Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



IT कार्यशाळा - सोशल मीडियाची तोंडओळख - भाग-११

IT कार्यशाळा - सोशल मीडियाची तोंडओळख - भाग-११
 
प्रस्तावना :
आंतरजालिय तंत्रज्ञानाचा आवाका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मग ती कोणत्याही वयोगटातील असो, तंत्रज्ञानाबद्दल थोडीशी का असेना, पण माहिती असणे अनिवार्य होत चाललेले आहे. ज्या तर्‍हेने तंत्रज्ञान पुढे जात आहे ते बघता येणारा काळ हा पूर्णत: संगणकीय प्रणालीवर आधारलेलाच असेल; जिथे कागद, पेन आणि वही हद्दपार झालेली असेल. त्यांची जागा संगणकाच्या किंवा मोबाईलच्या कळफ़लकाने घेतलेली असेल. हा व्यवस्था बदल अटळ आहे कारण कमीखर्चिक, वेळ वाचवणारा, सुरक्षित आणि सोईचा आहे. येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाचा बदल थांबवणे किंवा अडवून धरणे कुणाच्याच आवाक्यात नसणार आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करणे, एवढाच एक पर्याय उपलब्ध आहे. 
 
सर्च इंजिन ऑप्टीमाइझेशन :
साधारणतः १९९० च्या सुमारास आपल्याला हवा असलेला मजकूर सहज शोधता यावा म्हणून सर्च इंजिनसाठी साईटस बनवायला सुरुवात झाली. सध्या गुगल आणि  बिंग ही स्वयंचलित अग्रगण्य सर्च इंजिन्स असली तरी आज मितिला हाताळण्यातील सुलभता आणि एका क्लिकने हवा तो मजकूर पुढे येणे या कारणाने गुगल सर्च इंजिन प्रचंड लोकप्रिय झाले आहे. गुगल फक्त सर्च इंजिन एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर तो आहे आपला शोधमित्र झालेला आहे. गुगल हा शब्द मराठी भाषेत सुद्धा एवढा रुळला आहे की "शोधणे" या क्रियापदाची जागा "गुगलणे" या शब्दाने घेतली आहे. 
आंतरजाल (इंटरनेट) म्हणजे ज्ञानाचे भांडार आणि माहितीचा खजिना आहे. या प्रचंड ज्ञानसागरातून आपल्याला हवी ती माहिती शोधण्यासाठी सर्च इंजिन मदत करत असते आणि ते सुद्धा कल्पनातीत प्रचंड वेगवान गतीने. अनंत अशा सायबर विश्वाचा न संपणारा अखंड माहितेस्त्रोत पडताळत आपल्याला हवी ती नेमकी माहिती पुरवण्याचे कार्य सर्च इंजिन करत असते. फ़क्त राम शब्द लिहुन गुगलले तर प्रभू रामचंद्रापासून ते राम मनोहर लोहिया पर्यंतची अगदी चित्रासहित इत्यंभूत महिती तो आपल्यासमोर सादर करतो. गुगलची शोधाशोध फ़क्त माहिती पुरतीच मर्यादित नसून कॅल्क्युलेटरचे कामही तो तितक्याच तत्परतेने करतो.
उदा. ब्राऊजर बार/सर्च बॉक्समध्ये 426589+725693 टाइप करा आणि एंटर दाबा. तो लगेच 1152282 उत्तर तुमच्या समोर हजर करतो आणि त्यासोबत पुढील आकडेमोडीसाठी कॅलक्युलेटरही हजर करतो.   
 
गुगल सारख्या अग्रगण्य सर्च इंजिनमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सर्वांसाठी खूली झालेली आहे. फक्त बेरीज,  वजाबाकी, भागाकार, गुणाकारच नाही तर टक्केवारी, वर्गमूळापासून साइन, कॉस, टॅनपर्यंत एक कॅल्क्युलेटर जेवढी आकडेमोड करतो ती सारी गुगलवर करता येते. Currency Converter, Unit Converter, लांबी, रुंदी, उंची, एकर, हेक्टर अशी किचकट असणारी आकडेमोड करण्यातही गुगलचा हातखंडा आहे.
उदा. 27.3 Hectare in acre असे टाइप करा आणि एंटर दाबा. तो लगेच 27.3 हेक्टर म्हणजे 67.45 एकर होतात, असे उत्तर २० सेकंदाच्या आत तुमच्या समोर सादर करुन मोकळा होतो.  
 
The Global Positioning System (GPS) :
एके काळी लष्करामध्ये वापरले जाणारे हे तंत्रज्ञान आता सर्वसामान्यांसाठी खुले होऊन त्याचा दैनंदिन जीवनातही वापर प्रभावीपणे सुरू झालेला आहे. अंतराळतील उपग्रह आणि मोबाईल मधील GPS सिस्टिमच्या सहाय्याने ही यंत्रणा कार्य करते. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमद्वारे आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणाची नेमकी माहिती मिळते. त्यात ते ठिकाण आपण उभे असलेल्या ठिकाणापासून किती दूर आहे, तिथे पोहोचण्यासाठी किती मार्ग उपलब्ध आहेत आणि तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागू शकतो अशी माहिती जीपीएस उपकरणाच्या पटलावर एका बटनाद्वारे मिळू शकते. या सुविधेमुळे नेमके ठिकाण शोधणे अधिक सोपे बनते. उदा. एखाद्या घराचा पत्ता शोधण्यासाठी, विशिष्ट ठिकाणी पोचण्यासाठी वगैरे. 
 
व्हॉट्सऍप :
बोटाच्या एका इशाऱ्यावर आपण आपला लिखित संदेश, फोटो, व्हिडिओ आपल्या मित्रमंडळी, नातेवाईंकापर्यंत पोहोचवू शकतो. व्हॉट्सऍप वापरायला अत्यंत सुलभ असल्याने हे  ऍप अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झालेले आहे. 
काही वर्षांपूर्वी एखादी फाइल किंवा इमेज शेअर करण्यासाठी मेलचा वापर करावा लागायचा. आज इन्स्टंट मॅसेजिंग  ऍपच्या मदतीनं आपण बोटाच्या इशाऱ्यावर इमेज आणि इतर साहित्य परस्परांना शेअरिंग करू शकतो. गृप बनवता येण्याच्या सोयीमुळे एकाचवेळी अनेकांशी संपर्क ठेवता येतो. खाजगी संदेश द्यायचे असतील तर ब्रॉडकास्ट लिस्ट बनवून बोटाच्या एका इशाऱ्यावर त्या सर्वांशी संदेशाची देवाण-घेवाण करु शकतो.
मात्र केवळ संवादासाठी उपयुक्त असलेल्या या सुलभ कार्यप्रणालीमुळे वापराचा अतिरेक होऊन अनेक समस्या निर्माण व्हायला लागल्या आहे. भरमसाठ पोस्ट, फ़ोटो व व्हिडियो सतत गृपवर व खाजगी संदेशात प्राप्त होत असल्याने अनावश्यक संदेशातून आवश्यक तो संदेश शोधून काढणे अत्यंत कठीण होऊन जाते. वारंवार  ऍप क्लिन करावे लागत असल्याने महत्वाचे संदेशही न वाचताच डिलिट होऊन जाण्याचा धोका असतो. शिवाय हे  ऍप मोबाईलमधील मेमरीचा वापर करत असल्याने वारंवार मोबाईल हँग होण्याचे प्रमाणही वाढले आहे. किरकोळ व चावडीवर माराव्या तशा गप्पा मारण्यासाठी व्हॉट्स ऍप उपयुक्त असले तरी महत्वपूर्ण कामासाठी व्हॉट्स ऍपचा वापर फ़ारसा सुरक्षित नाही त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपकडे एक विरंगुळ्याचे साधन म्हणूनच पाहिजे. 
 
ट्विटर :
ज्यांना लांबलचक लिहायचे नाही त्यांच्यासाठी अतिशय कमी शब्दात आपले म्हणणे मांडण्यासाठी ट्विटरचा चांगला उपयोग होतो. आपण ट्विटर वापरुन सर्वांपर्यंत एकच संदेश एकाच वेळी पोहचवू शकतो. मात्र आपल्या ‘फॉलोअर्स’ पर्यंतच आपला संदेश पोचत असतो. त्यामुळे ज्यांचेकडे जास्त ‘फॉलोअर्स’असतील त्यांनाच त्याचा उपयोग होतो. नावाजलेल्या व लोकप्रिय झालेल्या असामान्य  व्यक्तीसाठी हे अत्यंत उपयोगाचे माध्यम आहे. सामान्य व्यक्तींना ट्विटर फारसे उपयोगाचे नाही.
 
फ़ेसबूक :
जुन्या मित्रमैत्रीणींना शोधण्यापासून ते नवनविन मित्रमैत्रीणी जोडण्यासाठी फेसबूक हे एक चांगले प्रभावी माध्यम ठरले आहे. समजण्यास साधे-सोपे आणि नोटिफ़िकेशनची वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असल्याने फ़ेसबुकचा वापर करणे ट्विटर व व्हाटसपच्या तुलनेने अधिक चांगले ठरत आहे. पेज किंवा गृप बनवता येणे, हे फ़ेसबूकचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. दिर्घ लेख, कविता, चर्चा यासाठी सुद्धा फ़ेसबूक हा चांगला पर्याय आहे.
परस्परांशी ओळखी वाढविणे, मित्रसंबंध जोडणे, मित्रांच्या मित्रांना शोध घेणे, नविन घडामोडी परस्परांना सांगणे, आपले फोटो शेअर करणे, ऑनलाईन गेम्स खेळणे, चॅटींग करणे, संदेश/निरोप पाठवणे, आपले विडिओ प्रकाशित करणे, विशेष कार्यक्रमाची माहिती सांगणारी दिनदर्शिका ठेवणे, वाढदिवसाच्या सदिच्छा देणे इत्यादी उपयोगी सेवा वापरण्यास फारच सुलभ आहेत. शिवाय एखाद्या कार्यक्रमाचा इव्हेंट तयार करुन आपल्या मित्रमंडळींना निमंत्रित करण्याचीही सुविधा फ़ेसबूकवर असते.
 
इंटरनेट बँकिंग व मोबाइल बँकिंग :
बँकिंग इंडस्ट्रीचा चेहरामोहरा इंटरनेट किंवा ई-बँकिंगमुळे बदलला आहे. इंटरनेट बँकिंग व मोबाइल बँकिंग मुळे बिलांचा भरणा रोख शुल्काखेरीज करता येतो. पर्सनल लोन, मॉट्रगेज आदींसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ होते. ग्राहकांना खात्यातील व्यवहार २४ तास उपलब्ध असतात. ग्राहक जगभरात कुठेही असला तरी तो आपल्या खात्याच्या संपर्कात राहून व्यवहार करू शकतो. NEFT अथवा RTGS सारख्या सुविधांच्या माध्यमातून घरबसल्या आर्थिक देवाण-घेवाण करता येते. बँकांतील व्यवहार ग्राहकांना मोबाइलच्या माध्यमातून करता येणाऱ्या सुविधेला मोबाइल बँकिंग किंवा एसएमएस बँकिंग म्हणतात. कारण या सुविधेमध्ये थेट कॉल न करता एसएमएसच्या सहाय्याने व्यवहार केले जातात. साधारणपणे बँका या सुविधेसाठी पैसे घेत नाहीत, एसएमएसचा खर्च मात्र पडतो. यामध्ये तुम्ही केलेला व्यवहार एसएमएसच्या माध्यमातून काही क्षणात ग्राहकाच्या मोबाइल स्क्रीनवर वाचता येतो. मोबाइल कंपन्यांच्या सहकार्यातून वेगवेगळ्या बँका ही सुविधा देतात, त्यामुळे बँकेचा ज्या कंपनीशी करार आहे, त्या मोबाइल कंपनीच्या माध्यमातूनच व्यवहार करता येतो. या माध्यमातून व्यवहारासाठी साधारणपणे बँकेत बचत, चालू वा फिक्स्ड डिपॉझिट प्रकारचे खाते असायला लागते. 
 
संकेतस्थळ व मोबाईल  ऍप  :
व्यापक जनाधार व वैचारिक पाया असलेल्या कोणत्याही संघटनेचा विचार केल्यास फ़ेसबूक, ट्विटर व व्हाटसअप ही सामाजिक माध्यमे परस्परात संवाद साधण्यापलिकडे फ़ारशी उपयोगी ठरु शकत नाहीत. तुलनेने संकेतस्थळाचा वापर अधिक प्रभावी आणि उपयुक्त ठरतो. 
 
त्यामागची काही निवडक कारणे :
 
सारांश :
  • प्रत्येक व्यक्तीला आंतरजालिय तंत्रज्ञानाबद्दल माहिती असणे अनिवार्य झाले आहे. 
  • प्रत्येक व्यक्तीने सामाजिक-माध्यमांचा उपयोग शिकून घेणे काळाची गरज आहे.
  • प्रत्येक व्यक्तीकरिता फ़ेसबूक, ट्विटर व व्हाटसऍपच्या तुलनेने संकेतस्थळ अधिक परिणामकारक साधन आहे.
 
ही झाली इंटरनेट व सोशल मीडियाची तोंडओळख.
पुढील भागात आपण यातील प्रत्येक मुद्यावर सविस्तर विवेचन करणार आहोत.
 
शुभेच्छेसह!
 
- गंगाधर मुटे
=======
Share

प्रतिक्रिया