Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***मातीत होरपळलेले अग्नीवर

*मातीत होरपळलेले अग्नीवीर*
~ अनिल घनवट

केंद्र शासनाने भारतात सैन्य भरतीमध्ये एक नवीन प्रकार सुरू केला. अग्निपथ. त्यात सेवा देणाऱ्यांना नाव दिले अग्नीवीर. अग्निपथ योजनेची घोषणा झाली अन उत्तर भारतातील अनेक राज्यात अग्नितांडव पहायला मिळाले. देशाचे रक्षण करण्यासाठी, सेवा करण्यासाठी इच्छुक तरुणानीच सरकारच्या
विरोधात दगड उचलले, रेल्वे पेटवल्या. का असे झाले असावे? कोण आहेत हे दंगेखोर? का त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलले?
भारतातील सैन्यात भरती होणारी बहुसंख्य मुले ही खेड्यातील, शेतकऱ्यांची किंवा भूमिहीन शेतमजुरांची मुले आहेत. अधिकारी, उद्योजक तर सोडा, गावात व्यापार उदीम करणाऱ्यांची मुले सुद्धा सैन्यात अपवादानेच सापडतील. शेतीत परवडत नाही म्हणून सैन्यात किंवा पोलिसात भरती होण्यासाठी पहाटे रस्त्याने पळणारी व व्यायाम करणारी मुले सर्रास दिसतात. कमी शिक्षणात किमान १५ वर्ष सैन्यात नोकरी व नंतर मरे पर्यंत पेन्शन हे खरं आकर्षण.
अग्निपथ योजनेने या तरुणांचे हे स्वप्न भंग झाले आहे असे त्यांना वाटले. सध्या सैन्य किंवा पोलीस भरतीसाठी तयारी करण्यात हे तरुण दोन तीन वर्षे खर्च करतात, प्रशिक्षण संस्थेत (अकॅडमी) पैसे खर्च करून प्रशिक्षण घेतात. या मागे, एकदा भरती झालो की पुढील आयुष्याची चिंता नाही आणि लग्न होण्याची खात्री हे गृहीतक असतं. अग्निपथ योजनेत चार वर्षा नंतर पुन्हा घरी जावे लागणार हे या तरुणांना पचण्यासारखे नव्हते. योजने बाबत सखोल माहिती न घेता झालेला हा उद्रेक होता. सरकारने नेहमी प्रमाणे चर्चा न करता, योजनेचे फायदे समजावून न सांगता योजना जाहीर केल्यामुळे गैरसमजातूनही उद्रेक झाला असावा. याच परिस्थितीत सरकारने अग्निवीरांची भरती सुरू केल्यास हजारो तरुण रांगेत उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटू नये.
मुळात ग्रामीण भागातली मुले, सैन्य व पोलीसात भरती होण्यासाठी का प्रयत्न करतात? याचे मुख्य कारण आहे तोट्यातील शेती धंदा. आई वडिलांनी आपली हयात शेती करण्यात घालवलेली असते. त्यांचे हाल पोरांनी पाहिलेले असतात. या सापळ्यातून बाहेर पडण्याची त्यांची धडपड असते. दुसरीकडे नोकरी मिळणे अशक्य असल्यामुळे सैन्यात किंवा पोलिसात भरती होण्याचा खटाटोप असतो. जर शेती व्यवसायात बरकत असती तर त्यांनी शेतीच केली असती. शेतीत फायदा होऊन शेतकऱ्यांकडे काही बचत शिल्लक राहिली असती तर खेड्यापाड्यात विविध व्यवसाय सुरू होऊन रोजगार निर्मिती झाली असती. गावोगाव शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभे राहिले असते तर नोकरीचे व रोजगाराचे अनेक पर्याय तयार झाले असते. शेतीतून बाहेर पडण्याची इच्छा आहे पण दुसरी कुठे संधी उपलब्ध नाही, काही पर्याय नाही म्हणून नाइलाजाने शेती करतात किंवा सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न करतात. सियाचिनच्या बर्फात राहू, राजस्थानच्या वाळवंटात राहू, सीमे वर शत्रूच्या गोळ्या छातीवर झेलू पण शेतीत नको अशी मानसिकता या शेतीत होरपळलेल्या जवानांची झालेली असते. जर शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून चांगले जीवन जगण्या इतके पैसे मिळाले, रोजगाराच्या इतर संधी उपलब्ध असल्या तरी हे तरुण सैन्यात भरती होण्याचा हट्ट धरणार नाहीत. कदाचित भारतातील अठरा वर्षावरील प्रत्येक युवकाला काही वर्ष सैन्य प्रशिक्षणाची सक्ती करावी लागेल अशी परिस्थती निर्माण होऊ शकते. सरकारचे काम नोकऱ्या देण्याचे नाही, तर रोजगार सहज उपलब्ध होईल असे वातावरण निर्माण करण्याचे आहे. सरकार नेमके त्याच्या उलटे वागत आहे म्हणून ही समस्या व हा संताप.
अग्निवीरांना नोकरी चार वर्षे, सैन्यात भरती झालेल्यांचा करार पंधरा वर्षे पण इतर सरकारी नोकरांचे निवृत्तीचे वय मात्र अठ्ठावनच्या ऐवजी साठ करण्याची तयारी असते. सर्व सरकारी नोकऱ्या जास्तीत जास्त पंधरा ते वीस वर्षे केल्या तर तरुणांना जास्त संधी मिळेल. व या नोकर वर्गाला, आपल्याला पुन्हा समाजात जायचे आहे याचे भान राहील. पण या वर्गाला दुखवायची हिम्मत सरकार करत नाही.
अन्न धान्याची महागाई वाढू नये म्हणून शेतीमालाचे भाव नियंत्रित करून सरकार देशातील बहुसंख्य जनतेची क्रयशक्ती नष्ट करत आहे. त्यामुळे औद्योगिक मलाचा खप कमी म्हणून उत्पादन कमी व रोजगार निर्माण होण्यास वाव असून सुद्धा रोजगार निर्माण होऊ दिला जात नाही. भारताच्या बेरोजगारीची समस्या शेतीमालाच्या भावात लपलेली आहे. शेतीमालाला भाव मिळू द्या बेरोजगारीचा प्रश्न काही वर्षात संपून जाईल. सरकारला आशा अग्निपथ सारख्या योजना लागू करण्याची गरज पडणार नाही. शेतकरी संघटनेच्या ऊस आंदोलना नंतर काही वर्षे ऊसाला चांगले दर मिळाले तर ऊस पट्ट्यात, या बचतीतून शेतकर्यांच्या मुलांनी अनेक व्यवसाय सुरू केले. स्वतः बरोबर इतरांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. असे सर्व पिकात झाले तर बेरोजगारीचा प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही.
सीमेवर देशाचं रक्षण करणारे जवान हे काळ्या आईची लेकरे, देशांतर्गत सुव्यवस्था पाळणारे पोलीस हे काळ्या आईची लेकरे, या
अग्निपथच्या विरोधात अग्नी तांडव घडवणारी ही काळ्या आईचीच लेकरे. काळ्या आईच्या शोषणाचा परिणाम म्हणून ही काळ्या आईची लेकरे नांगर सोडून बंदुका घ्यायला तयार होतात. काळ्या आईचे व तिच्या लेकरांची शोषण थांबले तरच हा असंतोष मावळले नाहीतर या ज्वालामुखीचा उद्रेक कधी न कधी होणार हे नक्की.
२६/०६/२०२२

अनिल घनवट
राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पार्टी

Share