नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सावली मी तुमची, ठेवा मला मनी.........
"वावरात दिवसभर करता कष्ट,
तरिही सरकी झालीय, पाण्याविना नष्ट,
मी हाय सोबत , फिकर सोडा धनी,
सावली मी तुमची, ठेवा मला मनी,"
"घामाचा आमचा पैका, पुढारी खाते,
शेतकर्यांची दैना, दुष्काळ पडून जाते,
मले आस तुमची, मायबाप गेले लहानपणी
सावली मी तुमची, ठेवा मला मनी,"
"नाही मिळाले कर्ज, कसेबी दिवस पाहू,
बस दोन लेकराईची भूक, आपण उपाशी राहू,
थोडा दम धरा, वनवन फिरू नका वनी,
सावली मी तुमची, ठेवा मला मनी,"
ू
"चार जिवांचा संसार, सुखात करू आपला,
भाकर केली लेकरांसाठी, कांदाही कापला,
तुम्हीही दोन घास, गिळाकी हो धनी,
सावली मी तुमची, ठेवा मला मनी,"
"गळफास शेतकर्यांचा, वाढलाय आता,
दिवस विधवेचे नको, तुम्हीच माझे दाता,
गळफास घेण्याचे ,आनू नका मनी,
सावली मी तुमची, ठेवा मला मनी,"
..........ए. बी. शेख.
पुसदा अमरावती
( वर्हाडी माती कविता )
9665203106
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने