नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*शेतक-याचा राजा बळीराजा*
----------------------------------
किसान..शेतकरी..बळीराजा
किती नावे दिली मला;
माझ्यावर कित्येक कवीता केल्या
आंदोलने झाली.
भाषणेही झाली.
कुणी अश्रूही ढाळली;
कुणी टाळ्यांचा गडगडाट सुध्दा केला
अन् जग कुठल्या कुठे गेलं
पण मी जिथल्या तिथेच
शेतक-याचा राजा बळीराजा...
कधी बघितले मला
पोटाचा घेर कमी;
करण्यासाठी फिरताना...
मौजमजा लुटण्यासाठी
फाँरेन टुर ला जातांना...
बंगला कार एसी मध्ये लोळताना..
माझी सकाळ मातीतच;
अन् राञ सुध्दा मातीतच.
अख्खी जिदंगानी मातीतच
शेतक-याचा राजा बळीराजा...
कधी पाऊस गडबडा लोळतो.
तर कधी रुसून बसतो.
कधी पिक फुलारुन येते.
तर कधी जळून खाक होते.
आयुष्याचा हा जुगार
मीच खेळतो तरीही;
माझ्या मालाचा भाव
मी ठरवू शकत नाही.
हिच माझी शोकांतिका
संघर्ष करुन शेवटी थकतो..रडतो
अन् पेपरमध्ये बातमी येते
शेतक-याची आत्महत्या.
शेतक-याचा राजा बळीराजा...
----------------------------------
✍️ आरती परशुराम रोडे.
त. वरोरा जि. चंद्रपूर.
8485851376
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
पाने