मुल्यावर चालते एकदा फॉर्मुला तयार झाला कि प्रॉडक्शन आपल्याला पाहिजे तितके काढु शकतो !
  पन शेतिचे तसे नाहि निसर्ग सर्वात महत्वाचा घटक शेतिला आवश्शक आहे ! आनि त्याचा भरवसा कुनिहि देउ शकत नाहि !
  मला इथे सर्व मुद्दे निट मांड्ता येनार नाहित माफ करा !
  शेतकर्याचा मुलगा आसने म्हनजे त्याला सगळि शेति कळने आसा होत नाहि ! कारन बर्याच तरुन पिढिला शेतिसाठि करावि लागत आसलेलि प्रचंड आंग मेहनत आवड्त नाहि ! त्यामुळे हाहि मुद्दा गौन मानुया !
  आनि शेतिच्या फॉर्मुल्या बद्दल बोलायचे झाले तर आपल्याला माहितच आसेल ! शेति शंशोधनाविशइ !
  नसेल तर हि लिंक बघा ...............
  .
  http://www.baliraja.com/node/56

 • गब्बर सिन्ग's picture
  गब्बर सिन्ग
  गुरू, 04/08/2011 - 10:48. वाजता प्रकाशित केले.

  ईन्टरफेल साहेब,

  शेती हा व्यवसाय गेली १००० वर्षे चालत आलेला आहे. सेलफोन हा जेमतेम २० वर्षे व औषधे निर्माण हा जेमतेम १००/२०० वर्षे.

  आता मला सांगा की १००० वर्षे ज्या शेतीच्या Learning Curve चा फायदा आपण घ्यायला हवा होता तो घेतला का ? १००० वर्षात आपल्याला शेती ही पावसावर अवलंबुन आहे हे माहीत नव्हते का ? मौसमी पावसाची अनिश्चितता ही जोखीमच आहे ना ? व ती जोखीम व्यवस्थापित करण्याची जबाबदारी शेतकर्‍यांची अजिबातच नाही का ? की केवळ सरकारची ? व्यवसाय करताना त्यातील जोखीमी व्यवस्थापित करणे हे व्यवसाय करणार्‍याचे अजिबातच काम नाही का ? ते काम दुसर्‍याचे का व कसे ?

  ------------------------

  शेतकर्याचा मुलगा आसने म्हनजे त्याला सगळि शेति कळने आसा होत नाहि ! कारन बर्याच तरुन पिढिला शेतिसाठि करावि लागत आसलेलि प्रचंड आंग मेहनत आवड्त नाहि ! त्यामुळे हाहि मुद्दा गौन मानुया !

  मान्य.

  (माझे आजोबा शेतकरी होते व माझ्या काकांचा शेती हा आजही जोडव्यवसाय आहे.)

  हे मी एवढ्यासाठी सांगितले की शेतीवर/शेतकर्‍यांवर टीका करणार्‍यांवर सारखा एकच आरोप होत असतो की टीकाकाराने ग्रास-रूटवर येऊन बोलायला हवे. शेतीवर/शेतकर्‍यांवर टीका करण्यासाठी तुम्ही शेतकरी असणे हेच महत्त्वाचे आहे, बाहेरच्यांनी बोलू नये असाही सूर असतो.

  मागे एकदा सोनिया गांधींवरही अशीच टीका झाली होती - ज्यांना कापूस कुठे लागतो (कापसाच्या झाडाला) ते कापूस उत्पादकांचे प्रश्न काय डोंबल सोडवणार ? हा प्रश्न विचारणार्‍यांनी तरी कापूस उत्पादकांचे प्रश्न सोडवले का ?

  मी माझी तुलना सोनियाजींशी करत नाहिये पण हे सांगायचा प्रयत्न करतोय की मी ही शेतकरी कुटुंबातीलच आहे. पण शेती व्यवसायावर टीका करणार्‍या व्यक्तीला उपरा/परका असल्यासारखी वागणूक मिळते - हे चूक आहे.