नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*"वावराच्या धुऱ्यावर"*
वावराच्या धुऱ्यावर
काट्याकुट्याचं कुंपण
पोरी सोरीच्या कानात
जसं डुलते रिंगन
बोरी बाभळी डुलते
खोपा डांगिले झुलते
कोकिळेची कुहू कुहू
भूल जीवाले पाडते
वाफे करता करता
वाहे पाटाचं गं पाणी
ढेकूल मुरते गं राणी
पाय चालते अनवाणी
मारा वखर, डवरे
बैल नाचती तळतळ
जसं डोंगर दर्यातुन
पाणी वाहते खळखळ
करा निंदन खुरपन
चिवटा निघते मागून
शेतकऱ्यांच्या दशेले
वावर हासते पाहून
ढग नाचते खेयते
काये ढगुले घेऊन
शिरवा जरासा पाडते
माती निघते न्हाऊन
जसं गर्भातुन बाळ
तसं पीकं येई वर
सूर्य पाहते लाजून
वारा गोंजारी वरवर
माया वावराचा धुरा
काठ पदराचा शालू
नवार सोनेरी शोभते
त्याचं राजं कसं खोलू
काया मातीची ही कूस
जसा लोण्याचा गं गोळा
माथी शोभून दिसते
इंद्रधनुचा तो टिळा
पायी बोराटीचा काटा
लाल रक्तानं खुलते
कपाळीच्या कुंकवाची
लाज भांगेत राखते
- विशाल मोहोड
तळवेल, चांदुर बाजार
अमरावती, 9011578771
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने