पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गझलसंग्रह : माझी गझल निराळी (तिसरी आवृत्ती-२०१७) पृष्ठे : १५६ किंमत : २००/- गझलकार : गंगाधर मुटे "अभय" प्रकाशक : निता नितीन हिरवे संवेदना प्रकाशन, चिंचवड गाव, पुणे
शेतकरी तितुका एक एक!
फ़ेसबूकवरील वेगवेगळ्या धाग्यावरील प्रतिसाद
Sudhir Bindu, Renuka Mathankar Ingle, Kamalakar Desaleand 15 others like this.तुमचा कविकुमार, Nilesh Kawade, Bhimrao Panchale and 3 others like this. Amar Habib, Raj Wankhede, Kishore Wankhade and 47 others like this Nikhil Darunkar, भारत मुंबईकर, Renuka Mathankar Ingle and 44 others like this. Tirupati Patil Wadje Godamgaokar, Chakradhar More and 63 others like this. Raj Jain-Patil, Umesh Kothikar, Kalpi Shyam Joshi and 43 others like this.
अरविंद चौधरी congrats sir Bhimrao Panchale abhinandan gangadharrao... Vidyanand Hadke jai ho gangadharji.....
Raj Pathan
त्यामूळे आपले आभार!
Welcome - पुस्तक जत्रा www.pustakjatra.com - पुस्तक जत्रा Vijay Mujbaile
आपला नम्र, -फॅन नं. १ Kiran Chavan
Dr. Abhay Bang SEARCH Society for Education, Action & Research in Community Health
प्रिय श्री गंगाधर मुटे, स. न.
’रानमेवा’ व ’माझी गझल निराळी’ मधील काही गझला वाचल्या. श्री शरद जोशी व किंमतु ओंबळे यांनी अतिशय सुयोग्य शब्दात तुमचे मुल्यांकन केले आहे असे वाटले. वर्ध्याच्या मातीत या गझला उगवल्या असल्याने अजूनच आपुलकी वाटली.
शुभेच्छासह
(स्वाक्षरी) अभय बंग
आदरणीय डॉ. मधुकर वाकोडे यांचा अभिप्राय.
आदरणीय, डॉ.विकासजी आणि भारतीजी आमटे यांचा "माझी गझल निराळी" ला लाभलेला अनमोल अभिप्राय.
हल्ली अनेक कवी गझल लेखनाकडे वळले आहेत. अरबी, फारशी, उर्दू अशी होत होत गझल मराठीत आली. मराठीपूर्वी ती हिंदी व गुजराथीत आली. पूर्वीची गझल ही शराब आणि शबाब ह्या विषयाभोवतीच घुटमळत होती. आता ती विविधांगी बनत चालली आहे. जनजीवनातील अनेक सत्ये परखडपणे गझलेमध्ये मांडली जात असताना गंगाधर मुटे सारखे मातब्बर, कर्तबगार, प्रॅक्टिकल अनुभवी कवी गझलेच्या प्रेमात पडले व त्यातून व्यक्तिगत अनुभव अवलोकन व चिंतन याद्वारे सृजनशील लेखणीतून सत्य मांडण्यात शतप्रतीशत यशस्वी झाले व साकारला गझलसंग्रह "माझी गझल निराळी".
आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवाचं चिंतन त्यांनी आपल्या गझलेत ओतलं तेव्हा वाचकाला त्यातील यथार्थता पटते. हेच मुटेंच्या यशस्वी गझलेचं गमक आहे. उदा.
"गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने"
ज्यांच्या गझलांना सुधाकर कदमांची (पुणे) प्रस्तावना, भीमराव पांचाळेंचे पाठबळ, प्रदीप निफ़ाडकर, प्रमोद देव(मुंबई), स्वामी निश्चलानंद(अरुणाचल प्रदेश) यांच्या कौतुकाची छाप मिळावी त्या गझलांवर माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तीने तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण घेणाऱ्या ह्या गझलावर चार शब्द लिहिणे ही केवळ औपचारिकताच.
"दिसतात अभय येथे चकवे सभोवताली रस्ताच जीवनाचा सुचणे कठिण झाले"
स्वलेखनाने स्वानंदा सोबत परमार्थही साधावा बघा हा शेर
"आनंद भोगताना परमार्थही साध्य व्हावा असलेच कार्य कर तू दोहे मला म्हणाले"
कर्म और भाग्यका किताब है जिंदगी, पाप और पुण्य का हिसाब है, जिंदगी जेव्हा कर्म करताना भाग्य फळाला येते तेव्हा आपसूकच नशीब फळते.
"प्राक्तन फिदाच झाले यत्नास साधतांना मोती पुढ्यात आले वाळूस गाळतांना"
भारतातील सद्य परिस्थितीचे वर्णन खालील शेरामध्ये बघा. सर्वांना नोकरी हवी मग शेती कुणी करायची असा काहीसा आशय.
निघून गेलेत शहाणे सर्व साहेब बनायला मूर्ख आम्ही येथे उरलो, मोफत अन्न पिकवायला
धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी
श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे झोपले असेल शेत जागवायला हवे
"कोणीतरी यांची आता पडजीभ उपटली पाहिजे नाटकी बोलतात साले की गरिबी हटली पाहिजे"
"लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले येणार वित्त आहे बत्तीस तारखेला"
"सोकावलेल्या अंधाराला इशारा आज कळला पाहिजे वादळ येऊ दे कितीही पण दीप आज जळला पाहिजे"
"चला वापरा एकदा आणि फेका हवी ती खरीदी नव्याने करा इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ हृदय भासते मेड इन चायना"
पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर?
"शेती करून मालक होणेच मूर्खता सन्मान मोल आहे कर अभय चाकरी"
जास्तीत जास्त शरीर उघडे टाकून कमीतकमी वस्त्र वापरण्याच्या ’फॅशन’वर आसूड ओढताना मुटे म्हणतात
"ललना पाहून कपडे शरमले मते पाहताच नेते नरमले"
भ्रष्टाचारावरही श्री मुटे आसूड ओढून लिहितात की, ही व्यवस्थाच किडली आहे
"टाळूवरील लोणी खाण्यास गुंतला जो सत्कारपात्र तोची मशहूर थोर झाला"
"सरकारी खजिन्यावर मारून घ्यावा हात चिरीमिरी दिली तरी मिटून जाईन वाद"
गझलकार श्री मुटे यांना पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा.
- तुळशीराम बोबडे अकोला ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
माझ्या जीवनातला हा सोनेरी आणि अविस्मरणीय दिवस. कदाचित माझ्या वाढदिवसानिमित्त मराठी रसिकांनी आणि शब्दांजली प्रकाशनचे प्रकाशक श्री Raj Jain-Patil यांनी दिलेली अनमोल भेट आहे. माझे आजवर तीन पुस्तके प्रकाशीत झाली. १) “रानमेवा” (काव्यसंग्रह) १० नोव्हेंबर २०१० २) ” वांगे अमर रहे” (ललित लेख संग्रह) २२ जुलै २०१२ ३) “माझी गझल निराळी” (गझलसंग्रह) १० डिसेंबर २०१३
पैकी दुसरी आवृत्ती काढायची बातमी “माझी गझल निराळी” ने ऐकवली. मराठी गझल रसिकांचे आणि शब्दांजली प्रकाशनचे प्रकाशक श्री Raj Jain-Patil आणि Nivedita Patil-Jain यांचे शतश: आभार.
मागच्या विजयादशमीलाच 'माझी गझल निराळी' हा गंगाधर मुटेंचा गझलसंग्रह प्रकाशित झाला आणि लागलीच दुसरी आवृत्ती. “वाह! हार्दिक शुभेच्छा गंगाधर मुटेजी !!” असेच उद्गार निघाले, जेव्हा ही बातमी ऐकली. या गझलसंग्रहाची प्रकाशनापूर्वीच अनेकांना प्रतीक्षा होती त्यापैकी मी सुद्धा एक होतो. शेतकर्यांच्या वेदनांची कैफियत मांडण्यासाठी त्यांनी गझल हा काव्यप्रकार निवडावा हेच मुळी धाडसाचे काम आहे. हा गझलसंग्रह विषयाच्या अनुषंगाने अद्वितीय असाच आहे. “शेतकर्यांचा आसूड” या महात्मा फुलेंच्या पुस्तकानंतर शेतकर्यांच्या जीवनाला समग्र स्पर्श करणारे लिखाण माझ्या वाचनात आले नव्हते. ही पोकळी गंगाधर मुटेंच्या समर्थ लेखणीने भरून काढली आहे.
“ग्रंथ हेच गुरू” असे म्हटले गेले आहे. ग्रंथ असंख्य आहेत पण शेतकर्यांच्या जीवनातील प्रश्न जाणून घेणारे, ते मांडणारे व त्यावर उपाय सांगणारे ग्रंथ दुर्मिळ आहेत. गझलकार कवी श्री गंगाधर मुटे यांचे “माझी गझल निराळी” हा गझलसंग्रह अशा दुर्मिळ पुस्तकापैकीच एक आहे.
अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे
तेच तेच रोग आणि त्याच त्याच औषधी एकदा तरी निदान नीट व्हायला हवे
शेतकरी व त्यांचे प्रश्न याची जाण गझलकाराला आहे. प्रश्नाचे अचूक निदान कवीस आहे. हे प्रश्न का? कशामुळे व कोणी निर्माण केले याचेही भान आहे. या प्रश्नाची उत्तरेही त्याला माहीत आहेत. पण ते सोडवणे मात्र त्याच्या हातात नाही. फक्त संघर्ष करणे, लढणे आहे. या अफाट देशाचे राज्य दिल्लीच्या तख्तावरून चालते व तेथील वास्तवातील विसंगती कवीकडून दाखवली जाते.
लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला
याचा दुष्परिणाम शेतकर्याच्या आत्महत्येत होत आहे कारण राज्यकर्ते भेकड आहेत. ते स्वतः भेकड आहेत ते जनतेला काय अभय देणार? त्यामुळे मृत्यू सोकावलाय कारण त्याला शेतकर्याच्या रक्ताची चटक लागली आहे. निसर्गही शेतकर्याला साथ देत नाही कारण पाऊसही वेळेवर येत नाही. त्यामुळे कवी व्यथा मांडतो
भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला उद्ध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला
शिवाय शेतकर्याला फक्त कोरडा उपदेशच केला जातो. आत्महत्या करणे चूक आहे, असे सांगितले जाते ते कवीलाही मान्य आहे. पण त्याचा प्रश्न आहे की,
असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी
शेतकर्याच्या दु:खाची भाषा सत्तेस कळेल असे ज्ञान कुणी दाखवत नाही कारण सत्तेमुळे नेते चळून गेले आहेत, ते धनवंतांना कुरवाळतात तर श्रमिकाला छळतात. अधिकारीही लाचखोरीला निर्ढावलेले आहेत त्यांमुळे ते
अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी कुणाच्याच बापास ना घाबरे तो
तर नेतेही मुजोर झालेत कारण
नसतेच जे मिळाले केव्हाच सातजन्मी ते सर्व प्राप्त होता नेता मुजोर झाला
उलट सत्तेचा वापर जनतेवर अन्याय करण्यासाठीच करतात. शेती करून मालक होणे त्यामुळेच मूर्खता ठरत आहे. तर लाचखोरी करता येणार्या नोकरीला सन्मान मिळत आहे.
शेती करून मालक होणेच मूर्खता सन्मान मोल आहे कर ’अभय’ चाकरी
असे त्यामुळेच स्वतःला बजावतो आहे. या नेत्यांना स्वार्थ मात्र कळतो. एरव्ही बेमुर्वत वागणारे नेते निवडणुकीच्या वेळी मात्र नरम होतात ते अगदी मोजक्या शब्दात व्यक्त करताना कवी म्हणतो
मते पाहताच नेते नरमले
वास्तविक पैसा जनतेचा असतो पण नेते मात्र ते कसाही उधळतात.. नेते असे वागत असले तरी, सामान्य माणूस मात्र कष्टाने मिळणार्या संपत्तीसच खरे धन मानतो.
नको रत्न मोती, न पाचू हिरे ते अभय ते खरे जे मिळाले श्रमाने
सरकारी योजनांचे पैसे मिळवायचे तर चिरीमिरी द्यावी लागते तरच वाद होत नाही. नेते जनतेत परस्परात भांडणे लावतात. अशांचा जयजयकार करू नये असे आग्रहाने कवी सांगतो.
छाया नरोत्तमाची, अभयास उब देते त्यांचा उदो कशाला? जे कलह माजवीती
शेतीच्या दुर्दशेचे वास्तव कवी मांडतो ते असे
कायम गहाण सारे करण्यास सातबारा बँकेसमोर झाले लाचार शेत आहे
बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फुगून गेला मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे
समाजाच्या वाटेला सत्तेचा अल्पसाही वारा मिळत नाही कारण येथे घराणेशाहीच जोपासली गेली आहे. लबाडांच्या वंशात जन्म मिळणार्यांनाच तेथे वाव आहे.
अम्हांस नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही "अभय" पदांचे लबाडवंशात जन्म ज्यांचा, तमाम त्यांचा पुढार आहे
तर कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? या गझलेत कवी म्हणतो
"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही? सग्यासोयर्यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे
कवीला प्रश्न पडतो
का लोळतात पायी सिंहासने तयांच्या? अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?
सामान्यांच्या प्रश्नाबाबत पूर्वी पक्षांच्या चळवळी व्हायच्या त्या आता कमी झाल्या आहेत. म्हणून कवीला वाटते की
वादंग वा दुरावा पंक्तीत उरला नाही डावी उपाशी नव्हती, उजवी जेवली होती
कारण सगळ्यांनीच आता कुठे ना कुठे काही काळ तरी सत्ता उपभोगल्या आहेत.
घामचोरीची तक्रार दाखल केली तेव्हा विरोधक प्रसन्न नव्हते, सत्ता कोपली होती
शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळताना
शेतीत राबणाऱ्या खंबीर हो 'अभय' तू एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता
शेतकर्यांच्या प्रश्नाची फारशी गांभीर्याने चर्चा होत नाही. आकांताची दखल घेतली जात नाही पण नको त्या प्रश्नांची मात्र चर्चा होते,
आकांत बेदखल का अमुचे जगात होते? ते शिंकले तरीही चर्चा नभात होते
शेतकर्याने आंदोलन केले तर त्यांना लाठीमार, गोळीबाराला सामोरे जावे लागते
लाठी उगारताना, बंदूक रोखताना का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?
असा रोकठोक प्रश्न शासनकर्त्यांस विचारतात अन शेतकर्याला आपल्या बचावासाठी क्रांतीचा नवा उग्र मार्ग अवलंबावा लागेल असेही ठासून सांगतात. कवी म्हणतात
सत्याग्रहास आता रक्तात माखवावे शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता
या क्रांतीला शब्दांच्या माध्यमाची जोड हवी. रशियातील क्रांतीच्या वातावरण निर्मितीला मॅक्झिमा गॉर्कीच्या “आई” या कादंबरीची मदत झाली होती. म्हणूनच कवी आत्मविश्वासाने म्हणतात
घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी
गझल माझी बंड आणि अन्यायाला दंडही शेतकर्यांच्या मुक्तिसाठी आयुधांची थाळी
कवी केवळ संघर्ष करणारा नाही तर त्याला विधायकतेच्या निर्मितीचा ध्यासही आहे.
चेतनेला पेरून देते अभयतेची खते संघर्षाला पिकवताना प्रतिभा बनते माळी
मानवी जीवनात प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी युद्धाचा मार्ग अवलंबावा लागतो. पण मानवी जीवन केवळ संघर्षासाठी नाही. त्याला सुख, शांती व समाधानाची नैसर्गिक आस असते. त्यामुळेच कवी मार्मिक शब्दांतून ते व्यक्त करतो.
घमासान आधी महायुद्ध होते पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
शासनकर्त्यांना स्वतःच्या सावलीचीही भिती वाटते. त्यामुळे त्यांना शस्त्राच्या क्रांतीची भीती वाटतेच वाटते. पण शब्दाच्या शस्त्राचीही वाटते. हा कवी नारायण सुर्वे प्रमाणेच संत तुकाराम महाराजांचाही मागोवा घेत चालणारा आहे. त्यामुळेच तो शब्दांना शस्त्राइतके सामर्थ्यवान मानतो. तुकोबाराय म्हणतात,
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू
कवीही शब्दाला शस्त्र बनवतो पण शासनकर्त्याला त्याची भिती वाटते. त्यामुळे
मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे" चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे
कारण आजवरच्या लेखकांनी कधीही ही नोंद केली नाही की,
पुस्तकाने कोणत्याही नोंद नाही घेतली की कष्ट आणिक भाग्य-लक्ष्मी हाच रेशो व्यस्त आहे
शासनकर्ते समाजावर सवलतीचा वर्षाव करून त्याला कामापासून दूर करत आहे. तर काहींना साहेब बनण्यात भूषण वाटते. कष्ट करणारा शेतकरी मात्र मूर्ख ठरत आहे.
सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला
निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला
पण हे फार काळ चालणार नाही कारण जनतेला आता कळू लागले आहे, म्हणून कवी निर्धाराने-निश्चयाने म्हणतो,
श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा
एवढेच नव्हे बळीराजाला पाताळात घालणार्या वामनाची सत्ता उलथून टाकण्याची ईर्ष्या मनात आहे
मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू त्या बटू वामनाची सत्ता, "अभय" पालटली पाहिजे
- विजय शंकरराव चव्हाण पद्मावती अपार्टमेंट पद्मनगर, लातूर =========
माझी "वांगे अमर रहे" व "माझी गझल निराळी" ही पुस्तके पुस्तकजत्रा सोबतच आता BookGanga आणि amazon वर Online विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत * * * * www.bookganga.com/eBooks/Books?AID=5216407646190881869 * * * * www.amazon.in/Mazi-Gazal-Nirali-Gangadhar-Mute/dp/B00J9C8OYO * * * * http://www.pustakjatra.com/default/mazi-gazal-nirali-gangadhar-mute/p-25... * * * * BookGanga, amazon आणि शब्दांजली यांना लाखलाख धन्यवाद! * * * *
"काव्यदीप" मध्ये "माझी गझल निराळी"
पुणे येथून प्रकाशीत होणार्या "काव्यदीप" मासिकात "माझी गझल निराळी" चे प्रकाशित झालेले पुस्तक परिचय आणि संक्षिप्त समीक्षण.
धन्यवाद Anand Kamble आणि दिव्यमराठी.
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात गेल्या सव्वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या व नवोदित साहित्यिकांचे एक हक्काचे विचारपीठ असलेल्या अंकूर साहित्य संघातर्फ़े दरवर्षी "अंकूर वाङ्मय पुरस्कार" देण्यात येतात. या सर्व पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ४३५ पुस्तके प्राप्त झाली होती. ५०० रू. रोख, शाल श्रीफ़ळ देवून अंकूर साहित्य संमेलनात सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०१३ चे पुरस्कारासाठी १ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार करण्यात आला. अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३ च्या स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कारासाठी परिक्षक मंडळाने ’माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाची निवड केलेली आहे.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
दैनिक भास्कर बातमी
शेतकरी तितुका एक एक!
फ़ेसबूकवरील प्रतिसाद
फ़ेसबूकवरील वेगवेगळ्या धाग्यावरील प्रतिसाद
Sudhir Bindu, Renuka Mathankar Ingle, Kamalakar Desaleand 15 others like this.
तुमचा कविकुमार, Nilesh Kawade, Bhimrao Panchale and 3 others like this.
Amar Habib, Raj Wankhede, Kishore Wankhade and 47 others like this
Nikhil Darunkar, भारत मुंबईकर, Renuka Mathankar Ingle and 44 others like this.
Tirupati Patil Wadje Godamgaokar, Chakradhar More and 63 others like this.
Raj Jain-Patil, Umesh Kothikar, Kalpi Shyam Joshi and 43 others like this.
अरविंद चौधरी
congrats sir
Bhimrao Panchale
abhinandan gangadharrao...
Vidyanand Hadke
jai ho gangadharji.....
Raj Jain-Patil
Vidyanand Hadke
Raj Pathan
Milind Hiwarale
Gangadhar Mute
Raj Pathan
आपला गझलसंग्रह अशाच एखद्या कार्यक्रमात प्रसिध्द व्हावा ही मनोमन ईच्छा होती. शिवाय आपण हे असे करून गझल क्षेत्रात एक अद्वितीय इतिहास घडवला आहे. हे माझे स्वप्नच होते. शेतक-यांचे काव्यातील खरे कैवारी आपणच. स्वातंत्र्यानंतर आणि महात्मा फुलेनंतर!!
Gangadhar Mute
*
Raj Pathan
Dnyanesh Wakudkar
Ganesh Shinde
Prashant Vaidya
Atmaram Tambare
Dhanesh Nambiyar D'yen
Prashant Panwelkar
Abhinandan
Vidyanand Hadke
Samir Deshmukh
Bharati Birje Diggikar
abhinandan ani shubhechchhaa..
Sardar Jadhav
abhinandan sir
Satish Borulkar
मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रदेश कार्याध्यक्ष आहे. तसे म्हटले तर आपण एकाच कुटूंबातले चुलत भाऊ. तुमच्या कवितांचा चाहता आहे. कधी कधी भाषणात तुमच्या कविता वाचतो तेव्हा लोक भाषण डोक्यावर घेतात.
आपणाला त्यात काही गैर वाटत असेल तर सांगा.
Dnyandev Raut
DrShivamurti Khandalkar
like
Gangadhar Mute
त्यामूळे आपले आभार!
Prashant Panwelkar
Devdatta Sangep
प्रमोद देव
Shobha Telang
MKs Kimantu Omble
Subhash Kardak
Arun V. Deshpande
Kamalakar Desale
Kamalakar Desale
Sagar Pilare
Ashok Kulkarni
Pravin Pohane
Aruna Gorde Francis
Mahadev Kapuskari
Kalyani Bhagwat
Sudhakar Kadam
श्रीकृष्ण राऊत
Rajendra Mundhe
Trupti Kulkarni
Raj Jain-Patil
Welcome - पुस्तक जत्रा www.pustakjatra.com - पुस्तक जत्रा
Vijay Mujbaile
Kishor Bali
Dilip Charthankar
Ramesh Sarkate
Vivek Patait
Kishore Wankhade
Sanjay Ingle Tigaonkar
Kishor Bali
Hemant Rajopadhye
Raj Jain-Patil
Sanket Malati Bharat
Nandini Desai
Ashok Patil
पंडित पॉटर
Mandar Kale
आपला नम्र,
-फॅन नं. १
Kiran Chavan
क्रांति साडेकर
Neeta Ambegaonkar
Vishal Vijay Kulkarni
Vinita Pisal
Upekshit Upekshit
Ravindra Kamthe
Ravindra Kamthe
Gangadhar Mute प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार....!
शेतकरी तितुका एक एक!
महाराष्ट्र टाईम्स बातमी
लोकशाही वार्ता बातमी
डॉ. अभय बंग यांचा अभिप्राय
Dr. Abhay Bang
SEARCH
Society for Education, Action & Research in Community Health
प्रिय श्री गंगाधर मुटे,
स. न.
’रानमेवा’ व ’माझी गझल निराळी’ मधील काही गझला वाचल्या. श्री शरद जोशी व किंमतु ओंबळे यांनी अतिशय सुयोग्य शब्दात तुमचे मुल्यांकन केले आहे असे वाटले. वर्ध्याच्या मातीत या गझला उगवल्या असल्याने अजूनच आपुलकी वाटली.
शुभेच्छासह
(स्वाक्षरी)
अभय बंग
आदरणीय डॉ. मधुकर वाकोडे यांचा अभिप्राय.
आदरणीय डॉ. मधुकर वाकोडे यांचा अभिप्राय.
डॉ.विकासजी आणि भारतीजी आमटे यांचा अभिप्राय.
आदरणीय, डॉ.विकासजी आणि भारतीजी आमटे यांचा "माझी गझल निराळी" ला लाभलेला अनमोल अभिप्राय.
श्री प्रमोद गुळवेलकर यांचा अभिप्राय.
अभिप्राय - श्री. श्याम पवार
श्री. गंगाधर मुटे,
सप्रेम नमस्कार
अलीकडेच प्रकाशित झालेली तुमची 'वांगे अमर रहे' व 'माझी गझल निराळी' ही दोनही पुस्तके वाचली. वाचकाला अस्वस्थ करण्याचे व विचार करायला भाग पाडण्याचे काम या लिखाणातून निश्चितपणे झाले आहे. कृषिप्रधान भारतातील, शेतात घाम गाळणार्या शेतकरी समाजाचे दुर्दैवी भयाण वास्तव परिणामकारक शब्दांत या लिखाणात व्यक्त झाले आहे.
'वांगे अमर रहे' या लेखसंग्रहातील प्रत्येक लेखात तुम्ही मांडलेली व्यथा भारताच्या अर्थव्यवहारातील व्यंगांवर नेमकेपणाने बोट ठेवणारी आहेच आणि त्याचबरोबर 'शेतकर्याचा आसूड' ओढण्याची ताकदही त्यातून समर्थपणे प्रगट झाली आहे.
सन १९८० नंतरच्या दोन दशकांत महाराष्ट्रात शेतकरी संघटनेचे वादळ उठले. भूतकाळाचे अचूक विश्लेषण आणि भविष्यकाळाचा नेमका वेध घेणारे शरद जोशी यांचे नेतृत्व संघटनेला लाभले. संघटनेच्या भरतीचा हा काळ. या भरतीच्या लाटा छातीवर झेलण्यासाठी असंख्य तरूण यात उतरले. शतकानुशतके घाव झेलून वेदना मुकी झालेल्या व सदान् कदा मनं मारली जाऊन मुर्दाड झालेल्यांना नवी ऊर्मी, नवी प्रेरणा या विचाराने निश्चितपणे मिळाली. लाखोंच्या संख्येने शेतकरी भाऊबहिणी रस्त्यावर उतरले. शेतकर्याच्या व कष्टकर्याच्या स्वातंत्र्याची प्रेरणा घेतलेल्या आणि घरदार सोडून काम करण्यासाठी तयार झालेल्या तरूण संघटनापाईकंची फौज उभी राहिली. पारतंत्र्यानंतर प्रथमच शेतकरी भावांच्या बरोबरीने मायभगिनी तुरुंगात जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. धास्तावलेल्या स्वकीयांच्या सरकारातील आमच्याच राज्यकर्त्या पोरांनी आपल्या भावांच्या छातीत गोळ्या घालून त्यांचे बळी घेतले, मायभगिनींना लाठ्याकाठ्यांनी सोलून काढले. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांतही शेतकरी संघटनेच्या प्रभावाखाली शेतकर्यांची एकजूट झाली. राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांना संघटनेच्या अर्थशास्त्रीय विचारांची दखल घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र संघटनेच्या मागण्यांची पूर्तता अजूनही पूर्णत्वाने झालेली नाही. त्यामुळे चळवळीचे सामर्थ्य टिकविणे आणि वाढविणे आवश्यक असल्याचा तुम्ही मांडलेला आशावाद योग्यच आहे.
संघटनेचा विचार जितका मूलगामी आणि परिवर्तनवादी तितका तो समाजाच्या विविध थरांतून व विविधांगांतून खोलवर रुजतो. शेतकरी संघटनेला असे भाग्य लाभले. संघटनेच्या विचारांचा व आंदोलनांचा प्रभाव साहित्यक्षेत्रातही झालेला आहे. विशेष करून ग्रामीण साहित्यिक नव्याने लिहू लागले. एक नवीन साहित्यधारा तयार झाली. सकस आणि परिवर्तवादी साहित्यलेखकांची दमदार पिढी संघटनेच्या विचाराने प्रभावित होऊन लिहू लागली, बोलू लागली. आज ही यादी लक्षात घेण्याइतपत मोठी झाली आहे. संघटनेच्या या मंतरलेल्या कालखंडात काम केलेल्यांची पिढी आता वृद्धत्वाकडे झुकली आहे. अनेकजण परलोक(!)वासी झाले आहेत. परंतु, हा वारसा समर्थपणे पुढे सुरू राहील याचा भरवसा तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे पाहून 'अभय' देणारा वाटतो.
'घामाची कत्तल जेथे, होते सांजसकाळी
'युगानुयुगे ते बोलले, ऐकत आलो आम्ही
ही तुमच्या गझलेमधली भूमिका केशवसुतांच्या 'तुतारी'ची आठवण जागविणारी आहे यात शंका नाही.
सभोवतालचे भयाण वास्तव आणि उद्ध्वस्त ग्रामव्यवस्था यांचे चित्रण वेगवेगळ्या गझलांमध्ये टोकदार शब्दांत व्यक्त झाले आहे.
'बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
'शिवारात काळ्या, नि उत्क्रांतलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
'टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे
'दिसतात अभय येथे चकवे सभोवताली
'विज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली
अश्या प्रकारच्या ओळींतून हे वास्तव स्वरूपात व्यक्त झाले आहे. जीवन जगण्यातील हतबलता आणि त्यामुळे होणारी आत्महत्या याची व्यथा
'असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
अश्या ओळींतून व्यक्त झाली आहे. तरीसुद्धा या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याची जिद्द ठाम आहे.
'राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
'आता अभय जगावे अश्रु न पांघरावे
या ओळींमधून तुमची संकटावर मात करण्याची लढावू वृत्ती व्यक्त झाली आहे.
'घराणे उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो आम्ही?
'आम्हास नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही अभय पदांचे
'जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
'लोंढेच घोषणांचे, दिल्लीवरून आले
'भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे
या प्रकारच्या अनेक गझलांमधून या विकृतीचे चित्र मांडले गेले आहे ते निश्चितच विषण्ण करणारे तर आहेच आणि त्याच बरोबर विचार करायला लावणारे आहे. या सगळ्या विसंगतीत तुमची मातीशी असलेली अतूट नाळ
'अभय एक युक्ती तुला सांगतो मी करावे खरे प्रेम मातीवरी या
या शब्दांमधून व्यक्त झाली आहे, ती खरोखरी भावणारी वाटली यात काही शंका नाही.
गझल या काव्यप्रकाराची हाताळणी तुम्ही अगदी अलीकडे सुरू केली तथापि त्यात जे लिखाण केले त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना दाद देणे भाग आहे. मात्र त्याच वेळी तंत्राच्या मार्गाने जाताना अंतःकरणातल्या ऊर्मी व्यक्त करताना काही राहून तर जात नाही ना याचा विचार होण्याची आवश्यकता व्यक्त करावीशी वाटते.
'वांगे अमर रहे' या लेखसंग्रहातील शेवटचा 'असा आहे आमचा शेतकरी' हा लेख सर्वांनाच अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. आणि 'शेतकरी समाजासाठी कार्य करणे हे तुलनेने अधिक कठीण काम असले तरी ऐतिहासिक आणि महान कार्य आहे याची खूणगाठ मनाशी पक्की बांधून घेणे गरजेचे आहे' असा व्यक्त केलेला आशावाद बरेच काही सांगून जाणारा आहे. एकूणच सर्व लेखसंग्रह अभ्यासनीय झाला आहे.
पुस्तके वाचण्याची संधी जाणीवपूर्वक करून दिली याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.
माझी गझल निराळी : रसग्रहण - श्री बोबडे
तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण घेणारा
हल्ली अनेक कवी गझल लेखनाकडे वळले आहेत. अरबी, फारशी, उर्दू अशी होत होत गझल मराठीत आली. मराठीपूर्वी ती हिंदी व गुजराथीत आली. पूर्वीची गझल ही शराब आणि शबाब ह्या विषयाभोवतीच घुटमळत होती. आता ती विविधांगी बनत चालली आहे. जनजीवनातील अनेक सत्ये परखडपणे गझलेमध्ये मांडली जात असताना गंगाधर मुटे सारखे मातब्बर, कर्तबगार, प्रॅक्टिकल अनुभवी कवी गझलेच्या प्रेमात पडले व त्यातून व्यक्तिगत अनुभव अवलोकन व चिंतन याद्वारे सृजनशील लेखणीतून सत्य मांडण्यात शतप्रतीशत यशस्वी झाले व साकारला गझलसंग्रह "माझी गझल निराळी".
आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवाचं चिंतन त्यांनी आपल्या गझलेत ओतलं तेव्हा वाचकाला त्यातील यथार्थता पटते. हेच मुटेंच्या यशस्वी गझलेचं गमक आहे.
उदा.
"गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी
केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने"
ज्यांच्या गझलांना सुधाकर कदमांची (पुणे) प्रस्तावना, भीमराव पांचाळेंचे पाठबळ, प्रदीप निफ़ाडकर, प्रमोद देव(मुंबई), स्वामी निश्चलानंद(अरुणाचल प्रदेश) यांच्या कौतुकाची छाप मिळावी त्या गझलांवर माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तीने तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण घेणाऱ्या ह्या गझलावर चार शब्द लिहिणे ही केवळ औपचारिकताच.
"दिसतात अभय येथे चकवे सभोवताली
रस्ताच जीवनाचा सुचणे कठिण झाले"
स्वलेखनाने स्वानंदा सोबत परमार्थही साधावा बघा हा शेर
"आनंद भोगताना परमार्थही साध्य व्हावा
असलेच कार्य कर तू दोहे मला म्हणाले"
कर्म और भाग्यका किताब है जिंदगी, पाप और पुण्य का हिसाब है, जिंदगी जेव्हा कर्म करताना भाग्य फळाला येते तेव्हा आपसूकच नशीब फळते.
"प्राक्तन फिदाच झाले यत्नास साधतांना
मोती पुढ्यात आले वाळूस गाळतांना"
भारतातील सद्य परिस्थितीचे वर्णन खालील शेरामध्ये बघा. सर्वांना नोकरी हवी मग शेती कुणी करायची असा काहीसा आशय.
निघून गेलेत शहाणे सर्व साहेब बनायला
मूर्ख आम्ही येथे उरलो, मोफत अन्न पिकवायला
धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी
तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी
श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे
झोपले असेल शेत जागवायला हवे
"कोणीतरी यांची आता पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले की गरिबी हटली पाहिजे"
"लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे बत्तीस तारखेला"
"सोकावलेल्या अंधाराला इशारा आज कळला पाहिजे
वादळ येऊ दे कितीही पण दीप आज जळला पाहिजे"
"चला वापरा एकदा आणि फेका हवी ती खरीदी नव्याने करा
इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ हृदय भासते मेड इन चायना"
पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर?
"शेती करून मालक होणेच मूर्खता
सन्मान मोल आहे कर अभय चाकरी"
जास्तीत जास्त शरीर उघडे टाकून कमीतकमी वस्त्र वापरण्याच्या ’फॅशन’वर आसूड ओढताना मुटे म्हणतात
"ललना पाहून कपडे शरमले
मते पाहताच नेते नरमले"
भ्रष्टाचारावरही श्री मुटे आसूड ओढून लिहितात की, ही व्यवस्थाच किडली आहे
"टाळूवरील लोणी खाण्यास गुंतला जो
सत्कारपात्र तोची मशहूर थोर झाला"
"सरकारी खजिन्यावर मारून घ्यावा हात
चिरीमिरी दिली तरी मिटून जाईन वाद"
गझलकार श्री मुटे यांना पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा.
- तुळशीराम बोबडे
अकोला
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सोनेरी आणि अविस्मरणीय दिवस
माझ्या जीवनातला हा सोनेरी आणि अविस्मरणीय दिवस. कदाचित माझ्या वाढदिवसानिमित्त मराठी रसिकांनी आणि शब्दांजली प्रकाशनचे प्रकाशक श्री Raj Jain-Patil यांनी दिलेली अनमोल भेट आहे.
माझे आजवर तीन पुस्तके प्रकाशीत झाली.
१) “रानमेवा” (काव्यसंग्रह) १० नोव्हेंबर २०१०
२) ” वांगे अमर रहे” (ललित लेख संग्रह) २२ जुलै २०१२
३) “माझी गझल निराळी” (गझलसंग्रह) १० डिसेंबर २०१३
पैकी दुसरी आवृत्ती काढायची बातमी “माझी गझल निराळी” ने ऐकवली. मराठी गझल रसिकांचे आणि शब्दांजली प्रकाशनचे प्रकाशक श्री Raj Jain-Patil आणि Nivedita Patil-Jain यांचे शतश: आभार.
शेतकरी तितुका एक एक!
तुषार देसले यांचा अभिप्राय
गझलविश्वाची परिभाषा बदलणारा गझलसंग्रह
गझलविश्वाची परिभाषा बदलणारा
मागच्या विजयादशमीलाच 'माझी गझल निराळी' हा गंगाधर मुटेंचा गझलसंग्रह प्रकाशित झाला आणि लागलीच दुसरी आवृत्ती. “वाह! हार्दिक शुभेच्छा गंगाधर मुटेजी !!” असेच उद्गार निघाले, जेव्हा ही बातमी ऐकली. या गझलसंग्रहाची प्रकाशनापूर्वीच अनेकांना प्रतीक्षा होती त्यापैकी मी सुद्धा एक होतो. शेतकर्यांच्या वेदनांची कैफियत मांडण्यासाठी त्यांनी गझल हा काव्यप्रकार निवडावा हेच मुळी धाडसाचे काम आहे. हा गझलसंग्रह विषयाच्या अनुषंगाने अद्वितीय असाच आहे. “शेतकर्यांचा आसूड” या महात्मा फुलेंच्या पुस्तकानंतर शेतकर्यांच्या जीवनाला समग्र स्पर्श करणारे लिखाण माझ्या वाचनात आले नव्हते. ही पोकळी गंगाधर मुटेंच्या समर्थ लेखणीने भरून काढली आहे.
शेतकर्याला अभय देणारी निराळी गझल
“ग्रंथ हेच गुरू” असे म्हटले गेले आहे. ग्रंथ असंख्य आहेत पण शेतकर्यांच्या जीवनातील प्रश्न जाणून घेणारे, ते मांडणारे व त्यावर उपाय सांगणारे ग्रंथ दुर्मिळ आहेत. गझलकार कवी श्री गंगाधर मुटे यांचे “माझी गझल निराळी” हा गझलसंग्रह अशा दुर्मिळ पुस्तकापैकीच एक आहे.
अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे
तेच तेच रोग आणि त्याच त्याच औषधी
एकदा तरी निदान नीट व्हायला हवे
शेतकरी व त्यांचे प्रश्न याची जाण गझलकाराला आहे. प्रश्नाचे अचूक निदान कवीस आहे. हे प्रश्न का? कशामुळे व कोणी निर्माण केले याचेही भान आहे. या प्रश्नाची उत्तरेही त्याला माहीत आहेत. पण ते सोडवणे मात्र त्याच्या हातात नाही. फक्त संघर्ष करणे, लढणे आहे. या अफाट देशाचे राज्य दिल्लीच्या तख्तावरून चालते व तेथील वास्तवातील विसंगती कवीकडून दाखवली जाते.
लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला
याचा दुष्परिणाम शेतकर्याच्या आत्महत्येत होत आहे कारण राज्यकर्ते भेकड आहेत. ते स्वतः भेकड आहेत ते जनतेला काय अभय देणार? त्यामुळे मृत्यू सोकावलाय कारण त्याला शेतकर्याच्या रक्ताची चटक लागली आहे. निसर्गही शेतकर्याला साथ देत नाही कारण पाऊसही वेळेवर येत नाही. त्यामुळे कवी व्यथा मांडतो
भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला
उद्ध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला
शिवाय शेतकर्याला फक्त कोरडा उपदेशच केला जातो. आत्महत्या करणे चूक आहे, असे सांगितले जाते ते कवीलाही मान्य आहे. पण त्याचा प्रश्न आहे की,
असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी
शेतकर्याच्या दु:खाची भाषा सत्तेस कळेल असे ज्ञान कुणी दाखवत नाही कारण सत्तेमुळे नेते चळून गेले आहेत, ते धनवंतांना कुरवाळतात तर श्रमिकाला छळतात. अधिकारीही लाचखोरीला निर्ढावलेले आहेत त्यांमुळे ते
अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी
कुणाच्याच बापास ना घाबरे तो
तर नेतेही मुजोर झालेत कारण
नसतेच जे मिळाले केव्हाच सातजन्मी
ते सर्व प्राप्त होता नेता मुजोर झाला
उलट सत्तेचा वापर जनतेवर अन्याय करण्यासाठीच करतात. शेती करून मालक होणे त्यामुळेच मूर्खता ठरत आहे. तर लाचखोरी करता येणार्या नोकरीला सन्मान मिळत आहे.
शेती करून मालक होणेच मूर्खता
सन्मान मोल आहे कर ’अभय’ चाकरी
असे त्यामुळेच स्वतःला बजावतो आहे. या नेत्यांना स्वार्थ मात्र कळतो. एरव्ही बेमुर्वत वागणारे नेते निवडणुकीच्या वेळी मात्र नरम होतात ते अगदी मोजक्या शब्दात व्यक्त करताना कवी म्हणतो
मते पाहताच
नेते नरमले
वास्तविक पैसा जनतेचा असतो पण नेते मात्र ते कसाही उधळतात.. नेते असे वागत असले तरी, सामान्य माणूस मात्र कष्टाने मिळणार्या संपत्तीसच खरे धन मानतो.
नको रत्न मोती, न पाचू हिरे ते
अभय ते खरे जे मिळाले श्रमाने
सरकारी योजनांचे पैसे मिळवायचे तर चिरीमिरी द्यावी लागते तरच वाद होत नाही. नेते जनतेत परस्परात भांडणे लावतात. अशांचा जयजयकार करू नये असे आग्रहाने कवी सांगतो.
छाया नरोत्तमाची, अभयास उब देते
त्यांचा उदो कशाला? जे कलह माजवीती
शेतीच्या दुर्दशेचे वास्तव कवी मांडतो ते असे
कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे
बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फुगून गेला
मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे
समाजाच्या वाटेला सत्तेचा अल्पसाही वारा मिळत नाही कारण येथे घराणेशाहीच जोपासली गेली आहे. लबाडांच्या वंशात जन्म मिळणार्यांनाच तेथे वाव आहे.
अम्हांस नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही "अभय" पदांचे
लबाडवंशात जन्म ज्यांचा, तमाम त्यांचा पुढार आहे
तर कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? या गझलेत कवी म्हणतो
"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे
कवीला प्रश्न पडतो
का लोळतात पायी सिंहासने तयांच्या?
अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?
सामान्यांच्या प्रश्नाबाबत पूर्वी पक्षांच्या चळवळी व्हायच्या त्या आता कमी झाल्या आहेत. म्हणून कवीला वाटते की
वादंग वा दुरावा पंक्तीत उरला नाही
डावी उपाशी नव्हती, उजवी जेवली होती
कारण सगळ्यांनीच आता कुठे ना कुठे काही काळ तरी सत्ता उपभोगल्या आहेत.
घामचोरीची तक्रार दाखल केली तेव्हा
विरोधक प्रसन्न नव्हते, सत्ता कोपली होती
शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळताना
शेतीत राबणाऱ्या खंबीर हो 'अभय' तू
एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता
शेतकर्यांच्या प्रश्नाची फारशी गांभीर्याने चर्चा होत नाही. आकांताची दखल घेतली जात नाही पण नको त्या प्रश्नांची मात्र चर्चा होते,
आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते
शेतकर्याने आंदोलन केले तर त्यांना लाठीमार, गोळीबाराला सामोरे जावे लागते
लाठी उगारताना, बंदूक रोखताना
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?
असा रोकठोक प्रश्न शासनकर्त्यांस विचारतात अन शेतकर्याला आपल्या बचावासाठी क्रांतीचा नवा उग्र मार्ग अवलंबावा लागेल असेही ठासून सांगतात. कवी म्हणतात
सत्याग्रहास आता रक्तात माखवावे
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता
या क्रांतीला शब्दांच्या माध्यमाची जोड हवी. रशियातील क्रांतीच्या वातावरण निर्मितीला मॅक्झिमा गॉर्कीच्या “आई” या कादंबरीची मदत झाली होती. म्हणूनच कवी आत्मविश्वासाने म्हणतात
घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी
गझल माझी बंड आणि अन्यायाला दंडही
शेतकर्यांच्या मुक्तिसाठी आयुधांची थाळी
कवी केवळ संघर्ष करणारा नाही तर त्याला विधायकतेच्या निर्मितीचा ध्यासही आहे.
चेतनेला पेरून देते अभयतेची खते
संघर्षाला पिकवताना प्रतिभा बनते माळी
मानवी जीवनात प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी युद्धाचा मार्ग अवलंबावा लागतो. पण मानवी जीवन केवळ संघर्षासाठी नाही. त्याला सुख, शांती व समाधानाची नैसर्गिक आस असते. त्यामुळेच कवी मार्मिक शब्दांतून ते व्यक्त करतो.
घमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
शासनकर्त्यांना स्वतःच्या सावलीचीही भिती वाटते. त्यामुळे त्यांना शस्त्राच्या क्रांतीची भीती वाटतेच वाटते. पण शब्दाच्या शस्त्राचीही वाटते. हा कवी नारायण सुर्वे प्रमाणेच संत तुकाराम महाराजांचाही मागोवा घेत चालणारा आहे. त्यामुळेच तो शब्दांना शस्त्राइतके सामर्थ्यवान मानतो. तुकोबाराय म्हणतात,
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू
कवीही शब्दाला शस्त्र बनवतो पण शासनकर्त्याला त्याची भिती वाटते. त्यामुळे
मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे"
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे
कारण आजवरच्या लेखकांनी कधीही ही नोंद केली नाही की,
पुस्तकाने कोणत्याही नोंद नाही घेतली की
कष्ट आणिक भाग्य-लक्ष्मी हाच रेशो व्यस्त आहे
शासनकर्ते समाजावर सवलतीचा वर्षाव करून त्याला कामापासून दूर करत आहे. तर काहींना साहेब बनण्यात भूषण वाटते. कष्ट करणारा शेतकरी मात्र मूर्ख ठरत आहे.
सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल
कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला
निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला
पण हे फार काळ चालणार नाही कारण जनतेला आता कळू लागले आहे, म्हणून कवी निर्धाराने-निश्चयाने म्हणतो,
श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा
एवढेच नव्हे बळीराजाला पाताळात घालणार्या वामनाची सत्ता उलथून टाकण्याची ईर्ष्या मनात आहे
मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू
त्या बटू वामनाची सत्ता, "अभय" पालटली पाहिजे
- विजय शंकरराव चव्हाण
पद्मावती अपार्टमेंट
पद्मनगर, लातूर
=========
शेतकरी तितुका एक एक!
"वांगी" "निराळी" Online उपलब्ध
माझी "वांगे अमर रहे" व "माझी गझल निराळी" ही पुस्तके पुस्तकजत्रा सोबतच आता BookGanga आणि amazon वर Online विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत
* * * *
www.bookganga.com/eBooks/Books?AID=5216407646190881869
* * * *
www.amazon.in/Mazi-Gazal-Nirali-Gangadhar-Mute/dp/B00J9C8OYO
* * * *
http://www.pustakjatra.com/default/mazi-gazal-nirali-gangadhar-mute/p-25...
* * * *
BookGanga, amazon आणि शब्दांजली यांना लाखलाख धन्यवाद!
* * * *
शेतकरी तितुका एक एक!
"प्रहार" मध्ये "माझी गझल निराळी"
शेतकरी तितुका एक एक!
"काव्यदीप" मध्ये "माझी गझल निराळी"
"काव्यदीप" मध्ये "माझी गझल निराळी"
पुणे येथून प्रकाशीत होणार्या "काव्यदीप" मासिकात "माझी गझल निराळी" चे प्रकाशित झालेले पुस्तक परिचय आणि संक्षिप्त समीक्षण.
शेतकरी तितुका एक एक!
दिव्यमराठी वृत्त
धन्यवाद Anand Kamble आणि दिव्यमराठी.
शेतकरी तितुका एक एक!
स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार
अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३
’माझी गझल निराळी’ गझलसंग्रहाला यंदाचा
स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात गेल्या सव्वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या व नवोदित साहित्यिकांचे एक हक्काचे विचारपीठ असलेल्या अंकूर साहित्य संघातर्फ़े दरवर्षी "अंकूर वाङ्मय पुरस्कार" देण्यात येतात. या सर्व पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ४३५ पुस्तके प्राप्त झाली होती. ५०० रू. रोख, शाल श्रीफ़ळ देवून अंकूर साहित्य संमेलनात सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०१३ चे पुरस्कारासाठी १ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार करण्यात आला. अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३ च्या स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कारासाठी परिक्षक मंडळाने ’माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाची निवड केलेली आहे.
शेतकरी तितुका एक एक!
स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार
अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३
’माझी गझल निराळी’ गझलसंग्रहाला यंदाचा
स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात गेल्या सव्वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या व नवोदित साहित्यिकांचे एक हक्काचे विचारपीठ असलेल्या अंकूर साहित्य संघातर्फ़े दरवर्षी "अंकूर वाङ्मय पुरस्कार" देण्यात येतात. या सर्व पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ४३५ पुस्तके प्राप्त झाली होती. ५०० रू. रोख, शाल श्रीफ़ळ देवून अंकूर साहित्य संमेलनात सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०१३ चे पुरस्कारासाठी १ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार करण्यात आला. अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३ च्या स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कारासाठी परिक्षक मंडळाने ’माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाची निवड केलेली आहे.
शेतकरी तितुका एक एक!
“माझी गझल निराळी”
गझलसंग्रह : माझी गझल निराळी (तिसरी आवृत्ती-२०१७)
पृष्ठे : १५६
किंमत : २००/-
गझलकार : गंगाधर मुटे "अभय"
प्रकाशक : निता नितीन हिरवे
संवेदना प्रकाशन,
चिंचवड गाव, पुणे
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण