Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

माझा शेतकरी देव

Main page content

माही_निर्मिती
By माही_निर्मिती | 10:04 AM IST, रवी November 19, 2023
गेय रचना/गीत/पोवाडा इत्यादी

हमीभाव देत नाही
बांधू लागले सरण
कसं जगतू रं आम्ही
पाठी बांधून मरण....

पाठी बांधले मरण
नको मला तुझी भीक
घेत चिमटा पोटाला
कस जगवील पिक...

कस जगवील पिकं
झेलून संकट अस्मानी
भाव मिळेना पिकाला
कावा हा तर सुलतानी....

कावा हा तर सुलतानी
कशी यावी कुणा कीव
पैस कुठं रं गाडीला?
चालून भागला हा जीव....

चालून भागला हा जीव
जड पायातले गोळे
सुखी सपान बघती
राती निजताना डोळे....

राती निजताना डोळे,
दिस सरलेला दिसे
ओल्या पापण्यात झोप
ओठी लटकेच हसे....

ओठी लटकेचं हसे
रात खायला उठते
देह थकून नीजतो
मनी काहूर पेटते....

मनी काहूर पेटते
जीव कासावीस होई
पीक वाळत चाललं
बोजा कर्जाचा तो डोई....

बोजा कर्जाचा तो डोई
कशी जाईल भाकर
बळी नावालाच राजा
साऱ्या जगाचा चाकर...

साऱ्या जगाचा चाकर
घरी बायका नि मुलं
भरी जगाचे तो पोट
घरी विझवूनी चूल....

घरी विझलेली चूल
द्या रास्त त्याला भाव
उभ्या जगाला पोसतो
माझा शेतकरी देव....!

- महेश ज्ञानोबा होनमाने

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

रवीवार, November 19, 2023 - 22:01
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!



CongratsCongrats

  • Log in or register to post comments
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा

समीक्षक

सोमवार, November 20, 2023 - 12:36
Permalink
New

लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.

  • Log in or register to post comments
शेतकऱ्यांचं दुखणं व्यक्त

RANGNATH TALWATKAR

बुधवार, November 22, 2023 - 13:38
Permalink
New

शेतकऱ्यांचं दुखणं व्यक्त केलंय बळीराजा विषय घेतला तर त्यात पूर्वी आणि आता व पुढे कसं लढता येईल यावर लिखाण करण्याचा प्रयत्न केल्यास उत्तम

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 6084 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 7 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    2 hours 20 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    2 hours 23 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    2 hours 25 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    2 hours 27 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 3 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
सांग सांग मेघराजा 7
धडानवडाची मैना लई गुणाची : विडंबनात्मक बालकविता 7
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 7
लोकांना काय सांगू? 7
गझल 7
कवी संमेलन/गझल मुशायरा, मुंबई : २०१८ : नोंदणी 7
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 7
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२० : निकाल 7
जात्यावरची गाणी 6
विद्रोही... 6
राफेल(गझल) 6
पावसाचे नियोजन 6
आरं आरं बळीराजा 6
मातीत हरवल्या कविता : ग्रामीण कवितेचा समृद्ध हुंकार 6
कृषीसंस्कृतीचा लोककवी - इंद्रजित भालेराव 6
शेतीसाठी अविभक्त कुटुंबपद्धति गरजेची 6
शेतकरी आंदोलन आंधळे व सरकार बहिरे : भाग-५ 6
मग मात्र लिहावीच लागते कविता... 6
विनोदी VDO 6
भिक मरणाची 6

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,987
कान पकडू नये 25,872
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,741
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,540
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,334
माय मराठी स्तवन git 25,330
एवढा मोठा नांगूर... 25,060
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,060
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,027
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,956
कापसाचा उत्पादन खर्च 24,486
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,405
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,023
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,966
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,941
शेतकरी प्रकाशन 23,934
शेतकरी पात्रता निकष 23,914
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,888
हे गणराज्य की धनराज्य? 23,819
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,737

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini