नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गझल
बळीराजा
अन्नास मुखी देतो दाताच बळीराजा
फासास तरी लटके का हाच बळीराजा
व्यापार जरी मोठा तोट्यात कधी जातो
जोडून तरी ठेवी धागाच बळीराजा
दुर्लक्षित का होतो आबाळ कशी होते
आहे जर वास्तूचा वासाच बळीराजा
घेतात अधाशी ते का वापरुनी त्याला
खातात जसे काही चाराच बळीराजा
चर्चेत स्थिती त्याची येते पण नावाला
जाणून असे सारे केव्हाच बळीराजा
हृदयात व्यथा दाटे काहूर तणावाचे
नेत्री तरळे पाणी गाथाच बळीराजा
छापून जरी आले चालू परवड त्याची
का दाखविण्यासाठी मथळाच बळीराजा
भारीच असे कोडे याचेच सुखांनाही
मार्गात कसा वाटे काटाच बळीराजा
दुष्काळ कधी ओला का माल सडे रानी
मोजीत बसे खोट्या नोटाच बळीराजा
ती झेप विकासाची घेणार कशी सांगा
आहे प्रगतीचा जर पायाच बळीराजा
शेतात अता जाणे सोडेल निराशेने
वाटेल महत्त्वाचा तेव्हाच बळीराजा
माधुरी मगर- काकडे.
दौंड. जिल्हा:- पुणे
महाराष्ट्र
चलभाष-९२२६४५३०८८