नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
"बळीचा अभंग"
हिरवळीची लेखनी,करून वाचे
पेरीले धरणीवर दान प्रेमाचे ।
उगता अंकुर आत्म्यामधूनी
फोफावती वृक्ष स्वानंदाचे ।
म्हणोनी म्हणतो धरणीधरा
बळीचे जीवन सक्षम करा ।
रक्षिल जगामाजी चरा-चरा
एकांत म्हणे होईल गा ।
सहावे संमेलन आहे जयासाठी
योजिले 'अलिच्या-बागी' कोकणी ।
पाडतील पुण्यःच्या राशी यत्ने
तयासाठी ही बळी -लेखणी।
सर्वार्थाचा लागो ध्यास
बळीचे राज्य मनीची आस।
घडेल जगी कल्याण
सृष्टीचे संगोपण, एकांत म्हणे.
* नरेंद्र भा.गंधारे
'एकांत'