नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
डोंगरावरून कर्जाचा दगड, पडता-पडत नाही
पडलेला दगड मात्र, चढता-चढत नाही
चढलेलं कर्ज काही, घटता-घटत नाही
कर्जाच्या विळख्यातील शेती, सुटता-सुटत नाही...
गरजा आमच्या आता, संपता-संपत नाही
संपतात दमड्या मात्र, पुरता-पुरत नाही
पुरतात कष्ट मोठे, पिकता-पिकत नाही
कर्जाच्या विळख्यातील शेती, सुटता-सुटत नाही...
निसर्गाचा कहर आता, बघता-बघत नाही
बघतात दृश्य डोळे, रडता-रडत नाही
रडतात मन माझे, मानता-मानत नाही
कर्जाच्या विळख्यातील शेती, सुटता-सुटत नाही...
हिम्मत असून बाजू, लढता-लढत नाही
लढतात देह आमचे, मरता-मरत नाही
मरतात स्वप्न भावी, जगता-जगत नाही
कर्जाच्या विळख्यातील शेती, सुटता-सुटत नाही...
कवी - ऍड. सुशांत ग. बाराहाते
प्रज्ञा नगर, नंदोरी रोड, संत तुकडोजी वार्ड,
हिंगणघाट.
मो. ९९६०५७७१३१.
प्रतिक्रिया
सर्व साहित्य प्रेमींना सप्रेम
सर्व साहित्य प्रेमींना सप्रेम नमस्कार....
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने