![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेती विरोधी कायदे रद्द करा : मागणीतील फोलपणा
प्रश्न : मुटे सर, कायदे रद्द झाल्याने काय होईल असा आपण प्रतिप्रश्न केल्याने माझा गोंधळ उडाला आहे.
म्हणून आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी काय केले म्हणजे आर्थिक प्रश्न सुटेल ह्याबद्दल योग्य मार्गदर्शन करून आमच्या सारख्या कार्यकत्यांचे अज्ञान दूर करावे.
उत्तर :
Ramkishanappa Rudraksh उत्तर सोपं आहे फार अवघड नाही पण त्यासाठी नीट विचार करून चिंतन करण्याची गरज आहे.
1. कोणतेही सरकार आधी कायदे बनवत नाही. आधी धोरण ठरते मग त्यानुसार कायदे बनवण्यात येतात.
2. शेतीविरोधी धोरण जर बदलायचं नसेल तर कोणतेही सरकार कायदे बदलणार नाही.
3. समजा कायदे बदलले पण धोरण कायम ठेवलं तरी शेतीची लूट थांबू शकत नाही. 1950 पूर्वी तुम्ही म्हणता ते शेती विरोधी कायदे नव्हते. मग 1950 पूर्वी शेतीचे शोषण होत नव्हते का?
4. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणत्याही युगात, कोणत्याही शतकात शेतीला अनुकूल असे कायदे बनवण्यात आलेले नाहीत त्यामुळे शेतीला संरक्षण मिळाले नाही. आजही शेतीला अनुकूल असे कायदे नाहीत.
5. शेतीला अनुकूल कायदे तेव्हाच बनतील जेव्हा सरकारचे धोरण बदलेल. आहे ते काही कायदे रद्द केले आणि शेतीला अनुकूल कायदे तयार केले नाहीत तरी शेतीचे शोषण थांबू शकत नाही.
निष्कर्ष असा की जोपर्यंत धोरण बदलत नाही तोपर्यंत काही कायदे रद्द करूनही काहीही उपयोग नाही. कारण जे कायदे वाचतील तेवढेच कायदे शेतीचे शोषण करण्यासाठी पुरेसे ठरतील.
काही कायदे रद्द केल्याने शेतीचे प्रश्न सुटतात हा विचार निव्वळ भाबडेपणाचा आहे. त्यासाठी एक उदाहरण देतो.
समजा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा खून करायचे ठरवले आणि त्यासाठी हत्यार म्हणून तलवार हाती घेतली तर...
त्याच्या हातची तलवार काढून घ्या म्हणजे तो खून करणार नाही... हा विचार भाबडेपणाचा आहे कारण जोपर्यंत तो खून करण्याचा निर्णय/नियत/धोरण बदलणार नाही तोपर्यंत त्याला खून करण्यापासून कोणी अडवू शकणार नाही.
तुम्ही तलवार जरी हिसकावून घेतली तरी तो हातात लाठी घेईल, काठी घेईल, बंदूक घेईल किंवा दगड धोंडे घेईल पण तो उद्दिष्ट पूर्ण करेल.
निष्कर्ष हाच की कायदे रद्द करा असे म्हणणे म्हणजे हातातली तलवार हिसकावून घ्या असे म्हणण्यासारखे आहे.
जोपर्यंत नियत/धोरण बदलत नाही तोपर्यंत अंतिम उद्दिष्ट प्राप्त होणार नाही.
म्हणून
युगात्मा शरद जोशी म्हणाले होते "शेतकऱ्याचे मरण हेच शासनाचे धोरण" म्हणून ते युगात्मा होते, शेतकऱ्यांचे पंचप्राण होते, कुशल शेतकरी नेते होते आणि थोर आंदोलक सेनापती होते.
तुम्हाला युगात्मा शरद जोशींच्या पुढे जायचे असेल तर त्या पलीकडला विचार करावा लागेल आणि त्या पलीकडील आंदोलन शास्त्र मांडावे लागेल. मुर्खासारखे काहीच्या काही आतार्किक बोलून युगात्मा शरद जोशीपेक्षा मोठे होता येणार नाही.
तमाशामध्ये आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या ललना वेगवेगळे ॲटम पेश करतात. तुम्ही सुद्धा त्यासारखेच जनतेचे लक्ष वेधण्यासाठी शेतीविरोधि कायदे रद्द करा, शेती विरोधी कायदे रद्द करा असे म्हणून आपला ॲटम पेश करून लोकांचे लक्ष वेधून घेत असता. या पलीकडे तुमच्या मागणीला काहीही अर्थ नाही. उगीच शेतकरी आंदोलन कमजोर करण्यात काहीही अर्थ नाही.
जोपर्यंत सरकारचे शेतीविरोधी धोरण बदलून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळण्यासाठी शेतीला अनुकूल धोरण तयार होत नाही तोपर्यंत ना शेतीचे दारिद्र्य संपणार आहे ना देशाची गरीबी संपणार आहे.
#गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो