नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माझा बाप शेतकरी...
माझा बाप शेतकरी पंढरीचा वारकरी
सदा कष्टाचेच खातो जरी न मिळे भाकरी
माझा बाप शेतकरी विठू त्याचा पालन हारी
सदा नाम त्याचे घेतो जरी दु:ख त्याच भारी
माझा बाप शेतकरी नांगर फाळ त्याच्या भाळी
तो छोकरा जीवाचा त्याच्या वेदनेची गोळी
माझा बाप शेतकरी बैल गाडी मध्ये स्वारी
जरी झोपला घरात जीव त्याचा गोठया मधी
माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा कैवारी
धन-धान्या भाव नाही भाग्य गेल रे कपारी
-अशोक बाबाराव देशमाने