Dr Asha Munde
added a new picture
September 19, 2020 at 11:02pm
मराठी गझल
रान उद्वस्त येथे
कोरानाने घातले थैमान भयाचे येथे
पाण्याच्या थैमानाने रान उद्वस्त येथे
नाही राहिले पीक रानात संपन्नतेचे
ओल्या त्या बीजाला फुटती अंकुर येथे
ढगफुटीने वाहून गेली स्वप्ने शेतकऱ्याची
उभी पिके पाण्यात त्याचे हृदय जळते येथे
कधी होतो दुष्काळ कारण दु:खांना
थेंबासाठी पाण्याच्या होते वणवण येथे
कोरोनाचे संकट उभे समोर दारात
मन बेचैन आहे मरण पर्याय येथे
प्राचार्य डॉ आशा मुंडे