आई-वडिल
काशी नी म्हनु काशी, जन जातंया धावत,
माय- बाप असताना, काशी आपल्या गावात.
काशी नी म्हनु काशी, काशीला गेल येडं,
माय-बाप असताना, त्येनं पायाच दिलं भाडं.
बापाजी माजा वड्, बया वडाची वड्जाई,
दोघांच्या सावलीची, किती सांगू मी बड्जाई.
पातळाचा रंग कसा, बसंल धोतराला,
माय-बापा वाचुनी, मया कुटली इतराला.
पुरनाची गं पोळी, गुळावाचुन दिसं फिकी,
माय-बापा वाचूनं ,कोन म्हनील माज्या लेकी.
---------------------------------------------------