ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तत्सम क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक सबळता नाही त्याची कुणीही दखल घेत नाही, कदाचित असाच याचा अर्थ आहे.
पण; आता शेतकर्यांच्या मदतीला नवीन संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञान धावून आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अल्पशा खर्चात शेतीविषयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होण्याची आणि भारतीय शेतीला वैश्विक साहित्यक्षेत्रात दृगोचर करण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून आम्ही आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले आहे. त्याचीच प्रारंभिक पायरी म्हणून अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यांच्यावतिने मागील ८ वर्षापासून विश्वस्तरीय लेखनस्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जात आहे. विश्वस्तरीय लेखनस्पर्धेचे यंदाचे हे आठवे वर्ष.
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून ०३ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत बळीराजा डॉट कॉम (
www.baliraja.com ) या संकेतस्थळावर विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना अत्यंत आनंद होत आहे.
शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्यांची संख्याच उणीपुरी असल्याने आणि लेखनाचा विषय "शेती आणि कोरोना" असा जटिल असल्याने या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु यंदा उदंड प्रतिसाद मिळाला आणि देशविदेशातून मराठी भाषिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.
लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : श्री बापू दासरी (नांदेड), श्री प्रदीप देशमुख (चंद्रपूर), सौ. धनश्री किशोर पाटील, सौ. माधुरी कळंबे, अझीझखान पठाण (नागपूर), प्रा. मनीषा रिठे, श्री संदीप धावडे दहिगांवकर, श्री रामेश्वर काकडे (वर्धा), श्री. राजेंद्र फंड (अहमदनगर), श्री सुधीर बिंदू (परभणी)
प्रतिक्रिया
सर्व सहभागी विजेत्यांचे
सर्व सहभागी विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आयोजकांचे माननीय परीक्षकांचे मनापासून आभार
अभिनंदन आणि शुभेच्छा
सर्व विजेत्यांचे, परिक्षकांचे तसेच मुटे सर यांचे भरभरून अभिनंदन.

Dr. Ravipal Bharshankar
अत्यंत महत्वाचे निवेदन
शेतकरी तितुका एक एक!
सर्व विजयी स्पर्धकांचे
सर्व विजयी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन
सतिशगुमालवे
पाने