नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मी उपाशी..!
झोप घेतो मी उपाशी
साव खातो रे मधाशी.!
काय माझी जिंदगानी
रोज पडतो तोंडघाशी.!
या धरेचा पूत्र मी रे
नाळ जुळली या नभाशी.!
आसवांचे पूर सरले
भांडतो आहे ढगांशी.!
सावकारी रोज भोगे
भोग माझे देवदाशी.!
मी जगाला घास देतो
पोट माझे हे अघाशी.!
का व्यथा माझ्याच आता
मीच सांगाव्या जगाशी.!
शेत माझे का फुलेना
बीज खेळी भावनांशी.!
हिम कर्जाचे उंच गेले
झुंजतो मी अंबराशी.!
का असा हा कोप देवा
कोरड्या माझ्याच घाशी.!
- रवि धारणे
--------------------------------
प्रतिक्रिया
व्वा!
बढिया गझल धारणेजी!
शेतकरी तितुका एक एक!
मी उपाशी
तू तुपाशी..... व्वा!
हेमंत साळुंके
मी उपाशी.....
तू तुपाशी....... व्वा!
हेमंत साळुंके
पाने