![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गझल:राफेल
---------------
खेळातले खिलाडी ख्रिस गेल होत गेले.
षटकार पण तयांचे मग झेल होत गेले.
विनवीत क्षेत्ररक्षक काळ्या ढगास तेव्हा,
खेळात एक तर्फी गुड वेल होत गेले.
आकाश पाखरांचे आता थवे उडू दे!
बंदीत माणसांचे घर जेल होत गेले.
शेतात हिरवळीला नीरास दान द्या रे!
माझे नदी तलावे राकेल होत गेले.
अर्थात काय नव्हते तूम्हीच सोडवा ते?
दमदार डोकश्याचे जग फेल होत गेले.
समजून जीवनाला वाऱ्या तुझ्या गतीने,
साधे विमान माझे राफेल होत गेले.
काळानुसार आता राजेश बघ किती हे,
साहित्य माणसाचे रंगेल होत गेले.
लगावली-
गागालगालगागा गागालगालगागा
व्रुत्त-आनंदकंद
-राजेश जौंजाळ पोहणा(हिंगणघाट)
---------------------------------------------
प्रतिक्रिया
अप्रतिम
साहित्य माणसाचे रंगेल होत गेले... अप्रतिम राजेश.
Dr. Ravipal Bharshankar
Thank you sir.
Thank you sir.
अप्रतिम!!!
साधे विमान तुझे खरच राफेल होत गेले.......
अप्रतिम रचना, अभिनंदन!!!!!
Thank you Dhiraj sir.
Thank you Dhiraj sir.
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने