नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
महा बळीराज ..................!!!
वावरत काम करे
थकलेला बाप,
म्हणून त्याले म्हणतात
महा बळीराज,
हो सारे बळीराज
स्वता राहून उपवाशी
घास घाली जगाला,
राहून स्व:ता अनवाणी
बूट घाली सायेबाला,
दरबारी .... हो दरबारी
दरबारी सायेबाच्या
काहीच नाही मान........
म्हणून त्याले म्हणतात
महा बळीराज
उन्हां मध्ये लाही लाही
करते त्याचा जीव,
पावसात घोंगड घेऊन
फिरतो रानो रान,
पर्वा नाही...... हो पर्वा नाही........
पर्वा नाही कशाचीही
तरी करते काम..........
म्हणून त्याले म्हणतात
महा बळीराज
बांधावर उभा जसा
माहा विठूराय,
नागमोडी चालत येई
जशी रुख्माय,
झाडा खाली ......हो झाडा खाली...
झाडा खाली तुरीच्या त्या
खातात भाकर,
म्हणून त्याले म्हणतात
महा बळीराज
पोया मदे बैल असा
सजवे माया बाप,
घाट लावी मस्तकाले
खांद्याले त्या तूप,
पाठीवरी झूल टाके
कपाळी बाशिंग............
म्हणून त्याले म्हणतात
महा बळीराज
असा आहे गुणवाणं
राज्या मावा बापं
किती गावी महती त्याची
तरी पळे कमं
जिवनाच्या......हो जिवनाच्या
जिवनाच्या वावरातं
गातो सुखाचं गाणं
महणुन तयाले महणतातं
सारे बळीराज हो सारे बळीराज......!!!!
("हंबरून वासराले चाटते जशी गाय" .
ह्या गीताच्या चालीवर मी
हा एक छोटासा प्रायत्न केला आहे
मला आशा आहे
कि आपणाला नक्की हि कविता आवडेल )
मोहन कु-हाडे ................!!
प्रतिक्रिया
महाबळीराज....
अतिशय सुंदर अभिव्यक्ती.....!! वाचून परमानंदी लीन झालो!
हेमंत साळुंके
सुंदर व्यक्त झालात
सुंदर व्यक्त झालात. गाऊन पाहताना आणखी मजा आली.
पुलेशू. (पुढिल लेखनास शुभेच्छा)
लिहित राहा.
शेतकरी तितुका एक एक!
पाने