नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
हमीभाव देत नाही
बांधू लागले सरण
कसं जगतू रं आम्ही
पाठी बांधून मरण....
पाठी बांधले मरण
नको मला तुझी भीक
घेत चिमटा पोटाला
कस जगवील पिक...
कस जगवील पिकं
झेलून संकट अस्मानी
भाव मिळेना पिकाला
कावा हा तर सुलतानी....
कावा हा तर सुलतानी
कशी यावी कुणा कीव
पैस कुठं रं गाडीला?
चालून भागला हा जीव....
चालून भागला हा जीव
जड पायातले गोळे
सुखी सपान बघती
राती निजताना डोळे....
राती निजताना डोळे,
दिस सरलेला दिसे
ओल्या पापण्यात झोप
ओठी लटकेच हसे....
ओठी लटकेचं हसे
रात खायला उठते
देह थकून नीजतो
मनी काहूर पेटते....
मनी काहूर पेटते
जीव कासावीस होई
पीक वाळत चाललं
बोजा कर्जाचा तो डोई....
बोजा कर्जाचा तो डोई
कशी जाईल भाकर
बळी नावालाच राजा
साऱ्या जगाचा चाकर...
साऱ्या जगाचा चाकर
घरी बायका नि मुलं
भरी जगाचे तो पोट
घरी विझवूनी चूल....
घरी विझलेली चूल
द्या रास्त त्याला भाव
उभ्या जगाला पोसतो
माझा शेतकरी देव....!
- महेश ज्ञानोबा होनमाने
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
शेतकऱ्यांचं दुखणं व्यक्त
शेतकऱ्यांचं दुखणं व्यक्त केलंय बळीराजा विषय घेतला तर त्यात पूर्वी आणि आता व पुढे कसं लढता येईल यावर लिखाण करण्याचा प्रयत्न केल्यास उत्तम