नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सदर कविता मी स्वतः रचलेली आहे.तरी स्पर्धेत सहभाग नोंदवावा.--दता वालेकर,घाटनांदूर
हाल शेतकऱ्यांचे
***************
घेवूनीया पेरणीला
वान महागा मोलाचे
केली पेरणी शेतात
स्वप्न पहातो सुखाचे
तन काढून निदून
केली होती कोळपणी
किटकनाशकाची ही
केली होती फवारणी
असे जपले रोपाला
बाळ रांगते खेळते
दिनरात जपलेले
धाट हळूच वाढते
असा पडला पाऊस
तळे झाले वावरात
रोज ऐकून घोषणा
लोक बैंकेच्या दारात
मोल बळीच्या श्रमाचे
सरकार विसरले
शेती मालाचे ते भाव
बाजारात घसरले
*****************************
दत्ता वालेकर, विक्रम फोटो स्टुडिओ,
शिवाजी महाराज चौक,घाटनांदूर, पिनकोड 431519
अंबाजोगाई, जिल्हा बीड.मराठवाडा.
मो.9421440922