नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
"युगात्मा स्व.मा.शरद जोशी" यांना भावपूर्ण श्रद्धांजली
३ सप्टेंबर१९३५ हा शेतकरी संघटनेचे पंचप्राण मा.शरद जोशी यांचा जन्मदिवस .त्यांच्या जयंती दिन निमित्य श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन
"खोपडा " ता. मोर्शी ,जि.अमरावती येथे शेतकरी मेळावा आयोजित करून घेण्यात आला.
जगाच्या पाठीवर शेतीसंबधात जे जे आधुनिक तंत्रधानाचे संशोधन झाले.त्याचा वापर करण्याचे मुक्त स्वातंत्र्य शेतकऱ्यांना असाव .
आज शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालाचा उत्पादन खर्च भरुन निघण्याच्या सर्व वाटा सरकारने बंद केलेल्या आहे. सरकार समस्या सोडत नसून
सरकार हीच समस्या बनलेली आहे. तसेच शासनाचे नेहमीच अनावश्यक शेत मालाच्या आयातीचे निर्णय घेवून शेतमालाच्या बाजार पेठेत
हस्तक्षेप केलेला आहे. त्यामुळेच शेतकरी सतत दारिद्र्यात ढकलला जात आहे. असा या सभेत सर्व वक्त्यांचा सूर होता. या मेळाव्यात मा. श्री.
जगदीश नाना बोंडे ,दिलीप भाऊ भोयर ,नितीन भाऊ देशमुख (यवतमाळ) संजय कोल्हे , सभेचे आयोजक मोर्शी तालुकाध्यक्ष सुधाकर
गायकी, प्रमोद भाऊ चौधरी , गोविंदराव देशमुख, यांनी मार्गदर्शन केले.
सभेचे अध्यक्ष श्री मनोहरराव लुंगे (खोपडा ) धनपाल सिंह चंदेल ,मनोहरराव बोराडे , रवींद्र वासंनकार ,सुनील नेरकर ,विठ्ठलराव धोटे,
बबनराव विधले ,विजय लिखितकर ,सुधाकरराव झटाले , बाळू इंगळे व तालुक्यातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
तसेच २ ऑक्टोबर महात्मा गांधींच्या जयंती निमित्य महात्मा गांधींच्या पुतळ्या समोर ता.मोर्शी येथे एकदिवसीय उपोषणाचा कार्यक्रम
महात्माजीना साकडे म्हणून बापुजी तुम्ही गेलात तुमच्या स्वप्नातील भारतीय ग्रामीण भागातील ग्रामउथानाचा कार्यक्रम निस्तानाभूत झाला.
कष्ट करणाऱ्याला किमत नाही. झुंडशाहीचे राजकारण निर्माण झाले.परिणामी भारत देश हवालदिल झाला. म्हणून आम्ही मोर्शी तालुक्यातील
सर्व शेतकरी एकदिवशीय उपोषणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.